MHT CET Result 2024 Saam Tv
महाराष्ट्र

MHT CET Result 2024: एकच नंबर! महाराष्ट्र सीईटी परीक्षेत १३ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण; पाहा टॉपर लिस्ट

MHT CET Result News: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यामध्ये १३ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत.

Satish Kengar

राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. यामध्ये पीसीबी आणि पीसीएम विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

सीईटीचा निकाल तुम्ही cetcell.mahacet.org या वेबसाइटवर जाऊन पाहू शकता. यामध्ये तुम्ही टॉपर्सची यादी देखील पाहू शकता. टॉपर्सच्या यादीमध्ये विद्यार्थ्याचा रोल नंबर, नाव, लिंग, प्रवर्ग, त्यांच्या जिल्हा आणि एकूण मिळालेले गुण यांसारखे तपशील देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षेत पीसीएम गटात पहिला क्रमांक मिळविलेल्या उमेदवारांची यादी:

  • गोहिल हार्दिक प्रताप, मुंबई, १०० पर्सेंटाइल गुण 

  • उत्कर्ष पंत, ठाणे, १०० पर्सेंटाइल गुण 

  • जय हरेश मेहता, मुंबई, १०० पर्सेंटाइल गुण 

  • शाह तरंग ऋषिकेश, सोलापूर, १०० पर्सेंटाइल गुण 

  • देशमुख शार्वे शिवाजीराव, अकोला, १०० पर्सेंटाइल गुण 

  • कृती रविशंकर, मुंबई, १०० पर्सेंटाइल गुण 

  • कुलकर्णी अमोघ गुरुनाथ, पुणे, १०० पर्सेंटाइल गुण 

  • वाडकर सुरज नितीन, पुणे, १०० पर्सेंटाइल गुण 

  • सचित मोरेश्वर काळे, मुंबई, १०० पर्सेंटाइल गुण 

  • कामाक्षी वेंकटगणेश राममूर्ती, मुंबई, १०० पर्सेंटाइल गुण 

  • खेर मान सोनाली, मुंबई, १०० पर्सेंटाइल गुण 

  • मानवी बेंगानी, मुंबई, १०० पर्सेंटाइल गुण 

  • वेलासकर तंजील मन्सूरअली, मुंबई, १०० पर्सेंटाइल गुण 

कसा चेक करा निकाल

  • एमएचटी सीईटी रिजल्टच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  • एमएचटी सीईटी रिजल्टच्या लिंकवर क्लिक करा.

  • उमेदवारांनी त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

  • याशिवाय, कॅप्चा कोड देखील प्रविष्ट करा आणि लॉगिन करा.

  • एमएचटी सीईटी रिजल्ट २०२४ स्क्रीनवर दिसेल.

  • उमेदवारांनी सर्व तपशील काळजीपूर्वक तपासावे आणि ते डाउनलोड करावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : मलबार हिल मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा आघाडीवर

Horoscope Today: तूळ राशीच्या लोकांना आज जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल, वाचा तुमचे राशिभविष्य

Assembly Election Results : भाजप कार्यालयाबाहेर जय्यत तयारी, पाहा Video

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

SCROLL FOR NEXT