Aaditya Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Saam Logo: तुमच्या लोगो सारखी रंगीबेरंगी होळी साजरी करा; आदित्या ठाकरेंचं मुंबईकरांना आवाहन

ताज्या घडामोडी, लेटेस्ट न्यूज अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तुमच्या लोगो सारखी रंगीबेरंगी होळी साजरी करा; आदित्या ठाकरेंचं मुंबईकरांना आवाहन

* जसा तुमचा लोगो आहे तशी रंगीबेरंगी होळी साजरी करावी असे मी मुंबईकरांना सांगेन

* माहुल विषयावर आज मी बोललो काही तांत्रिक विषयावर आम्ही काम करत आहे

* हवेचे प्रदुषण सगळीकडे आहे त्यावर काम करायला हवेत

* ओला-कचरा सुका कचरा यावर देखील आम्ही काम करत आहोत

IPS अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवला

* मुंबई पोलिसांनी आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव महाराष्ट्राच्या गृह विभागाकडे पाठवला आहे.

* त्रिपाठी त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या तपासावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुंबई पोलिसांनी आपल्या प्रस्तावात म्हटले आहे.

* त्रिपाठी यांच्यावर या प्रकरणाशी संबंधित अंगडियाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे, त्रिपाठी यांनी त्यांची तक्रार मागे घेण्यास सांगितल्याचाही आरोप आहे.

* त्रिपाठी आणि अंगडिया यांच्यातील या संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंगही मुंबई पोलिसांना मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.

* हे कॉल रेकॉर्डिंग स्वत: अंगडियाने (तक्रारदार) मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले होते.

प्रवीण दरेकरांची अटकपूर्व जामीनाची याचिका फेटाळली

मुंबई - मुंबै बँक प्रकरणात अटकेपासून दिलासा देण्यास आज उच्च न्यायालयाने नकार दिला. मजूर प्रकरणात दाखल गुन्ह्यात अटक करु नये, यासाठी दरेकरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने असा दिलासा देण्यास नकार देत अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात जाण्यास दरेकरांना सांगितले आहे.

राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार

(संभाजी थोरात)

कोल्हापूर - महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे संकेत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी दिले आहेत. माजी खासदार राजू शेट्टी सातत्याने महाविकास आघाडीवर टीका करत आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक धोरणांना शेट्टी यांचा विरोध आहे. राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारवरही शेट्टी टीका करत आहेत ...(सविस्तर वृत्त काही वेळात)

नारायण राणे आणि नितेश राणेंना अटकपूर्व जामीन

मुंबई - दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे....सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

नवज्योत सिद्धूंचा पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा

पंजाबमधील विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला सांगितला होता. त्यानुसार आज सकाळी सिद्धू यांनी या पदाचा राजीनामा दिली....सविस्तर वृत्त काही वेळातच

होळी धुळवड निमित्ताने पोलिसांची नियमावली

(रश्मी पुराणिक)

मुंबई - होळी निमित्त पोलिसांनी नियमावली जारी केली आहे. रात्री दहाच्या आत होळी लावणे बंधनकारक राहणार आहे. डी जे लावण्यास कायदेशीर बंदी करण्यात आली आहे. होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास कारवाई होणार आहे.

नितेश राणेंची राहुल कनाल यांची नोटीस

मुंबई - अभिनेत्री दिशा सालियन मृत्यू प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती राहुल कनाल यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावर राहुल कनाल यांनी नितेश यांना नोटीस पाठवली आहे....(सविस्तर वृत्त लवकरच)

पुण्यात 200 कोटींचा गृहप्रकल्प घोटाळा उघडकीस

(अश्विनी जाधव- केदारी)

पुणे -पुण्यात गृहप्रकल्प प्रकरणात वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे माळवाडी येथील 'रामनगर गृहरचना सहकारी सोसायटी'मध्ये तब्बल 200 कोटी रुपयांचा गृहप्रकल्प घोटाळा सोसायटीच्या चेअरमन आणि सेक्रेटरी यांनी मूळ सभासद असलेल्या मूळ सभासदांच्या हक्काच्या सदनिका भलत्याच लोकांना विकून ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे ...सविस्तर वृत्त लवकरच

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं वृद्धपकाळाने निधन

माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं वृद्धपकाळाने आज पहाटे निधन झाले.....

93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.....

भाजपच्या माजी आ.स्नेहलता बिपीन कोल्हे यांचे ते सासरे होते....

त्यांच्या कार्यकाळात सहकारमंत्री , कृषी मंत्री , परिवहन मंत्री, महसूलमंत्री असे मंत्री पद भूषवले आहे...

कोपरगाव तालुक्यातुन सलग ३५ वर्ष महाराष्ट्र विधिमंडळावर आमदार म्हणून निवडून आले आहे....

वयाच्या एकविसाव्या वर्षी सरपंच पदापासून राजकारणाची सुरुवात झाली...

त्यांनी पाठ पाण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला....

त्यांचा अंत्यविधी 4.30 कोपरगाव येथील इंजिनिअरिंग कॉलेज येथे होणार आहे...

गंगापूर पोलीस चौकीतच पोलिसांची ओली पार्टी

(अभाजीत सोनवणे)

नाशिक - गंगापूर पोलीस चौकीतच पोलिसांची ओली पार्टी

नागरिकांनी दिली थेट पोलीस चौकीत धडक

नागरिकांची गर्दी होताच पोलीस कर्मचाऱयांची पळापळ

थेट पोलीस चौकीतच ओली पार्टी करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी

ताज्या घडामोडी, लेटेस्ट न्यूज अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज

‘कोर्बेव्हॅक्स लसी’चा पुरवठा न झाल्याने नागपूरात आज १२ ते १४ वयोगटाचं लसीकरण नाही

(संजय डाफ)

- आरोग्य विभागाकडून नागपूर शहर आणि जिल्ह्यात ‘कोर्बेव्हॅक्स लसी’चा पुरवठा नाही

- लसीचा पुरवठा झाल्यानंतरच लसीकरण अभियान सुरू होईल

- नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांची माहिती

- शहर आणि जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्याने मुलांच्या लसीकरणाचे गांभीर्य वाढले

- आजपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होणार नसल्याने मुलं आणि पालकांचा हिरमोड

- नागपूरात आज ‘ कोर्बेव्हॅक्स लसी’चा साठा येण्याची शक्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई-पुणे रस्त्यावर भीषण अपघात; कंटेनरची २० वाहनांना धडक

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

Kiara Advani Skin Care: कियारा अडवाणीची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

पतीचं निधन, दुसऱ्या लग्नासाठी आईनं १० हजारांना मूल विकलं? नातवंडासाठी जीव तीळ तीळ तुटणाऱ्या आजीचा आरोप

Sansad Ratna Award 2025 : महाराष्ट्रातील ७ खासदारांनी दिल्लीत नाव गाजवलं; सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह निशिकांत दुबेंनाही संसदरत्न पुरस्कार

SCROLL FOR NEXT