Maharashtra Congress Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Congress: थोरात- पटोले वादानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार; माजी मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

या वादानंतर कॉंग्रेसमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. यावर मोठ्या बदलाचे संकेत दिले आहेत.

Gangappa Pujari

Prithviraj Chavan: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर शिक्षक मतदारसंघात सत्यजित तांबेंच्या उमेदवारीवरुन हा वाद सुरू झाला होता.

या वादानंतर कॉंग्रेसमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. यावर माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज यांनी मोठ्या बदलाचे संकेत दिले आहेत. (Maharashtra Congress)

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांच्यामधील वाद चांगलाच रंगला होता. नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर थोरातांनी नाराजी दर्शवली होती, तसे पत्रही त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे दिले होते, यावर कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे विधान केले आहे.

काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण...

"रायपूरचे कांग्रेसचे अधिवेशन होणार आहे. त्यानंतर राज्यात संंघटनात्मक बदल होतील असे सुचक विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. तसेच हे वाद मोठे आहेत असे मला वाटत नाही. मात्र पक्षातील लोकांनी जाहीर वक्तव्य टाळायला पाहिजेत, पक्षांचे काम करताना समन्वय पाहिजे असे सांगत, कांग्रेसची हक्काची जागा गमावली आहे," अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.

दरम्यान, यावेळी पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी उद्योजक गौतम अदानी यांच्यावर हिडेनबर्गने केलेल्या आरोपांवरही मोठे विधान केले आहे. यामध्ये त्यांनी "हिडनबर्ग रिसर्चने इतिहासातील सर्वात मोठा फ्रॅाड केल्याचा आरोप अदांनीवर केला आहे. यावर अदानी समूहाने अमेरिकेत अब्रूनुकसानीचा दावा करायला पाहीजे," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Spices Storage Tips: मसाले फ्रिजमध्ये ठेवावेत की बाहेर? जास्त काळ फ्रेश आणि सुगंधी ठेवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या!

Horoscope : दिवाळीआधी या ४ राशींचं नशीब चमकणार? पैशाच्या अडचणी होतील दूर अन् नोकरी-व्यवसायात प्रगतीचे योग

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

diwali shopping in mumbai : मुंबईत दिवाळीची खरेदी करायचीये ? या ठिकाणांना नक्की भेट द्या

निवडणुकीत उमेदवाराने खोटी माहिती दिली? आता मतदार थेट दाखल करू शकतो तक्रार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT