Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Marathi News Live Updates: बदलापूर आंदोलन प्रकरण; शाळेच्या तोडफोड प्रकरणी १० आंदोलकांना जामीन मंजूर

Maharashtra Breaking News Live Updates : आज गुरुवारी दिनांक २२ ऑगस्ट २०२४ आजच्या ठळक बातम्या, देशातील राजकीय घडामोडी, राज्यातील पावसाचे अपडेट्स, बदलापूर अत्याचार प्रकरण, काँग्रेस आंदोलन, एमपीएसी विद्यार्थी आंदोलन सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Vishal Gangurde

Badlapur : बदलापूर आंदोलन प्रकरण; शाळेच्या तोडफोड प्रकरणी १० आंदोलकांना जामीन मंजूर

शाळेच्या तोडफोडी प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या १० आंदोलकांना जामीन मंजूर झालाय.प्रत्येकी १५ हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आलाय. १० पैकी ४ आंदोलकांच्या जामीनदारांनी पैसे भरले आहेत. इतर ६ जणांना जामीनदार मिळाले नसल्याची माहिती आहे.

Assembly Election:  विधानसभा निवडणूका महायुती म्हणून लढायच्यात; अजित पवारांचे प्रवक्त्यांना कानमंत्र

आगामी विधानसभा निवडणूका महायुती म्हणून एकत्र लढायच्या आहेत.महायुतीमध्ये समन्वयाने काम करा.ज्या वक्तव्यामुळे महायुतीवर प्रश्न उभे होतील अशी वक्तव्य टाळा.

Washim Rain: वाशिममधील कारंजा शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस

वाशीमच्या कारंजा शहरात आज सायंकाळच्या सुमारास ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं शहरातील सखल भागात पाणी साचले असून अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वाशिम जिल्ह्यात सतत पाऊस होत असल्यामुळे पिकांना धोका निर्माण झाला असून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय.

Congress Shetkari Melava:  धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे काँग्रेस पक्षाचा शेतकरी मेळावा

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे काँग्रेस पक्षाचा शेतकरी मेळावा होत आहे. शेतकरी मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत. जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करून करण्यात आले जोरदार स्वागत करण्यात आले आहे. काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे.

Navi Mumbai:  मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कारमध्ये गोळीबार,तपास सुरू

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली हद्दीतील फूडमॉलला जाणाऱ्या बाह्य रोडवर एका कारमध्ये काही रक्ताचे डाग व बंधूकीच्या गोळीच काट्रेज सापडल्याने खळबळ उडाली आहे. कारमध्ये कोणीही नसल्याने प्रकरणाच गुढ अधिक वाढल आहे. खोपोली पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. कारमधील कागद पत्रानुसार नवीमुंबई मधील नेरुळ येथील हि कार असल्याचे निष्पन्न झाले आहे. फायरींगमुळे कारच्या पाठीमागील काचेला होल झाले असून रक्ताचे डाग ही दिसून येत आहेत. कारमधील व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. डॉग स्कॉड व फॉरेन्सिक लॅब चे स्कॉडला पाचारण करण्यात आले आहे.

Pimpri-Chichwad Accident पिंपरी चिंचवड शहरात डंपर ट्रक चालकाने दुचाकीस्वाराला चिरडलं

पिंपरी चिंचवड शहरातील चाकण पोलीस स्टेशन हद्दीत एका डंपर ट्रक चालकाने, एका दुचाकी स्वार युवकाला चिरडला आहे. आज दुपारी तीन वाजता दरम्यान चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील खराबवाडी या ठिकाणी रस्त्यावर ही दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत प्रमोद गोपीचंद सोनकांबळे हा 25 वर्षाच युवक ट्रक खाली चिरडून जागीच मृत्यूमुखी पडला आहे. विशेष म्हणजे प्रमोद गोपीचंद सोनकांबळे हा तरुण दुचाकी वर हेल्मेट घालून वाहन चालवत होता.तसेच तो वाहतुकीचे पूर्ण नियम पाळत असताना देखील त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Congress Mla:  इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांना कोरोनाची लागण

उद्या नाशिकमध्ये काँग्रेस पक्षाची आढावा बैठक आणि पदाधिकारी मेळावा होणार आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढवा घेतला जाणार आहे. त्या आधी आमदार हिरामण खोसकर यांना कोरोनाची लागण झालीय.

अंधेरीतील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावा; भाजप नेते यांची  पोलिसांकडे पत्राद्वारे मागणी

बदलापूर घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. बदलापूर सारखी स्थिती आपल्या विभागात होऊ नये यासाठी आता नागरिक देखील सतर्क झाले आहेत. अशातच भाजपा नेते मुरजी पटेल यांनी देखील बदलापूर प्रकरणाची पुनरावृत्ती अंधेरी पूर्व परिसरात होऊ, नये यासाठी पोलिसांना एक पत्र लिहिले आहे. अंधेरी पूर्व परिसरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली आहे. तसेच अंधेरीतील सुनसान रस्त्यावर सीसीटीव्ही बसवण्याची देखील मागणी केली आहे.

Pune News: ससून ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण, विशाल अग्रवालचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

ससून रुग्णालयातील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण मोठी अपडेट समोर आली आहे. विशाल अग्रवालसह ६ आरोपींचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले. विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल डॉ. अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हाळनोर यांचा जामीन फेटाळला.

Badlapur Case: बदलापूरमधल्या प्रकरणानंतर तातडीनं गृह सचिवपदी इक्बाल चहल यांची नियुक्ती

बदलापूरमधल्या प्रकरणानंतर तातडीनं गृह सचिवपदी इक्बाल चहल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हायकोर्टाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवरती इक्बाल चहल यांची गृह खात्याचे अप्पर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली. सध्या चहल मुख्यमंत्र्याचे अप्पर मुख्य सचिव आहेत. /2024] गेल्या काही दिवसांपासून गृह सचिव पद रिक्त होते.

Pune News: ससून ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण, विशाल अग्रवालच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू

पुणे ससून रुग्णालय ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल, डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हळनोर यांच्या जामीन अर्जावर आज निकाल लागणार आहे. पुणे सत्र न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू झाली आहे.

Nashik News: नाशिकमध्ये आदित्य ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीला अपघात

नाशिकमध्ये आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीला भीषण अपघात झालाय. आदित्य ठाकरे यांच्या गाडीमागे असलेल्या कार्यकर्त्याच्या गाडीला दुचाकीस्वाराने धडक दिली. अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला आहे.

Jammu Kashmir News: मल्लिकार्जुन खरगे,  राहुल गांधींनी  घेतली फारुख अब्दुल्लांची भेट

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी फारुख अब्दुल्ला यांची भेट घेतली.मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी कालपासून जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांनी आघाडी करून निवडणूक लढवाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. फारुख अब्दुल्ला यांनी काही दिवसांपूर्वीच आपण स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याची केली होती घोषणा.

PHD Exam Pune:  पीएच.डी. प्रवेश परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्यावतीने घेण्यात येणारी पीएच.डी. प्रवेश परीक्षेची (PET) तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

ही परीक्षा आधी शनिवार २४ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती. मात्र २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंद संदर्भातील बातम्या विविध प्रसारमाध्यमे/ वृत्तवाहिन्यावर प्रसिध्द झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी/विद्यार्थीनींना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास विलंब/अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षा २४ ऑगस्ट ऐवजी आता ३१ ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे.

