Ajit pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Budget 2025 : 64 हजार 755 कोटींचा समृद्धी महामार्ग, काम किती टक्के पूर्ण झालं? अजित पवारांनी दिली खडानखडा माहिती

Ajit Pawar : अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यांनी राज्यातील अनेक प्रकल्पाशी संबंधित घोषणा केल्या. समृद्धी महामार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नेमकं काय म्हणाले अजित पवार?

Yash Shirke

Budget 2025 : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पामध्ये अनेक मोठ्या घोषणा अजित पवार यांनी केल्या. ते अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. विधानभवनामध्ये उपमुख्यमंत्री अर्थसंकल्प सादर करत आहेत. त्यांनी समृद्धी महामार्ग आणि मुंबई-पुणे महामार्गाशी संबंधित माहिती दिली.

'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी ६४ हजार ७५५ कोटी रुपये इतका खर्च झाला. इगतपुरी ते आमणे हा ७६ किमी लांबीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. या महामार्गाजवळ अ‍ॅग्रो-लॉजिस्टिक हब विकसित केले जाणार आहेत. त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज, पॅकिंग तसेच निर्यात हाताळणी केंद्राच्या प्रमुख सुविधा पुरवण्यात येतील', असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

'मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा यातील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण होईल. परिणामी प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हींची बचत होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल', अशी माहिती अजित पवार यांनी दिली. यासोबत त्यांनी मुंबई उपनगरातील प्रकल्पांवरही त्यांनी भाष्य केले.

अजित पवार म्हणाले, 'मुंबई उपनगर परिसरातील वाहतूक जलदगतीने व्हावी यासाठी वर्सोवा ते मढ खाडीपूल, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरीवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे ६४ हजार ७८३ कोटी रुपये किंमतीचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.' याशिवाय मुंबईमध्ये तिसरे विमानतळ होणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली. वाढवण बंदराजवळ हे विमानतळ असेल, या बंदराजवळ मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्टेशनदेखील असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT