Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Marathi News Live Updates: पुण्यातील सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी फुटली

Maharashtra Breaking News Live Updates : आज सोमवार दिनांक २७ ऑगस्ट २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स, आजच्या ठळक बातम्या वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

Pune Dahi handi : पुण्यातील सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी फुटली

राधे कृष्ण गोविंदा पथकाने ७ थर लावून ही दही हंडी फोडली. हंडी फोडल्यानंतर डी जेच्या तालावर तरुणाईचा जल्लोष केलाय. ९ वाजून ८ मिनिटांनी सुवर्णयुग मंडळाची दही हंडी फोडली.

Dahi Handi : मुंबईत 6 वाजेपर्यंत 63 गोविंदा जखमी झाल्याची नोंद

मुंबईत 6 वाजेपर्यंत 63 गोविंदा जखमी झाल्याची नोंद झालीय. यापैकी 8 जणांना ऍडमिट करण्यात आलंय. तर 32 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 23 जणांना उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलाय.

Nashik Accident:  वैतरणा घोटी रस्त्यावर पिकअप आणि टेम्पोचा अपघात

वैतरणा घोटी रस्त्यावर पिकअप आणि टेम्पोचा अपघात झालाय. टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो झाला पलटी झालाय. वैतरणा घोटी रस्त्यावरील सातूर्ली फाट्यावर ही घटना घडलीय. अपघातात पिकअप गाडीतील १० प्रवासी जखमी झालेत. जखमींना घोटीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी केला दाखल आहे.

Kolhapur:  कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेनंतर ठाकरे गटाचं सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन

काल जी घटना घडली आहे, त्यावर कोल्हापुरने जाहीर निषेध केला आहे. या देशात गेल्या 8-9 वर्षांत टक्केवारीचं सरकार आहे. कोणतीही कामे ही दर्जेदार होत नाहीत. मग ते मंदिर असो, दिल्लीचे एअरपोर्ट असो, संसद असो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्ट्राचार झाल्याचं आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आलाय.

जालन्यात भाजपच्या युवक कार्यकर्त्याकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मारहाण

जालन्यातील जाफराबाद तहसील कार्यालयामध्ये भाजपच्या युवक कार्यकर्त्याकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यात आलीय. क्रेशर मशीनविरोधात तक्रार केल्यामुळे ही मारहाण करण्यात आली आहे. भाजप माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष लोखंडे यांचे सुपुत्र सागर लोखंडे याने तक्रारदार प्रमोद फदाड यांना बेदम मारहाण केली आहे.

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांसह अन्य दोघांवर गुन्हे दाखल

सार्वजनिक बांधकाम विभाग मालवण कार्यालय तोडफोड प्रकरणी आमदार वैभव नाईक यांसह शिवसेना ठाकरे गटाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कोयना धरणाचे दरवाजे दुसऱ्यांदा उघडले

कोयना पाणलोट क्षेत्रात संततधार सुरु असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. धधरणाचा पाणीसाठा 100 टीएमसी झाला आहे. धरणातील पाणी साठा नियंत्रणासाठी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दुसऱ्यांदा 1 फूट 3 इंच उचलले. 10 हजार 355 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू केला आहे.

मालवणमधील घटनेनंतर कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गट आक्रमक

मालवण इथ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेचे पडसाद आज कोल्हापुरात उमटले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांच्या विरोधात आज कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय. केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत शासनाचा धिक्कारही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं.

Sharad Pawar: पुण्यात निसर्ग कार्यालयातील ऑफिसमध्ये शरद पवार दाखल

पुण्यात निसर्ग कार्यालयातील ऑफिसमध्ये शरद पवार दाखल झाले आहेत. शरद पवारांकडून कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. ५ वाजता शरद पवार मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.

Parbhani News: परभणीमध्ये शिवप्रेमींकडून मालवणमधील घटनेचा निषेध

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्याची घटना घडल्यानंतर राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिवप्रेमी ठिकठिकाणी या घटनेचा निषेध करत आहेत. शिवप्रेमींनी परभणी शहराच्या शिवाजी पुतळा परिसरात येथे मालवण घटनेचा निषेध व्यक्त केलाय.

Latur Crime News : बेपत्ता झालेल्या 65 वर्षाच्या व्यक्तीचा मल्लापुर शिवारात मृतदेह...

Latur Crime News : लातूरच्या उदगीर तालुक्यातील मल्लापुर शिवारात सात दिवसापूर्वी घरातून बेपत्ता झालेल्या 65 वर्षाच्या वृद्धाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. घटनेची माहिती मिळताच उदगीर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवून मृतांच्या नातेवाईकाला मृत देण्यात आला आहे तर पुढील तपास उदगीर पोलीस करत आहेत.

Marathi News : देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील - हर्षवर्धन पाटील

Marathi News : बावनकुळे हे ज्येष्ठ नेते आहेत, ते काय बोलले मला माहीत नाही. मी कोणाला भेटलो आणि बोललो नाही. अजित पवारांच्या दौऱ्यात चर्चा दिसत आहे की सीटिंग आमदारांना जागा देतील. तीन आठवड्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली होती. ते निर्णय घेतील, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

Crime News : पुणे प्रकरणाची  राज्य महिला आयोगाने घेतली दखल

Crime News : पुण्यात खराडी येथील नदीपात्रात एका महिलेचा विटंबना केलेला मृतदेह आढळला आहे. अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात असून पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्यासह गुन्ह्याचा तपास करत आहेत. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेत पोलिसांना विशेष टीम बनवून जलद तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.

Maharashtra Politics : विधानसभेची हंडी आम्हीच फोडणार - रामदास आठवले

Maharashtra Politics : महाराष्ट्रमध्ये पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. विधानसभेची हंडी आम्हीच फोडणार आहे.

लोकसभेला जे घडलं ते या वेळेला घडणार नाही, यावेळेला जनता आमच्या पाठीशी उभी राहील, आम्हला 180 पेक्षा जास्त जागा भेटतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले.

Marathi News : मालवण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणाचा राहुरी येथे निषेध

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्याची घटना घडल्यानंतर राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिवप्रेमी ठिकठिकाणी या घटनेचा निषेध करत आहेत. राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासह शिवप्रेमींनी आज राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे मालवण घटनेचा निषेध व्यक्त केलाय.

Ratnagiri News: रत्नागिरी: तरुणीवर लैंगिक अत्याचाराप्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी होणार

रत्नागिरीतील तरुणीवर लैंगिक अत्याचाराप्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी केली जाणार आहे. या पथकामध्ये यामध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे तांत्रिक तपास देखील सुरु आहे तसेच अनेक पथक यामध्ये काम करत आहेत.

Kolhapur NCP Protest:  शरद पवार गटाची कोल्हापुरात अनोखी निदर्शने,  महायुती सरकारचे काळे कारणामे पेपर प्रसिद्ध

दहीहंडीचा मुहूर्त साधत कोल्हापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झालाय. कोल्हापुरात महायुतीच्या सरकार विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अनोखं आंदोलन करत सर्वांचं लक्ष वेधले. महायुतीचे काळे कारणामे या आशयाचा पेपर प्रसिद्ध करून त्याचं वाटप कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये करण्यात आले. त्यामध्ये महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये केलेल्या कामाचा काळ्या कामांचा पंचनामा करण्यात आला आहे.

यामध्ये प्रामुख्याने वाढती गुन्हेगारी... बालकांविरोधातील गुन्हेगारी.. ऐतिहासिक वारसांची दुरावस्था.. बेरोजगारीचे संकट... मराठी माणसाची गळचेपी..महापुरुषांचा अवमान यांसह विविध पंचवीस मुद्द्यांचे काळे कारणामे यामध्ये नमूद करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील आणि शहराध्यक्ष आर.के. पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारचा पंचनामा करत हे अनोख आंदोलन केला आहे.

Pune News: पुण्यात शरद पवार- हर्षवर्धन पाटलांची भेट 

पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक संपली. या बैठकीनंतर शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात चर्चा सुरु असून बैठकीत राजकीय चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. सध्या हर्षवर्धन पाटील भाजप सोडून शरद पवार यांच्या पक्षात सामील होण्याच्या चर्चा सुरू आहेत. या पार्श्भूमीवर पवार पाटील यांच्यातली बैठक महत्वाची आहे.

K. Kavita Bail: मोठी बातमी! बीआरएसच्या के कविता यांना जामीन मंजूर

कथित दिल्ली दारू घोटाळा प्रकरण!

BRS नेत्या के कविता यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

ED आणि CBI या दोन्ही प्रकरणात कविता यांना जामीन मंजूर

Pune NCP News: राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सरकारविरोधातील दहीहंडी; मालवण घटनेचा निषेध

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष यांच्या तर्फे आज महायुती सरकार विरोधातील दही हंडी फोडण्याचा आली. दही हंडी शेजारी मुख्यमंत्री यांच्यासह उपमुख्यमंत्री यांचे फोटो लावण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी सरकार विरोधी घोषणा देत दही हंडी फोडली. महागाई, बेरोजगारी, महिलांच्या विरोधातील अत्याचार असे विषय घेऊन यावेळी कार्यकर्त्यांनी ही हंडी फोडली. त्यापूर्वी मालवण मधील घटनेचा निषेध म्हणून मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धअभिषेक घालण्यात आला.

Tapi River Flood: तापी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, सुरत शहरात पाणी शिरलं

तापी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून गुजरातच्या सुरत शहरात तापी नदीच्या पुरामुळे हाहाकार उडाला आहे. सुरत शहरातील अनेक भागात तापी नदीचे पाणी शिरले असून तापी नदीला आलेला पुरामुळे सुरत शहरातील अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. तसेच तापी नदी काठावरील मंदिरे आणि झोपड्या जलमय झाल्या आहेत.

Pune News: स्वप्निल कुसळेच्या नागरी सन्मानाकडे चंद्रकांत पाटलांनी फिरवली पाठ?

दहीहंडी उत्सवाच्या दिवशी पुण्यातील भाजपमध्ये ड्रामा सुरू झाल्याचा बघायला मिळाले पुण्यातील भाजपचे आमदार तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चक्क कोल्हापूरचे सुपुत्र आणि देशाची मान उंचवणारा निंबाच स्वप्निल कुसळेच्या नागरी सत्काराकडे पाठ फिरवल्याची बाप समोर आली आहे .आज पुण्यात त्यातही खास करून चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदार संघात होणाऱ्या दहीहंडी उत्सवाला त्या हजेरी लावणार आहेत मात्र बालेवाडी मध्ये होणारे एका दहीहंडी उत्सवाला चंद्रकांत पाटील जाणार नसल्याचं त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये नमूद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बालेवाडीतील या दहीहंडी उत्सवाला भारताचा आघाडीचा नेमबाज स्वप्निल कुसळे येणार आहे आणि या समस्त बालेवाडीतील ग्रामस्थांच्या सहकार्यातून उभारलेला तब्बल पाच लाखांचा निधी धनादेश देऊन धनादेश तब्बल पाच लाखांच्या निधीचा धनादेश देऊन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कुसळे यांना सन्मानित केलं जाणार होतं. मात्र आता चंद्रकांत पाटील या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याने बालेवाडी भागातील ग्रामस्थांचा मोठा हिरमोड झाल्याचं बघायला मिळते

Ahmednagar News:  मालवणमधील घटनेचा निषेध; राज्य सरकारच्या विरोधात टायरी पेटवत निदर्शने

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळत असून आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेटवर टायरी पेटवून सरकारचा निषेध करण्यात आला.. महाराजांचा पुतळा उभारताना राज्य सरकारने कोणतीही शहानिशा न करता टक्केवारी घेऊन त्या ठेकेदाराला काम दिलं त्याचा परिणाम आज महाराजांचा पुतळा कोसळला असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेटवरच टायर पेटवून निदर्शने करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर निमसे यांनी दिली आहे. तर दुसरीकडे अनेक गड किल्ले व पुतळे उभारण्यात आले मात्र आज तक आहेत अशी दुर्दैवी घटना घडली नसून यामध्ये राज्य सरकारने टक्केवारी घेत ठेकेदाराला काम दिला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे यांनी केला.

Gautami Patil In Mumbai Dahi Handi Festival: पाव्हणं जेवला का? दहीहंडी कार्यक्रमात गौतमी पाटीलचा जलवा

आमदार प्रकाश सुर्वे यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमाला लावणी कलाकार गौतमी पाटीलने हजेरी लावली. यावेळी गौतमी पाटीलच्या कातिल अदांनी जमलेल्या नागरिकांना भुरळ घातली.

Solapur News: मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांना टार्गेट करू नये, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांची जरांगे पाटलांना विनंती

मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या एक वर्षापासून आंदोलन करत आहेत.मराठा समाजाला ओबसीमधून सरसकट आरक्षण मिळावं अशी मागणी केली आहे.अशातच बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली आहे.

Worli Dahi Handi News: वरळीत दहीहंडीचा उत्साह, आयोजकांकडून गोविंदांची सुरक्षा वाऱ्यावर 

वरळीच्या जांबोरी मैदानात वरळी बावन चाळ प्रगती क्रीडा मंडळाने सहा थरांची सलामी देत परिवर्तन दहीहंडी उत्सवाची सुरुवात केली. या परिवर्तन दहीहंडीत गोविंदांची सुरक्षा वाऱ्यावर दिसली. कोर्टाने दिलेल्या आदेशात आयोजकांनी सेल्फी बेल्ट पुरवण्याचे बंधनकारक होते. मात्र भाजपच्या संतोष पांडे यांनी आयोजित केलेल्या हंडीत सेफ्टी बेल्टचा अभाव दिसून आला.तसेच मैदानात चिखल असताना सुरक्षा मॅटही नाहीत.

Chhatrapati Sambhajinagar News: विविध मागण्यांसाठी एस एफ आय चे विद्यापीठात डफडे बजाओ आंदोलन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील बंद इमारती सुरू करून प्रवेशित विद्यार्थ्यांना वस्तीग्रह उपलब्ध करून द्यावे,तसेच सर्व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना स्वतंत्र रीडिंग हॉल आणि इतर सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या या मागणीसाठी आज स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या(SFI) विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारती समोर डफडे बजाव आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केलाय.दरम्यान या वेळी विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Dhule News: शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत संपाचा ईशारा

शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने 29 ऑगस्ट पासून आपल्या प्रलंबित मागण्यासाठी बेमुदत संप पुकारण्यात आलेला आहे, आणि या संपामध्ये जवळपास 19 लाख शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे, या संपा संदर्भातील माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यातर्फे देण्यात आली आहे, या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून पूर्व सूचना संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.

राज्य सरकार व केंद्र सरकारने जी पी एस पद्धत पास केलेली आहे ती आम्हाला मान्य नाही असं म्हणत आम्हाला ओपीएस हीच पद्धत हवी आहे या मागणीवर हे सर्व शिक्षकेतर कर्मचारी ठाम असल्याचे म्हणत, गेल्यावेळी राज्य सरकारने व केंद्र सरकारने आमच्या आंदोलनादरम्यान दिलेली आश्वासन पळाली नसल्याचे म्हणत, आता यावेळी जोपर्यंत शासनातर्फे आम्हाला अध्यादेश मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे, यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.

Pune News: मालवणमधील घटनेच्या निषेधार्थ पुण्यात आंदोलन

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि या घटनेचा निषेध म्हणून, पुण्यातील डेक्कन जिमखाना येथे अखंड मराठा समाज व शिवप्रेमींकडून आंदोलन करण्यात आले. या वेळी छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या ठिकाणी झालेल्या आंदोलनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हा पुतळा उभारणार्‍या कॉन्ट्रॅक्टर वर कारवाई करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात आली.

Beed Rain News: डोकेवाडा प्रकल्प ओव्हरफ्लो; बीडकरांना दिलासा

पावसाने ओढ दिलेल्या बीड जिल्ह्यात गत 8 दिवसात दमदार पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे लघु व मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरु लागले आहेत.. बीडजवळील डोकेवाडा प्रकल्प तुडूंब झाला असून ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे. याचे जलपुजन भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे. या तलावातील पाणी आता पुढे बिंदुसरा प्रकल्पात पोहचत असल्याने तो प्रकल्पही लवकरच भरण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील महत्त्वाचा असलेल्या माजलगाव व मांजरा तलावातील पाणीसाठा अद्याप कमीच आहे. दरम्यान परतीच्या पावसातच यातील पाणीसाठा वाढू शकणार आहे...

 MP Vasantrao Chavan: वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, काँग्रेस नेत्यांची उपस्थिती

काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच्यावर आज नांदेडच्या त्यांच्या मूळगावी नायगाव येथे शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यविधीसाठी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, बाळासाहेब थोरात, खासदार अशोक चव्हाण, माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख,खासदार रजनीताई पाटील आदी नेते उपस्थित होते.

Bhandup Dahi Handi Utsav: भांडुपमध्ये दहीहंडीचा उत्साह, जय जवान पथकाकडून नऊ थरांची सलामी

भांडुप मध्ये जय जवान पथकाकडून नऊ थरांची सलामी दिलेली आहे. चार एके लावून जय जवान पथकाने ही नऊ थरांची सलामी दिली. भांडुप मध्ये मनसेच्या दहीहंडीमध्ये जय जवान पथकाने हे थर लावले आहेत. मनसेचे मोहन चिरात यांच्या दहीहंडीमध्ये जय जवान पथकाने ही विजयी सलामी दिलेली आहे.

Pune News: पुण्यातील हांडेवाडी परिसरात दहीहंडीचे आयोजन

पुण्यातील हांडेवाडी परिसरामध्ये प्रमोद नाना भानगिरे आयोजित धर्मवीर आनंद दिघे दहीहंडी उत्सव आज होत आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची ठाण्याची दहीहंडीची प्रथा पुण्यात सुरू केली आहे आणि हीच दहीहंडी पुण्यातील महत्त्वाचे आकर्षण झाली आहे. राज्यभरातील गोपाळ पथके जी दहिहंडी फोडण्याची वाट बघत असतात, तसेच ढोल पथकाची आणि, उत्कृष्ट डॉल्बी साऊंड सिस्टीम असलेली धर्मवीर आनंद दिघे दहिहंडी' येथे फोडण्यात येणार आहे. मोठी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात येत आहे. सुरुवातीला दहीहंडीला सलामी महिलांचं पथक देणार आहे. त्यानंतर वरळी येथील पथक दहीहंडी फोडणार आहे.

Kalyan  News : कल्याण चक्की नाका परिसरात रस्त्यावर लोखंडी कमान कोसळली

कल्याणमधील होर्डिंग कोसळल्याची घटना ताजी असतानाच आता कमान कोसळली आहे. कल्याण चक्की नाका परिसरात रस्त्यावर लावण्यात आलेली लोखंडी कमान कोसळली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कमान लावण्यात आली होती. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी हानी नसल्याची माहिती मिळतेय.

Pandharpur News : पंढरपुरात भीमा नदीला पूर; 25 कुटुंबांचे स्थलांतर

पंढरपूर शहरामध्ये दुपारनंतर भीमा नदीच्या पाण्याची पातळी ही वाढणार आहे. त्यामुळे शंभर कुटुंबांचे स्थलांतर करण्याची तयारी प्रशासनांना तयारी केली आहे. आज सकाळी नदीकाठी असलेल्या व्यास नारायण झोपडपट्टीत जाऊन तहसीलदार सचिन लंगोटे यांनी पाहणी केली.

