Maharashtra Covid cases Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Covid Update: काळजी घ्या! राज्यात वेगानं फैलावतोय कोरोना; ताजा रिपोर्ट चिंता वाढवणारा

Maharashtra Covid cases : कोरोनाच्या जेएन १ या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण भारतात आढळून येत आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागलीय. आज नवीन रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची वाढती संख्या पाहता नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयाकडून दिला जात आहे.

Bharat Jadhav

Covid Cases in Maharashtra :

कोरोनाचा नवा व्हेरिएंटचा संसर्ग वाढू लागलाय. देशातील अनेक राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. आजही राज्यात नवीन कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. आज राज्यात नवीन ३७ रुग्ण आढळले आहेत. यात कोरोनाचा नवा व्हेरियंट जेएन -१ चे एकूण १० रुग्ण आहेत. या संख्येनुसार, राज्यातील सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या १९४ झालीय. दरम्यान कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णाची टक्केवारी ९८.१८ टक्के आहे. (Latest News)

कोरोनाच्या जेएन १ या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण भारतात आढळून येत आहेत. राज्यात आज नवीन ३७ कोरोना रुग्ण आढळून आले. आज आढळून आलेल्या रुग्णांची संख्या पकडून राज्यात एकूण १९४ सक्रीय रुग्ण आहेत. तर एकट्या मुंबईत (mumbai) ८८ रुग्ण सक्रीय आहेत. काल सोलापूर, सांगली,अक्कलकोट आणि बीडमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले होते. नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आल्यानं अक्कलकोट प्रशासन अलर्ट होत अक्कलकोट येथे येणाऱ्या भाविकांना (devotees) मास्कचे वाटप केले जात आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दररोज स्वामींच्या दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांच्या संख्येत पुणे- मुंबई येथील स्वामी भक्तांची संख्या लक्षणीय असते. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येत आहे. तर बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाची एन्ट्री झाली आहे. दरम्यान जिल्हा रूग्णालय प्रशासन देखील त्यासाठी सज्ज झाले असून सर्दी, ताप, खोकला इत्यादी लक्षणे आढळल्यास तात्काळ उपचार करून घ्यावेत, असे आवाहन बीड जिल्हा रूग्णालय प्रशासनाकडून केले जात आहे.

देशातील इतर राज्यात वाढले कोरोनाचे रुग्ण

देशातील इतर राज्यातही कोरोना (Corona) व्हायरसच्या जेएन-१ व्हेरियंटचे (Variant of JN-1) रुग्ण आढळत आहेत. सोमवारी कर्नाटकात ३४ प्रकरणे नोंदवली गेली, तर तीन रुग्णांचाही मृत्यू झाला. दुसरीकडे, केरळमध्ये एकाच दिवसात ११५ नवीन रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात नव्या व्हेरियंटचे एकूण ३४ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी २० रुग्ण बेंगळुरू, म्हैसूर ४, मंड्या ३ आणि रामनगरा, बेंगळुरू ग्रामीण, कोडागु आणि चामराजा नगारा येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beetroot Chips Recipe: घरच्या घरी मुंलासाठी बनवा पौष्टिक बीटरुट चिप्स

Tejpatta Tea Benefits: तमालपत्राचा चहा पिण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे!

Baramati News : बारामतीचा वाली कोण? अजित पवारांचं मोठं विधान, पाहा Video

Priyanka Gandhi : जातनिहाय जनगणनेसाठी काँग्रेस आक्रमक; प्रियंका गांधींचे PM मोदींना ओपन चॅलेंज

Walnut: दूध की पाणी? अक्रोड कशात भिजवून खाणे जास्त फायदेशीर

SCROLL FOR NEXT