Maharashtra Cabinet Expansion Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Cabinet Expansion News: अखेर तिढा सुटला! 'या' दिवशी होऊ शकतो मंत्रिमंडळ विस्तार, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

Cabinet Expansion: अखेर तिढा सुटला! 'या' दिवशी होऊ शकतो मंत्रिमंडळ विस्तार, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Cabinet Expansion News: राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा कधी सुटणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गेल्या दोन दिवसांत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बैठकही झाली. यातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीला जात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाली. यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

सरकारनामाने दिलेल्या बातमीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे पुणे जिल्ह्यातील जेजुरी-मंचरचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पुढील दोन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, यासाठीच मुख्यमंत्री शिंद यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले असावे, असं बोललं जात आहे.

दोन दिवसांत खातेवाटप होणार : प्रफुल्ल पटेल

दिल्लीत अजित पवार यांच्यासोबत अमित शाह यांची भेट घेण्यासाठी गेलेले प्रफुल्ल पटेल यांनी खातेवाटप संदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले आहेत की, उद्या किंवा पर्वा म्हणजेच पुढील दोन दिवसांत खातेवाटप होईल. (Latest Marathi News)

पटेल म्हणाले आहेत की, अजित पवार सरकारमध्ये स्थापन झाल्यापासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट झाली नव्हती. त्यासाठी आम्ही आलो (दिल्लीत) आहे. ते म्हणाले, आधीची खाती ही भाजप आणि शिवसेनेकडे आहेत. कुठलं खातं काढून आम्हाला द्यायचं, नंतर त्या मंत्र्यांना कुठलं खाते द्यायचं याबाबत चर्चा सुरू आहे.

'उद्या संध्याकाळपर्यंत मंत्रीमंडळ विस्तार'

याच बाबत माहिती देताना पत्रकारांशी संवाद साधत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे म्हणाले आहेत की, ''उद्या संध्याकाळपर्यंत खाते वाटप आणि मंत्रीमंडळ विस्ताराचा प्रश्न निकालात निघाल्याचे आपल्याला कळेल. आमच्यात व्यवस्थित चर्चा सुरू आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

Crime: १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार, जबरदस्ती दारू पाजली नंतर चौघांनी...

Pigeon Shelters: हायकोर्टाचा आदेश धुडकावून मुंबईत टेरेसवर कबुतरखाने

OBC Reservation : मी लग्नासाठी तयार, आता लक्ष्मण हाके यांनी मुलगी द्यावी; मुंडावळ्या बांधलेल्या रमेश पाटलांचा व्हिडिओ व्हायरल

Pakistan Protest: जेन झी मैदानात पाकिस्तानात सत्तापालट? नेपाळनंतर पाकमध्येही तरुणाई आक्रमक

SCROLL FOR NEXT