Mumbai News: पाच वर्षांत एमएमआरचा जीडीपी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी निती आयोगाने केलेल्या अभ्यासाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द करण्यात आला. मुंबईचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) पाच वर्षांत दुप्पट करण्यासाठी सात विविध क्षेत्रांवर निती आयोगाने लक्ष केंद्रीत केले आहे. राज्याचा विकास हा दळणवळण आणि संपर्कांच्या पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो त्याच दृष्टीने राज्यात कामे सुरू आहेत. उद्योजकांची देखील महाराष्ट्राला पसंती असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

वर्षा निवासस्थानी निती आयोगासमवेत झालेल्या बैठकीस मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रमण्यम, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, निती आयोगाचे ओ पी अग्रवाल, प्रधान आर्थिक सल्लागार अँना रॉय, शिरीष संखे, यांच्यासह मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

Kolhapur Crime: १० वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; कोल्हापूर हादरलं

कोल्हापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापुरात दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या शिये गावातील राम नगर परिसरातील धक्कादायक घटना असून सबंधित मुलगी काल दुपारपासून बेपत्ता झाली होती. महायुतीचा आज लाडकी बहीण कार्यक्रम सुरू असतानाच उघडकीस आला प्रकार

Nanded News:  रस्त्यासह मूलभूत सुविधा द्या,अन्यथा देशाच्या सीमेवर लढणारे आमचे मुलं परत पाठवा- सैनिकांच्या वृद्ध आई वडिलांचा संताप

नांदेडच्या लोहा तालुक्यातील वागदरवाडी या गावाला रस्ता नाहीय,रस्त्यासोबतच मूलभूत सुविधा देखील नसल्याने गावकरी संतप्त झाले आहेत. वागदरवाडी गावातील जवळपास 300 जण देशाच्या सीमेवर सैनिक म्हणून कार्यरत आहेत.परंतु याच देशसेवा करणाऱ्या सैनिकांच्या गावात त्यांच्या वृद्ध आई वडिलांचे मूलभूत सुविधा अभावी प्रचंड हाल होत आहेत.दरम्यान रस्ता आणि मूलभूत सुविधा देण्याच्या मागणीसाठी मागील दहा दिवसापासून गावातील दोन जणांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.परंतु या उपोषणकर्तेची अद्याप दखल घेण्यात आली नाहीय.त्यामुळे वागदरवाडी येथील गावकऱ्यांनी सरकार विरोधात संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.गावाला रस्त्यासह मूलभूत सुविधा द्या,अन्यथा देशाच्या सीमेवर लढणारे आमचे मुलं परत पाठवा अशी मागणी या गावातील सैनिकांच्या पालकांनी केलीय.

Maharashtra Politics: चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्यात यावा, शिवसेना ठाकरे गटाची भूमिका?

ज्याच्या सर्वाधिक जागा, त्याचा मुख्यमंत्री..हे सूत्र मान्य नसल्याचे उद्धव ठाकरेंनी यापूर्वीच एका सार्वजनिक सभेत म्हटले आहे. यामुळं एकमेकांच्या जागा पाडल्या जातील अशी भितीही त्यांनी व्यक्त केली होती. १६ तारखेच्या मविआच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी करत त्या चेह-याला आपला पाठिंबा दर्शवला होता. परंतु यावर काँग्रेस आणि शरद पवार गटाने ठोस उत्तर दिले नव्हते, त्यामुळं पुन्हा आता किमान चार भिंतीच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याची भूमिका ठाकरे गटाने व्यक्त केल्याची सुत्रांची माहिती

Vikroli Accident News: विक्रोळीत भीषण अपघात,  दोघांचा मृत्यू

विक्रोळी पूर्वद्रुतगती मार्गावरील प्रवीण हॉटेल समोर रात्री 12:30 च्या सुमारास भरधाव वेगात असणाऱ्या कार चालकाचे गाडीवरून नियंत्रण सुटले आणि गाडी फूट पाथावरील झाडाला जाऊन जोरदार धडकली व काही अंतरावर जाऊन गाडी पलटी झाली यात चालक सिद्धार्थ ढगे व त्याच्या बाजूला बसलेला त्याचा मित्र रोहित निकम हे दोघे गंभीररीत्या जखमी झाले त्यांना तात्काळ जवळील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत्यू घोषित केले आहे या घटनेमुळे विक्रोळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Worli News: अमोल मिटकरींना वरळीतून उमेदवारी? बॅनर्स झळकल्याने चर्चा

आगामी विधानसभा निवडणुकीत अमोल मिटकरी वरळीचे संभाव्य उमेदवार असल्याचा बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे. वरळीच्या विविध भागात अमोल मिटकरींचे बॅनर झळकले आहेत. ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे सध्या वरळीचे आमदार आहेत तर मनसेकडून संदीप देशपांडे यांची उमेदवारी मनसेकडून निश्चित मानली जात असतानाच आता राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचे बॅनर झळकले आहेत.

Ratnagiri News: श्रीराम गिरी महाराजांच्या विरोधात रत्नागिरीत मोर्चा

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पंचाळे येथे श्रीराम गिरी नारायण महाराज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ रत्नागिरीत मुस्लिम समाजाने मोर्चा काढला.रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे मुस्लिमबांधवानी केल निदर्शन देखील केली. नारायणगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी शहरातील तमाम मुस्लिम बांधव पोलीसअधीक्षक कार्यालय येथे मोठ्या संख्येने जमले होते त्यानंतर पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.

Mumbai News: बदलापूर अत्याचार प्रकरण: मंत्री पियुष गोयल यांच्याकडून विद्यार्थी सुरक्षेचा आढावा

बदलापूर येथील शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरण पुढे आल्यानंतर आज उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मतदारसंघातील विविध पालिका शाळांची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षा संदर्भात आढावा घेतला. तसेच मुंबईच्या मालाड मीठ चौकी परिसरातील वैदिक पार्क परिसरात पाहणी करून वृक्षारोपण देखील केले. सोबत मतदार संघातील विविध कामांचा आढावा देखील गोयल यांनी यावेळी घेतला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना बदलापूर प्रकरणावर बोलताना म्हणाले अशा प्रकारे अत्याचार करणाऱ्या लोकांवर एकनाथ शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार कठोर कारवाई करणार असून फास्टट्रॅकवर हा हा खटला चालवला जाणार आणि न्याय मिळेपर्यंत मदत करणार असे आश्वासन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिले आहे.

Amravati News: महिलेवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

 पहाटे प्रातविधी साठी घराबाहेर पडलेल्या महिलेवर बिबट्याने पाठीमागून जीवघेणा हल्ला केला. हि घटना पाली पाथरट येथिल मावळत वाडीत घडली. इंदिरा शांताराम धाडवे महिलेवर पहाटे हल्ला झाला. हा हल्ला इतका तीव्र होता की बिबट्याने मानेवर झेप घेतली. या हल्ल्यात इंदिरा धाडवे गंभीर जखमी झाल्या असुन त्यांचे डोक्यावर 12 टाके पडले आहेत.तिला उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Mumbai News: खासदार वर्षा गायकवाड यांचा ईडी कार्यालयावर मोर्चा

मुंबई काँग्रेस अध्यक्ष, खासदार वर्षा गायकवाड यांचा ईडी कार्यालयावर धडक मोर्चा

अडाणी घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी काँग्रेसचा मोर्चा

ईडी कार्यालयाजवळ काँग्रेस कार्यकर्ते जमण्यास सुरुवात

काही वेळातच होणार मोर्चाला सुरुवात

ईडी कार्यालयाजवळ पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात

ईडी कार्यालया जवळ पोहोचण्या अगोदरच वर्षा गायकवाड आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना अडवण्याच्या पोलीस तयारीत

Kolhapur News : कोल्हापुरातील नामांकित कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवला, अज्ञात व्यक्तीचा फोन

कोल्हापूरमधील पेठवडगाव येथील बी वाय कॉलेज येथे बॉम्ब ठेवल्याचा अज्ञात व्यक्तीकडून फोन आलाय. बॉम्ब शोधकपथक आणि पोलीसांची एक टीम तात्काळ बी वाय कॉलेज येथे दाखल झालीय. संपूर्ण कॉलेजची पोलिसांकडून पाहणी करण्यात आली. मात्र, अशी कोणतीही वस्तू कॉलेजमध्ये आढळली नाही. संबंधित फोन केलेल्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू आहे.

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे गडचिरोलीत दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे गडचिरोलीत दाखल झाले आहेत. त्याचं इंदिरा गांधी चौकात कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आलंय. विधानसभा निहाय निरीक्षकांची बैठक होत आहेत. भाजपचा बडा नेता पक्ष प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Dharashiv News : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ धाराशिवकर आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ धाराशिवकर आक्रमक झालेत. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय. धाराशिव शहरातील नागरिक आणि हजारो विद्यार्थी - विद्यार्थीनी मोर्चात सहभागी झालेत. आरोपीला फाशी देण्याची मागणी केली जातेय.

Pune News : पुणे ग्रामीण पोलीस शिपाई पदाची परीक्षा पुढे ढकलली  

पुणे ग्रामीण पोलिस शिपाई पदाच्या भरतीसाठी शनिवारी होणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल,अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

Chhatrapati Sambhajinagar : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर शहरात महिला काँग्रेसचे आंदोलन

बदलापूर येथील आदर्श विद्यालयात दोन चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यभर पडसाद उमटत आहे. याच पार्श्वभूमीवर आज छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात काँग्रेसचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाल्याच दिसून आलंय. यावेळी राज्यसह केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलीय. यावेळी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती. दरम्यान ज्या शाळेत त्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला, ती शाळाच भाजप कार्यकर्त्याची असल्याचा आरोप काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केलाय.

Pandharpur News : बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ अकलूजमध्ये युवा सेनेचे आंदोलन

बदलापूर येथील घटनेच्या निषेधार्थ आज अकलूज येथे युवासेनेच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी नराधम आरोपीच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देत निषेध केला. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ही युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली.

Pune News :  पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन, शास्त्री रोडवर मोठी वाहतूक कोंडी

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. शास्त्री रोडवर सुरू असलेल्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी झाल्याचा पाहायला मिळतेय.

 Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे बारामतीच्या दौऱ्यावर

खासदार सुप्रिया सुळे या आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील सोमेश्वर मंदिरामध्ये जाऊन सोमेश्वराचे दर्शन घेतले. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पूजा आणि अभिषेक करण्यात आला.

Ahemdanagar News:  संगमनेरमध्ये बदलापूर घटनेच्या निषेधार्थ हजारो विद्यार्थिनी उतरल्या रस्त्यावर

बदलापूर येथे शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे महिला - मुलींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज संगमनेरमध्ये हजारो शाळकरी मुली रस्त्यावर उतरल्या होत्या.. शहरातून निषेध फेरी काढत बसस्थानकासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

Nashik News : नाशिक गुजरात राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प

नाशिक गुजरात राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प झालीय. कालपासून महामार्गावरील पेठमध्ये वाहतूक ठप्प आहे. पेसा नोकर भरतीसाठी गेल्या १२ पेक्षा जास्त तासांपासून आदिवासी संघटनांचे आंदोलन सुरूच आहे. आंदोलकानी रस्त्यावरच जेवण केलंय. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Pune  News : भोर तालुक्यातील तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

भोर तालुक्यातील तलाठी सुधीर दत्तात्रय तेलंग यांना लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आहेत. तक्रारदाराने रांजे गावात खरेदी केलेल्या २० गुंठे जागेची नोंद ग्राह्य धरण्यासाठी आणि सातबारा उता-यावर नोंद घालण्यासाठी तलाठी तेलंग यांनी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची मागणी केली होती.

Raj Thackeray : राज ठाकरे यांची अचानक मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वस्तीगृहाला भेट

राज ठाकरे यांनी भंडाऱ्यातील साकोली येथील मागासवर्गीय मुलीचे शासकीय वस्तीगृहात अचानक भेट दिली.

