Maharashtra Corona Update Saam Tv
महाराष्ट्र

Corona Update: सावधान! दिवसभरात कोरोना रुग्णांची संख्या दीडशे पार, जेएन-१ च्या रुग्णांचा आकडा चिंताजनक

Maharashtra Corona Update: गेल्या २४ तासात राज्यात १५४ नवीन रुग्ण आढळून आलेत. तर २ जणाचा झाला मृत्यू झालाय. तर आज दिवसभरात १७२ जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी ते ६ जानेवारीपर्यंत राज्यात कोरोनाच्या नव्या जेएन -१ व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या १३९ झालीय.

Bharat Jadhav

(आवेश तांदळे)

Maharashtra Corona Update:

दिवसेंदिवस राज्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. आज कोरोनाच्या १५४ नव्या रुग्णांची भर पडलीय. वाढत्या रुग्ण संख्या बघता टास्क फोर्सने खबरदारी घेण्यास सुरूवात केलीय. कोरोनाची लागण झाल्यास त्या व्यक्तीला ५ दिवस गृहविलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. (Latest News)

ताप, सर्दी आणि खोकला आढळल्यास कोविड चाचणी करुन घेण्याचा सल्ला टास्क फोर्सकडून देण्यात आलाय. कोरोना झाल्यास गृह विलगीकरणात ५ दिवस राहावे. हवा खेळती राहील अशा खोलीत रहावे. इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी मास्क वापरावे. घरातील ज्येष्ठ नागरिकांनी किंवा अतिजोखिम असलेल्यांनी मास्क वापरावे अशा सुचना टास्क फोर्सने दिल्यात.

Corona Update:

दरम्यान आज जाहीर झालेल्या तर आजच्या दिवशी १७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. दरम्यान राज्यातील कोरोनामधून बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ९८.१७ टक्के आहे. तर मृत्यू दर हा १.८१ टक्के इतका आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट जेएन-१ च्या रुग्णांची संख्या १३९ झालीय. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे पुण्यातील आहेत. पुण्यात एकूण ९१ रुग्ण असून त्या खालोखाल नागपूरमध्ये ३० रुग्णांची नोंद झालीय. ठाण्यामध्ये ५ तर बीडमध्ये ३, छत्रपती संभाजीनगरमध्ये ३ आणि नांदेडमध्ये २ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

Corona

कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचे रुग्ण वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने आधीच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना काळजी घेण्याचे आवाहन केलंय. केंद्रीय मंत्रालयाने जारी केलेल्या कोविड-१९ च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितलंय. जेएन-१ च्या वाढत्या केसेसमुळे आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने सर्व रुग्णालयांना इन्फ्लूएंझा सारखा आजार आणि श्वसनाच्या आजारावर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: दुर्गापूजेपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार? मोठी मागणी समोर

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT