अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून बजेटमधून महत्वाच्या घोषणा, महायुती सरकारकडून शेतकऱ्यांना काय मिळालं?
Maharashtra Budget 2024  Saam tv
महाराष्ट्र

VIDEO : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळालं? अर्थमंत्री अजित पवार यांची महत्वाची घोषणा, पाहा!

Vishal Gangurde

मुंबई : महायुती सरकारकडून आज शुक्रवारी पावसाळी अधिवशेनात राज्याचं अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आलं. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचं बजेट सादर केलं. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प महत्वाचा आहे. या बजेटमध्ये महिलांपासून शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या.

अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पातून शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवकांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण, अन्नपूर्ण योजना, पिंक रिक्षा या सारख्या महत्वाच्या योजनांचा समावेश आहे. तसेच अर्थमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी वीज माफीचाही महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना शेतकरी वीज बिल माफीची घोषणा केली. शेती कृषी पंपाचा बिल माफ करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला, अशी माहिती अर्थमंत्र्यांनी दिली.

अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा केल्या?

कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ५ हजारांचं हेक्टरी अनुदान जाहीर करण्यात आलं आहे. ५ हेक्टरच्या मर्यादेत असणाऱ्या शेतकऱ्यांना हे अनुदान दिलं जाणार आहे.

शेतकऱ्यांना मोफत उर्जेसाठी सौरऊर्जा प्रकल्पाचा लाभ घेता येईल. तसेच शेतकऱ्यांना दिवसा अखंडीत वीजपुरवठ्यासाठी निधी देण्यात येणार आहे.

गाईच्या दुधासाठी 5 रुपयांचे अनुदान प्रति लिटर देण्यात येईल. तसेच 1 जुलैपासून हे अनुदान देण्यात येणार आहे.

सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्ड करून 15000 कोटींचं दीर्घकालीन कर्ज मंजूर झालं आहे.

3200 कोटी रुपयांचा कार्यक्रम दुष्काळी भागात पाणी पोहचवण्याचा राबविण्यात येईल.

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी 15000 कोटींची व्यवस्था करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना 1 रुपयात पीकविमा देण्याची योजना कायम राहणार आहे. गाव तिथे गोदाम योजनेसाठी 341 कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

जलयुक्त शिवारासाठी 650 कोटीचा निधी देण्यात येणार आहे.

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास 25 लाखांची मदत देण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Airtel चा जबरदस्त आहे हा रिचार्ज, 28 दिवसांच्या प्लॅनवर फ्री मिळणार 3 महिने Disney+ Hotstar अन् अनलिमिटेड 5G डेटा

IND vs ZIM: मुकेश कुमार आणि आवेश खानच्या भेदक गोलंदाजीसमोर झिम्बाब्वे ढेर; १०० धावांनी टीम इंडियाचा विजय

Marathi Live News Updates : इंदापूर तालुक्यात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं जंगी स्वागत

Chhatrapati Sambhajinagar : भरधाव कारने दुचाकीला उडवलं; पती पत्नीचा जागीच मृत्यू, कारचालक फरार

Kalyan News: नदीवर फूले टाकण्यासाठी गेली अन् पडली; पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे वृद्ध महिलेला मिळालं जीवनदान

SCROLL FOR NEXT