Marathi News Live - Saam TV
महाराष्ट्र

Breaking: रश्मी शुक्ला यांना दिलासा...

साम टिव्ही लाईव्ह न्यूज, लेटेस्ट अपडेट्स ब्रेकिंग न्यूज

साम टिव्ही

रश्मी शुक्ला यांना दिलासा

आज मा. उच्च न्यायालयात रश्मी शुक्ला यांच्यावतीने पुणे आणि मुंबई येथील गुन्हे रद्द करण्यात यावे या याचिकेवर सुनावणी होती. परंतु न्यायालयीन कामकाजाच्या अपुऱ्या वेळेअभावी सदर याचिकांवर आज सुनावणी घेण्यात आली नाही.

मा.उच्च न्यायालयाने सदर प्रकरणात तातडीची गरज भासल्यास दि. 14 जून 2022 पूर्वी ही सदर याचिकेवर सुनावणी घेण्यात येईल असे याचिकाकर्ते व सरकारी पक्षास सांगितले व रश्मी शुक्ला यांच्या विरोधात दि.14 जून 2022 पर्यंत कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश सरकारी पक्षास दिले आहेत.

सोलापूरच्या CRPF जवानाला हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण

सोलापूर ब्रेकिंग -

- बार्शीतील कासरवाडीचे सीआरपीएफ जवान विठ्ठल खांडेकर यांना जम्मूमध्ये कर्तव्य बजावत असताना आलं वीरमरण

- हृदयविकाराच्या झटक्याने आलं वीरमरण

- दीड वर्षात होणार होते सेवानिवृत्त

- वीरमरण आल्याने संपूर्ण बार्शी तालुका शोकाकुल

- त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, एक मुलगी, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.

- राहत्या गावी शासकीय इतमामात केले जाणार अंत्यसंस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट उघड झाला आहे. ईमेलचा तपास एनआयएकडे देण्यात आला आहे. गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) धमकीचे ई-मेल मिळाले आहेत.

युक्तीवाद करताना अॅड सतीश उके भावूक झाले उकेंना अश्रू अनावर

-मला ताब्यात घेताना सांगण्यात आले नाही कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले जात आहे

-2016 मध्ये लोयां ची केस हाताळताना माझावर हल्ला झाला मी पोलीस तक्रार केली पण घेतली नाही माझा कार्यालयाची तोडफोड केली गेली.

-त्यानंतर मी उच्च न्यायालयात गेल्यावर उच्च न्यायालयाने त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

-जेव्हापासून मी वकील झाली तेव्हा पासून मी सामाजिक कार्यात आहे.

-या प्रकरणाच तपास आयुक्त बदलल्या नंतर नवीन तपास अधिकाऱ्याकडे देण्यात आले

-नंतर अधिकाऱ्याने बी समरी रिपोर्ट कोर्टात दाखल केला

-कोर्टाने खरूनिसाच्या प्रकरणात माझा बाजूने आदेश दिले.

-म्हणूनच माझं मनोबल खाच्ची करण्याचे ईडीचे प्रयत्न

-आज जर मी अटकेत नसतो तर फडणवीस आणि गडकरी याच्या सुनावणी साठी गेलो असतो.

-कोर्टाने पण फडणवीस यांचं प्रकरण गंभीर असल्याचे म्हंटले होते.

-मला या प्रकरणात जामीन द्यावा

-मी चौकशीत सहकार्य करीन.... सतीश उके यांची मागणी

-ईडी कडून या प्रकरणात निःसंशय तपास होऊ शकत नाही असे म्हटले

अंबरनाथमध्ये एका इसमाची गळा चिरुन हत्या

(अजय दुधाणे)

अंबरनाथ बदलापूर रोडवरील चिखलोली गावाच्या शेतात आढळला मृतदेह अंदाजे ३५ वर्षीय इसमाचा गळा चिरलेला मृतदेह आढळला पोलीस घटनास्थळी दाखल, मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू रात्रीच्या सुमारास हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज

अनिल देशमुख आणि सचिन वाझे CBI च्या ताब्यात जाणार

(सूरज सावंत)

मुंबई - अनिल देशमुख-सचिन वाझे यांनी कारागृहातील चौकशीत सहकार्य न केल्यानं कस्टडीत चौकशीची गरज असल्याचा सीबीआयने अर्ज केला होता. भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील चौकशीसाठी सीबीआयचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं स्वीकारला आहे. त्यामुळे देशमुख, वाझेसह संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचाही ताबा सीबीआयकडे जाणार आहे.

साम टिव्ही लाईव्ह न्यूज, लेटेस्ट अपडेट्स ब्रेकिंग  न्यूज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT