devendra fadnavis  Saam tv
महाराष्ट्र

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण सादर करणार? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

devendra fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पावर मोठं भाष्य केलं.

Vishal Gangurde

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावर

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण सादर करणार, याकडे साऱ्यांचं लक्ष

अर्थसंकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य

पराग ढोबळे, साम टीव्ही

अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अर्थसंकल्पाच्या एका महिन्याआधीच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झालं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण सादर करणार, यावर राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं भाष्य केलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर मोठं भाष्य केलं. अर्थसंकल्पावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'अजितदादांनी अर्थसंकल्पासंदर्भात भरपूर तयारी केली होतीय मी उद्यापासून लक्ष घालून ज्या काही प्रक्रिया आहेत. त्या पूर्ण करणार आहे. त्यानंतर आम्ही एकत्रपणे ठरवू.

सूनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या निवडीवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, 'कुठलाही निर्णय घ्यायचा असेल, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल, त्याच्या पाठीशी आम्ही सरकार आणि भाजप पक्ष म्हणून उभे राहू. अजितदादांचं कुटुंब असो किंवा राष्ट्रवादीचे पक्ष असेल. त्यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. त्यांच्या निर्णयाला आमचं समर्थन असेल'.

'राष्ट्रवादीचे नेते माझ्याशी चर्चा करून गेलेले आहेत. त्यांची कार्यपद्धती आणि काय पर्याय आहे, ते त्यांनी संदर्भात चर्चा केली. अंतिम निर्णय जो काही असेल तो त्यांचा पक्ष घेईल. त्या संदर्भात मी बोलणे योग्य होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

फडणवीसांनी यावेळी नागपूर आणि चंद्रपूरच्या महापौरपदावरही भाष्य केलं. 'नितीन गडकरी आमचे नेते आणि मार्गदर्शक आहेत. महापौरच्या निवडणुकासंदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली. त्या अनुषंगाने रूपरेषा ठरवण्यात आली आहे. जे काही नाव आहे, त्या नावाच्या अनुषंगाने निर्णय उद्या किंवा परवा घेतले जातील. ठरल्याप्रमाणे रूपरेषेनुसारच नाव अंतिम होतील. शहराध्यक्ष, आमदार हे निर्णय घेतील, असे भाष्य फडणवीसांनी नागपूरच्या महापौरपदाविषयी केलं.

चंद्रपूरच्या महापौरपदावरही फडणवीसांनी भाष्य केलं. 'आमची चर्चा झाली आहे.. त्या त्या ठिकाणचे जे प्रमुख आहेत, नेमकं काय करायचे त्या संदर्भातील पक्षाच्या रुपरेषेनुसार पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल, असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Paper Leak: पेपर फोडणारेच जनता सेवकाच्या वेशात,माफिया मोकाटच

Medical Admission: वैद्यकीय प्रवेशात मॅनेजमेंट कोटा बंद; जागा अडवणाऱ्या विद्यार्थ्यांवर 2 वर्षांची बंदी

School Closed: मोठी बातमी! पालघरमधील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांना उद्याही सुट्टी

Maharashtra News Live Update: गुजरातमधील मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेवर परिणाम; मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द

Angoori Rasmalai Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवा स्वादिष्ट अंगुरी रसमलाई रेसिपी

SCROLL FOR NEXT