Varandha Ghat News:  Saamtv
महाराष्ट्र

Varandha Ghat Closed: महत्वाची बातमी! वरंधा घाट ३० मे पर्यंत बंद; पर्यायी मार्ग कोणते?

Varandha Ghat News: वरंध घाटातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील 21 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची कामे करण्यात येणार असल्याने हा मार्ग बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Gangappa Pujari

सागर आव्हाड, पुणे|ता. ९ एप्रिल २०२४

Varandha Ghat Closed:

एक महत्वाची बातमी. पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंध घाट मार्गावरची सर्व प्रकारची वाहतूक 30 मे पर्यंत बंद राहणार आहे. वरंध घाटातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील 21 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची कामे करण्यात येणार असल्याने हा मार्ग बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंध घाट मार्गावरची सर्व प्रकारची वाहतूक 30 मे पर्यंत बंद राहणार आहे. वरंध घाटातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील २१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची कामं करण्यात येणार आहेत. यामध्ये वरंध घाटात रस्त्याचे दुपदरीकरण, संरक्षक भिंत बांधणे तसेच आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची कामे सुरू आहेत.

ही कामे सुरू असताना अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने हे आदेश काढलेत. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने घाट बंद ठेवण्याबाबत रायगडच्या पोलीस अधीक्षकांना आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग यांना अभिप्राय मागितला होता.

त्यानुसार त्यांनी हा रस्ता बंद करण्यास हरकत नाही असा अभिप्राय दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महाड, कोकणकडे जाणाऱ्या प्रवाश्यांनी ताम्हिणी घाट, अंबेनळी घाट या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असे आवाहन रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचा भाजप आणि पोलिसांवर गंभीर आरोप

Diljit Dosanjh: आधी देशात दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचे सरकारला ओपन चैलेंज,काय आहे प्रकरण?

Pitbull And Ieopard Fight: पिटबूल आणि बिबट्यामध्ये थरारक झुंज; दोघे एकमेकांवर पडले भारी, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ पाहिलात का?

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

SCROLL FOR NEXT