- बदलापूर घटनेनंतर राज ठाकरे यांनी मुलींशी साधला संवाद

- वस्तीगृह सुरक्षित आहे की नाही सीसीटीव्ही कॅमेरे आहेत की नाही? अशी विचारपूस राज ठाकरे यांनी मुलींशी केली.

Mumbai News :  मुंबईत अल्पवयीन दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार

मुंबईत अल्पवयीन दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.

कांदिवली येथील धक्कादायक घटना

मुलीचे आई वडील कामानिमित्त बाहेर गेले असल्याचं बघून शेजाऱ्याने साधली संधी

Thane News : रेल्वे प्रशासन समस्या सोडविण्यास अपयशी; प्रवाशांचं काळ्या फिती लावून आंदोलन

रेल्वे प्रवाशांचा विविध समस्या सोडविण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप करत प्रवाशांनी आंदोलन केलं. याचा निषेध करण्यासाठी आज ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने प्रवाशांना काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला. स्टेशन परिसरात या आंदोलनामुळे पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती.

Air india bomb threat :  एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी

एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी

मुंबई वरून तिरुअनंतपुरमला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी

तिरुअनंतपुरम विमानतळावर विमान सुरक्षित उतरलं.

विमानातील सर्व 135 प्रवासी सुरक्षित विमानाच्या बाहेर आले.

विमानतळावर हायअलर्ट जारी

Thane News : ठाणे रेल्वे स्थानकाजवळ प्रवासी संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून आंदोलन

विविध मागण्यासाठी आज ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे प्रवासी संघटनेचा वतीने काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात येणार आहे.

सकाळी 10 नंतर आंदोलन सूरू होईल

गुरावली रेल्वे स्थानक,15 डब्ब्यांच्या उपनगरीय सेवा या मागण्यासाठी आंदोलन

Kolkata doctor Case : कोलकाता महिला डॉक्टर लैंगिक अत्याचार प्रकरणाची आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी 

कोलकत्ता महिला डॉक्टर लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरण

आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

CBI आज स्टेटस रिपोर्ट कोर्टासमोर सादर करणार आहे.

आतापर्यंत CBI कडून ४ लोकांची चौकशी झाली आहेय

SC/ST आरक्षणावरील निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

सुप्रीम कोर्टाने SC/ST आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील जयश्री लक्ष्मणराव पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. इंदिरा साहनी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मागासवर्गीयांच्या उप-वर्गीकरणाबाबत केलेले स्पष्टीकरण SC/ST आरक्षणाला लागू होत नाही, असा दावा याचिकेत करण्याात आला आहे.

Nanded News : अज्ञातांनी केळीची 200 झाडे छाटली,शेतकऱ्याचे एक लाख रुपयाचे नुकसान

नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पाटनूर येथील पांडुरंग कराळे या शेतकऱ्याची केळीची जवळपास 200 झाडे अज्ञात व्यक्तीने छाटली आहेत. अपरिपक्व झालेले केळीचे झाडे कापल्याने शेतकऱ्याचे जवळपास एक लाख रुवयांचे नुकसान झाले आहेत. या प्रकरणी शेतकऱ्यांनी बारड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Mumbai News : गोकुळाष्टमीनिमित्त मुंबई पोलिसांकडून आदेश जारी 

गोकुळाष्टमीनिमित्त मुंबई पोलिसांनी आदेश जारी केले आहे.

पादाचाऱ्यांवर पाणी ओतणे, पाण्याचे फुगे मारणे तसेच गुलाल उधळण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे.

सार्वजनिकरित्या अश्लील शब्दांचा उच्चार करणे, घोषणाबाजी करणे तसेच अश्लील गाणी गाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

२६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून २७ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत आदेश लागू होणार आहे.

नियमांच उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनिमंतर्गत कारवाई होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT