Congress Meeting News Saamtv
महाराष्ट्र

Congress Meeting News: राज्यातील कॉंग्रेसमध्ये खांदेपालट होणार? राहुल गांधींसमोर नाना पटोलेंची तक्रार; दिल्ली बैठकीत काय घडलं?

Maharashtra Congress Meeting In Delhi: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikaarjun Kharge), केसी वेणुगोपाल तसेच राहुल गांधी (Rahul Gandhi) देखील या बैठकीत हजर होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Politics News: राज्यात अजित पवार यांच्या बंडानंतर मोठ्या नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादीत झालेल्या मोठ्या बंडानंतर इतर पक्षांनीही सावध भूमिका घेतल्या आहेत. एकीकडे उद्धव ठाकरेंनी पक्षबांधणीसाठी विदर्भ दौरा केला.

तर कॉंग्रेसनेही हालचाली सुरू केल्या आहेत. आज राज्यातील कॉंग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी निवडणूकीच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सुचना दिल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज राज्यातील काँग्रेस (Congress) नेत्यांची दिल्लीत बैठक पार पडली. महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाचे नेते या बैठकीत उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikaarjun Kharge), केसी वेणुगोपाल तसेच राहुल गांधी (Rahul Gandhi) देखील या बैठकीत हजर होते. बैठकीत राज्य संघटनेतील बदल, निवडणुकीतील रणनीतीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

नाना पटोलेंची केली तक्रार...

तसेच, या बैठकीत महाराष्ट्र कॉंग्रेसमधील वादही समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. विदर्भातील नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची राहुल गांधी समोर तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. संघटनेत विश्वासात घेतलं जात नाही, तसेच विधान परिषद निवडणूकीत विश्वासात घेतले नसल्याची तक्रार या नेत्यांकडून करण्यात आली आहे.

निवडणूकीच्या तयारीला लागण्याचे आदेश..

या बैठकीत पक्षश्रेष्ठींनी राज्यातील नेत्यांना आगामी निवडणूकीच्या दृष्टीने तयारी सुरू करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तसेच महाराष्ट्र हा कॉंग्रेस विचारधारेचा प्रदेश असून महाराष्ट्राकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहेत. तसेच भारत जोडो यात्रेलाही महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळेच निवडणूकीच्या दृष्टीने तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: सामान्यांना धक्काबुक्की, सेलिब्रिटींना विशेष वागणूक; लालबागचा राजा मंडळावर टीकेची झोड

Sperm Quality: स्पर्म क्वालिटी वाढवण्यासाठी खा 'या' गोष्टी

Actress : त्याने स्पर्श केला अन्... प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत चित्रपटाच्या सेटवर गैरवर्तन, स्वत: सांगितली आपबिती

Cancer Vaccine: जग कॅन्सरमुक्त होणार? कॅन्सर रुग्णांसाठी मोठी खूशखबर

Ayush Komkar Funeral : माझी चूक नसतानाही मुलाची हत्या; मुलाला अग्नी देताना गणेश कोमकर ढसाढसा रडला

SCROLL FOR NEXT