Maharashtra Rain Alert: राज्यात पुढचे ५ दिवस महत्वाचे, विजांच्या कडकडाटासह पडणार मुसळधार पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

IMD Alert For Maharashtra: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढचे ५ दिवस ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Weather Update
Weather UpdateSaam Tv

Maharashtra Rain Update: राज्यात यावर्षी मान्सूनचे (Monsoon 2023) उशीरा आगमन झाले. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला. पण आता पाऊसाचा जोर (Maharashtra Rainfall) ओसरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे.

अशामध्ये हवामान खात्याने (Weather Department) राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढचे ५ दिवस ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये हलका स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवण्यात आला आहे.

Weather Update
Bharat Gogawale Comment on Aditi Tatkare : युतीत ठिणगी? पालकमंत्री पदासाठी आपले हपापणे आपल्या स्वभावाला साजेसे, NCPच्या आमदाराची भरत गोगावलेंवर टीका

मुंबईतल्या कुलाबा येथील प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे, मुंबई, अहमदनगर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर आणि उस्मानाबाद ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये पुढचे पाच दिवस ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार किंवा हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यापैकी काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. या जिल्ह्यांना पुढचे पाच दिवस हवामान खात्याने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

Weather Update
Darshana Pawar Death Case New Update: प्रेम प्रकरणातूनच दर्शनाची हत्या! तपास झाला पूर्ण, नवीन माहिती आली समोर....

तर, पालघरमध्ये १२ जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज असून येलो अलर्ट जारी केला आहे. तर १३ जुलै ते १६ जुलैपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये १२ आणि १३ जुलै रोजी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर १४ ते १६ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना १४ ते १६ जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला १३ जुलै ते १६ जुलैपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Weather Update
Company fire in Ambernath MIDC : अंबरनाथ MIDCमध्ये कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

तर, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये १२ ते १४ जुलैपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर १५ आणि १६ जुलै रोजी काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये १२ आणि १३ जुलै रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर १४ ते १६ जुलै रोजी घाटाच्या परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नंदुरबार, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये 12 जुलै रोजी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढचे चार दिवस ढगांच्या गडगडाटासह रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये सुरुवातीचे दोन ते तीन दिवस ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर १४ जुलै ते १६ जुलैपर्यंत रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com