Haridas Kapse Buldhana soldier death news 
महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण; जवान हरिदास कापसे देशसेवा करताना शहीद

Haridas Kapse : बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यदलातील हवालदार हरिदास मधुकर कापसे यांना उत्तराखंडमधील अतिउंचावरील भागात कर्तव्य बजावताना वीरमरण आले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानंतर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

Namdeo Kumbhar

संजय जाधव, बुलढाणा प्रतिनिधी

Maharashtra Mourns Brave Son: उत्तराखंड येथील अतिउंचावरील दुर्गम भागात कर्तव्यावर असताना बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र तथा भारतीय सैन्यदलातील हवालदार हरिदास मधुकर कापसे यांना वीरमरण आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शेलसुरसह संपूर्ण चिखली तालुक्यावर आणि बुलढाणा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

हवालदार हरिदास कापसे हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील शेलसुर येथील रहिवासी असून, सध्या त्यांचे कुटुंब चिखली शहरातील दांडे ले-आऊट येथे वास्तव्यास आहे. ते भारतीय सैन्यदलाच्या 'बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप' (BEG) मधील '४११ (स्वतंत्र) पॅरा फील्ड कंपनी, आग्रा' येथे कार्यरत होते. सध्या त्यांची नियुक्ती उत्तराखंड राज्यातील अतिउंचावरील सीमावर्ती भागात होती.

गुरुवारी, ७ ऑगस्ट रोजी कर्तव्यावर तैनात असताना कापसे यांना अचानक मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला. त्रास जाणवू लागल्याने ते स्वतः चालत जवळील वैद्यकीय कक्षात (Medical Room) गेले. तिथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर प्रकृती सामान्य वाटल्याने ते पुन्हा सैनिकाच्या निष्ठेने आपल्या कर्तव्यावर परतले. मात्र, काही वेळातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते अचानक खाली कोसळले.

त्यांना तातडीने पुन्हा वैद्यकीय कक्षात हलवून लष्करी डॉक्टरांनी वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. देशसेवेदरम्यान वीरमरण आलेल्या या शूर सुपुत्राला विविध क्षेत्रांतून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT