AIMIM latest controversy  
महाराष्ट्र

उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात बुलडोझर राज; निदाला आधार, मतीनचं घर जमीनदोस्त

Illegal construction demolition Maharashtra : संभाजीनगरमध्ये एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर मनपाने बुलडोझर कारवाई केल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. निदा खानला आश्रय दिल्याच्या आरोपानंतर झालेल्या या कारवाईवर AIMIM आणि शिंदेसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Snehil Shivaji

उत्तर प्रदेशनंतर आता महाराष्ट्रातही बुलडोझर राज सुरू झालंय. टीसीएस धर्मांतर प्रकरणातील निदा खानला आश्रय दिल्यामुळे एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर बुलडोजर फिरवण्यात आलाय... त्यामुळे एमआयएम आणि शिंदेसेनेत बुलडोजर राजवरून कसा वाद पेटलाय ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

पाहिलेत हे सात बुलडोझर, शेकडो पोलिस आणि मोठ्या प्रमाणात कर्मचारी घेऊन मनपानं एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर पहाटे ४ वाजता कारवाई केली. त्याचं अनधिकृत घर भुईसपाट केलं. एका घराला जमिनदोस्त करतांना ४-४ बुलडोझर लावण्यात आले. संभाजीनगरातील २ ठिकाणी झालेल्या कारवाईत मतीनची सर्व मालमत्ता उद्ध्वस्त केली. यात

नाशिक टिसीएस धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानला ज्या घरात मतीन आश्रय दिला आता तोच मतीन या कारवाईनंतर बेघर झाला. परंतू एवढ्या पहाटे करण्यात आलेल्या या कारवाईवर एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आक्षेप घेतला त्यावर पालिका आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलंय.

निदाला आश्रय दिल्याच्या आरोपावरुन एमआयएमचा नगरसेवक मतिन सध्या तुरुंगात आहे. आता त्याचं नगरसेवक पदही रद्द होण्याची शक्यता आहे. मात्र याच मतिनच्या कुटुंबियांनी मात्र पालिकेनं कारवाई केल्यानंतर पाहणीसाठी आलेल्या आयुक्तांचे हार गुच्छ आणि संविधान देऊन उपहासात्मक स्वागत केलं. तर इम्तियाज जलिल यांनी मतीनला पुन्हा घर बांधून देण्याचं जाहीर केलं. त्यामुळे पालकमंत्री संजय शिरसाटांनी जलील यांच्या थेट शहरी दहशतवादाचा आरोप केला.

युपीत योगीचं सरकार आल्यानंतर त्यांनी गुन्हेगारांच्या घरांवर अवैध प्रॉपर्ट्यांवर बुलडोझर फिरवत कारवाई केली होती. त्यामुळे त्यांना बुलडोझर बाबा असं देखिल म्हटलं जाऊ लागलं. आता असंच बुलडोझर राज महाराष्ट्रात सुरू झाल्याचं दिसतंय.

संभाजीनगरहून अक्षय शिंदेसह ब्युरो रिपोर्ट साम टिव्ही मराठी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT