Maharashtra Cabinet Expansion Latest marathi news Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Cabinet Expansion : शपथ तासांवर, मंत्रिपदाच्या फोनसाठी घालमेल, इच्छुक गॅसवर

State Cabinet Expansion : महायुती सरकारचा शपथविधी आज नागपूरमध्ये पार पडणार आहे. पण अद्याप मंत्रिपद कुणाला मिळणार, हे अधिकृतरित्या जाहीर झालेले नाही.

Namdeo Kumbhar

Maharashtra Cabinet Expansion : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होत आहे. नागपूरमध्ये दुपारी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे. शपथविधीसाठी फक्त काही तास उरले असतानाही अद्याप कुणालाही फोन गेले नाहीत, त्यामुळे इच्छुकांच्या मनाची घालमेल सुरू आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत मंत्रि‍पदाबाबतची अनिश्चितता कायम होती. मंत्रिमंडळात असणाऱ्या आमदारांना आज फोन जाण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. त्याआधी मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे.

५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. दहा दिवसानंतर महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला समोर आलाय. भाजप २१, शिंदेसेनेला १२ आणि राष्ट्रवादीला १० मंत्रि‍पदे मिळण्याची शक्यता आहे. मंत्रि‍पदाचा फॉर्म्युला ठरला असला तरी अद्याप महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या आमदारांना शपथ घेण्यासाठीचा निरोप फोनद्वारे येणार होता. मात्र, अद्याप कोणालाही फोन आलेला नाही. त्यामुळे इच्छुक आमदार गॅसवर आहेत.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इंद्रनील नाईकांना फोन आला आहे. नाईक हे पुसद विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. इंद्रनील नाईक मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यवतमाळ जिल्ह्यातून इंद्रनील नाईक यांचं नाव फायनल झालेय.

1991 नंतर पहिल्यांदाच नागपुरात होणार मंत्र्यांचा शपथविधी

1991 नंतर पहिल्यांदाच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी दुपारी ४ वाजता नागपुरात राजभवनमध्ये होणार आहे. 1991 मध्ये शिवसेनासोडून नागपूर अधिवेशनात छगन भुजबळ यांनी नऊ आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी नागपूरच्या राजभवनमध्ये तत्कालीन राज्यपाल सी सुब्रमानियम यांनी छगन भुजबळ आणि इतर आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली होती. नागपूर आणि विदर्भाचे राज्याच्या राजकारणात स्थान अधिक मजबूत करण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तारासाठी नागपूर निवडल्याची चर्चा सुरू झाली.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नागपुरात आगमन

महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे शनिवारी रात्री नागपूर येथे आगमन झाले. येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार व वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT