Mahayuti News Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : मंत्रि‍पदासाठी महायुतीचा फॉर्मुला ठरला, सहा आमदारांमागे एक खाते

Maharashtra CM Devendra Fadnavis Government Formation : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार १६ डिसेंबरच्या आधी होण्याच्या शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.

Namdeo Kumbhar

Maharashtra Government cabinet expansion : महायुती सरकारची रचना निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिल्ली दौरा केला. अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबतच्या भेटीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहा आमदारांमागे एक मंत्रिपद, असा फॉर्म्युला या बैठकीत निश्चित झाला आहे. देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यामध्ये बुधवारी रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली. आज मुंबईमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.

सहा आमदारांमध्ये एक मंत्रिपद या फॉर्म्युल्यावर दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे समजतेय. याबाबत अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये खातेवाटपावर चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. अजित पवार, एकनाथ शिंदे यांना किती आणि कोणती मंत्रि‍पदे दिली जावीत, यावर चर्चा झाली. याबाबत लवकरच अधिकृत माहिती समोर येईल.

फडणवीस-अजित पवार दिल्ली, एकनाथ शिंदे मात्र ठाण्यातच -

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बुधवारी दिल्लीमध्ये पोहचले होते. फडणवीस यांनी भाजप नेत्यांसोबत चर्चा केली. तर दुसरीकडे अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत मंत्रि‍पदावर चर्चा केली. प्रफुल्ल पटेल यांच्या निवसस्थानावर बैठक पार पडली. यावेळी सुनील तटकरेही उपस्थित होते. फडणवीस आणि अजित पवार दिल्लीमध्ये असताना एकनाथ शिंदे मात्र ठाण्यातच होते. एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले नाहीत? याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.

अजित पवार यांचा प्लॅन बी -

मागील सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे ९ मंत्रि‍पदे आणि विधानसभेचे उपाध्यक्षपद होते. ते कायम राहावे, यासाठी अजित पवार आग्रही आहेत. पण राज्यातील मंत्रिपदाची संख्या कमी झाल्यास केंद्रातील एक मंत्रिपद आणि राज्यपालपद मिळावे, अशी मागणी अजित पवार यांनी केली. छोट्या राज्याचे राज्यपालपदासाठी अजित पवार आग्रही आहेत.

मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी?

मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही.खातेवाटपावर तोडगा न निघाल्यामुळे विस्तार रखडल्याचे समोर आलेय. त्यातच एकनाथ शिंदे दिल्लीला न गेल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. हिवाळी अधिवेशानाच्या आधी मंत्रिमंडळ विस्ताराचे कोडे सुटेल अशी शक्यता आहे. राजकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे समजतेय. त्यादिवशी मंत्र्यांचा शपथविधीही होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Badlapur Firing Jagdish Kudekar : "पोलिसांच्या चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे... "; जगदीश कुडेकर यांचं मीडियासमोर स्पष्टीकरण

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

SCROLL FOR NEXT