Loksabha Election: महाविकास आघाडीचं ठरलं! आज संयुक्त पत्रकार परिषद; पाडव्याच्या मुहूर्तावर अंतिम फॉर्म्युला जाहीर होणार?

Mahavikas Aaghadi Seat Sharing Formula: आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडत आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये सर्व फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे.
Uddhav Thackeray, Sharad Pawar
Uddhav Thackeray, Sharad PawarSaam Digital
Published On

Mahavikas Aaghadi Press Conference:

लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन आठवडे उलटले तरी राज्यातील महायुती अन् महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा काही सुटत नसल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगली, भिवंडी, तसेच मुंबईतील काही जागांवरुन वाद सुरू आहे. अशातच आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडत आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये सर्व फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज गुढी पाडव्याच्या (Gudi Padwa 2024) शुभ मुहूर्तावर राज्यातील महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडणार आहे. शिवसेना, काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस सह महाविकास आघाडीतील घटक पक्षांची ही संयुक्त पत्रकार परिषद ठाकरे गटाच्या शिवालय या कार्यालयात होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी नेते उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच जागावाटप आणि संपूर्ण निवडणुकीतील प्रचार यंत्रणा कशी राहील आणि अन्य तयारी संदर्भात महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मार्गदर्शन करतील. त्यामुळे आज महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा सुटणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Uddhav Thackeray, Sharad Pawar
Maharashtra Weather Forecast: विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अवकाळीची शक्यता; 'आठ' राज्यांमध्ये उष्णतेची लाट येणार

दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये सांगली तसेच भिवंडीच्या जागेवरुन अद्याप तिढा कायम आहे. सांगली लोकसभेसाठी ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच सांगलीमधून काँग्रेसचे विशाल पाटीलही लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत याबाबत अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Loksabha Election)

Uddhav Thackeray, Sharad Pawar
Maharashtra Election: पंकजा-धनंजय मुंडेंना साखर कारखाना आयता मिळालाय; बजरंग सोनवणे यांची टीका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com