Nashik News:  मनमाड-मालेगाव मार्गावर खाजगी बसची रिक्षाला धडक, 7 प्रवासी जखमी 

इंदोर-पुणे राज्यमार्गावर भरधाव जाणाऱ्या लक्झरी बसने मनमड जवळच्या दहेगावजवळ आटो रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात 7 जण गंभीर जखमी झाले असून त्यात 2 पुरुष, 2महिला व 3 लहान मुलांचा समावेश आहे. या सर्वांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Mumbai News :  मुंबईत दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सवाचे मोठ्या प्रमाणात आयोजन

मुंबईत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडी उत्सवाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले आहे. त्यातही सर्वात मोठी मानली जाते ती, आमदार राम कदम यांची दहीहंडी. घाटकोपर परिसरांतील श्रेयस सिनेमा चौकात या दहीहांडीचे आयोजन करणायात आलेय. आज दिवसभर सिनेकलाकारांच्या सोबत सुमधूर संगिताच्या साथीने आयोजन करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दहीहंडी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी आलेल्या महिलांसोबत बँक मॅनेजरची अरेरावी...

राज्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाले असून बँकेत पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी होते .. तर काही महिलांचे ई केवायसी राहिले आहे ते करण्या साठी बँकेत गर्दी करीत आहेत.. असे असताना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर पांग्रा या गावातील स्टेट बँकेत महिलांनी गर्दी केली होती .. मात्र, मजोर बँक मॅनेजर ने महिलांशी हुज्जत घालित अपमाणीत केले , त्यांना उद्धट बोलला , त्यामुळे महिलां रडताना दिसल्या.. मॅनेजर ने एका मूकबधीर महिलेला सुद्धा अपमानित केल्याने ती महिला आक्षरशा ढसाढसा रडली .. याची दखल घेत भाजपा प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी बँक गाठून बँक मॅनेजरची चांगलीच कान उघडणी केलीय .. ठिकठिकाणी बँक मॅनेजर महिलाना नाहक त्रास देत असल्याच्या असंख्य तक्रारी येत आहेत.. यावेळी बँकेत महिला सह ग्राहकांनी एकच गर्दी केली होती ..

Pune Crime News : पुण्यात तरुणीचा निर्घृण खून; डोके, हात, पाय कापून धड नदीपात्रात फेकले

Pune Crime News : पुणे शहरातून खुनाचा एक अतिशय भयानक प्रकार उघडकीस आला आहे. एका अनोळखी महिलेचा खून करून तिच्या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे करण्यात आले. खराडी येथील नदीपात्रात या तरुणीचे धड पोलिसांना आढळले आहे. खून झालेल्या या तरुणीचे वय अंदाजे १८ ते ३० इतके आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, खराडी परिसरात जेनी लाईट कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे. येथून जवळच असलेल्या नदीपात्रात एका महिलेचे हात पाय आणि डोके नसलेल्या अवस्थेत धाड असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. मयत तरुणीची ओळख अद्याप पटली नाही. या तरुणीचे वय अंदाजे १८ ते ३० इतके आहे.

अज्ञात इसमाने ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे धडापासूनचे शीर, दोन्ही हात खांद्यापासून, दोन्ही पाय खुब्यापासून धारदार शस्त्राच्या साह्याने कापून टाकले. त्यानंतर हे धड मुळा-मुठा नदीपात्रात टाकून दिले. अज्ञात व्यक्ती वरोधात त्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MNS News : शिवडी विधानसभेतील ठाकरेंच्या बालेकिल्ल्यावर भाजपसह मनसेचही लक्ष

शिवडी विधानसभेतील ठाकरेंच्या बालेकिल्ल्यावर भाजपसह मनसेचही लक्ष....

काळाचौकी येथील मैदानात माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्या जयंतीला राज ठाकरे लावणार उपस्थिती...

रात्री 8 वाजता राज ठाकरे काळाचौकी मैदानातील मनसेच्या दहीहंडीला लावणार उपस्थिती...

काळाचौकीच्या मैदानात 8 आणि 9 थरांचा थरार पाहायला मिळणार...

दहीहंडीच्या माध्यमातून राज ठाकरे साधणार संवाद

Sanjay Raut : संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल

महाराष्ट्र मध्ये छत्रपतींचा असा अपमान कधी झाला नाही औरंगजेब मोगल राज्याने हे अनेकदा हल्ले केले आमच्यावर पण छत्रपतींचा असा अपमान मोगल सरदार यांनीही केला नव्हता किंवा त्यांच्या राजांनाही केला नव्हता आग्र्यातून छत्रपती स्वाभिमानाने सोडून बाहेर आले पण आपल्याच राज्यात त्यांच्यावरती ही वेळ आली कोसळून पडण्याचे याला सर्वस्वी जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत मी फार काळजीपूर्वक सांगत आहे, असे संजय राऊत म्हणाले.

सार्वजनिक बांधकाम खात्याने हे काम केले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मर्जीतल्या ठेकेदारांना हे काम दिलं नेहमीप्रमाणे त्यात किती कमिशन मिळालं या लोकांना त्याचा हिशोब द्यावा लागेल ठेकेदार शिल्पकार हे सगळे ठाण्यातले असले अशी माहिती आली आहे ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे ते कारण काही सांगतील पण आज महाराष्ट्र दुखी आहे महाराष्ट्राच्या छातीमध्ये आरपार ही वेदना झाली आहे त्याची भरपाई कधी कोणीच करू शकणार नाही महाराष्ट्राचे तुकडे ज्या पद्धतीने झालेले आम्ही पाहिले महाराष्ट्रावरती अशी वेळ येईल हे पाहण्याची असे आम्हाला कधी वाटले नव्हते, असे राऊत म्हणाले.

Satyajeet Tambe : मालवण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी सत्यजित तांबे यांची फेसबुक पोस्ट -

ऊन, वारा, पाऊस यासोबतच परकीयांचे आक्रमण व तोफांचा मारा झेलूनही छत्रपती शिवरायांचे गड-किल्ले गेल्या चारशे वर्षांपासून दिमाखात उभे आहेत. सरकारने उभारलेला शिवरायांचा पुतळा मात्र एक वर्षही तग धरू शकला नाही हे फार मोठं दुर्दैव आहे.

गावोगावच्या विकासकामांमध्ये होणारा भ्रष्टाचार, आपल्या मर्जीच्या ठेकेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी राजकीय लोकांकडून होणारे गैरप्रकार यामुळे घडणाऱ्या घटना आपण बघतच आहोत...

- महाराष्ट्राच्या गावागावातील रस्त्यांची झालेली अवस्था.

- मुंबईतील "मनोरा" या आमदार निवास इमारतीचे उदाहरण.

- नवीन संसद भवनाला लागलेली गळती.

- सातत्याने होणारे रेल्वे अपघात.

- अनेक राज्यांत कोसळलेले पुल.

- देशातील ३ विमानतळांवर कोसळलेले छत.

- पुणे, मुंबई, दिली, नागपूर अशा शहरांत तुंबणारे पाणी

या घटना पाहता जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणारा आपला देश नागरिकांसाठी दर्जेदार प्राथमिक सुविधाही उभारू शकत नाही हे सत्य लपून राहत नाही. सरकार कोणाचेही असो भ्रष्टाचारामुळे "स्वाभिमान" मात्र संपूर्ण महाराष्ट्राचा जमीनदोस्त होत आहे.

बदलापूरच्या घटनेतील दोषींइतकीच कडक शिक्षा मालवणच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम करणारे ठेकेदार, त्यांच्या निवीदा प्रक्रियेवर ज्यांच्या ज्यांच्या सह्या आहेत ते सर्व अधिकारी, त्या ठेकेदाराचे बिल काढणारे सर्व अधिकारी या सगळ्यांवर झाली पाहिजे.

आणि हो, ही सगळी चौकशी करण्यासाठी फक्त दोन दिवस खूप होतील, व एसआयटी- फिसायटी ची गरजच नाही.

- सत्यजीत तांबे

Hingoli : दोन गावांना जोडण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास

Latest Marathi news : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येत असलेल्या ब्रह्मपुरी ते हनवत खेडा या दोन गावांना जोडणारा रस्ता उपलब्ध नसल्याने गावकरी नदीच्या पात्रातून जीवघेणा प्रवास करत आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची मागणी गावकरी करत आहेत मात्र लोकप्रतिनिधी सह प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने पावसाळ्यात पुराच्या पाण्यातून गावकऱ्यांना प्रवास करावा लागतो त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण होते दरम्यान प्रशासनाने तातडीने ग्रामस्थांच्या या समस्ये कडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे

Palghar News : 26 वर्ष तरुणाचा बुडून मृत्यू

पालघर - मित्रांसोबत पालघरच्या अस्वाली धरणात पोहण्यासाठी गेलेल्या 26 वर्ष तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे . पालघर मध्ये मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून यातच तलासरीच्या बोरीगाव येथील 26 वर्ष मार्मिक कोळी आपल्या मित्रांसोबत धरणात पोहण्यासाठी गेला होता . मात्र धरणात उलटून वाहणाऱ्या पाण्यात पोहत असताना तो नदीच्या प्रवाहात वाहून गेला . यानंतर स्थानिक त्यांच्या मदतीने काल उशिरा मार्मिक चा मृतदेह शोधण्यात पोलीस प्रशासनाला यश आलं . चारही बाजूने जंगल असल्याने अस्वली धरणात तरुण निसर्गाच्या सानिध्यात आनंद लुटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येत असतात मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सूचना फलक नसल्याने या धरणात अनेक वेळा अशा दुर्घटना घडून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याच चित्र आहे .

Rohit pawar News : आमदार रवी राणांवर आमदार रोहित पवार यांची टीका 

आमदार रवी राणांवर आमदार रोहित पवार यांची टीका..

लोकसभा निवडणुकीत पैसा वाटून पराभव झाला त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सुद्धा अशीच परिस्थिती असू शकते

इथंल्या आमदारावर नाराजी मोठ्या प्रमाणावर आहे हे जाणवलं

लोकांनी लोकसभा निवडणुकीत खासदार विरोधात निर्णय दिला

रवी राणा यांच लक्ष जमिनीवर जास्त असते व्यवसायावर जास्त असते दिवाळी आली की किराणा साड्या वाटलं की होऊन जाते असं त्यांचा समज

लोकसभा निवडणुकीत पैसा वाटून सुद्धा भाजप चा उमेदवार हरला आहे त्यामुळे विधान सभा निवडणूकित सुद्धा अशीच परिस्थिती असू शकते

Vishwajeet Patangrao Kadam :  राहुल गांधींच्या उपस्थितीत स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं होणार लोकार्पण - विश्वजीत कदम.

Vishwajeet Patangrao Kadam : काँग्रेसचे नेते व विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे 5 सप्टेंबर रोजी सांगली दौऱ्यावर येणार आहेत,अशी माहिती काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी दिली आहे.कडेगाव मध्ये स्वर्गीय माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या पूर्णकृती पुतळयाचे लोकार्पण सोहळ्यासाठी राहुल गांधी यांची उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे उद्घाटन आणि जाहीर सभा देखील पार पडणार आहे,या निमित्ताने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथअण्णा रेड्डी,माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील महाविकास आघाडीचे नेते देखील स्मारक उद्घाटन समारंभासाठी उपस्थित राहणार असल्याचे आमदार विश्वजीत कदम यांनी सांगितला आहे.त्याच बरोबर या निमित्ताने कडेगाव मध्ये राहुल गांधी यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा देखील पार पडणार असल्याचे विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केला आहे.

 badlapur case : आता मुख्यमंत्री का शाळेत पहारा देत बसणार का..? विरोधकांना आमदार गायकवाड यांचे वादग्रस्त प्रतिउत्तर

badlapur case : अत्याचार प्रकरणी विरोधक सरकार वर आगपाखड करत आहेत, मग आता मुख्यमंत्री का महाराष्ट्रातील सर्व शाळेत पहारा देत बसणार आहेत, की एसपी आरोपीच्या घरी जाऊन बसणार..! असे वादग्रस्त प्रतिउत्तर बुलढाण्याचे शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिलंय.

Pune News : पुणे शहरात डेंगी, चिकनगुनियाच्या साथीने थैमान

Pune News : पुणे शहरात डेंगी, चिकनगुनियाच्या साथीने थैमान घातले आहे, घराघरांत सर्दी, तापीने फणफणलेले रुग्ण आहेत. तरीही महापालिकेचा आरोग्य विभाग खोटी आकडेवारी देत आहे. औषध फवारणी करत नाही असा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात जोरदार आंदोलन केले. महापालिका आयुक्त भेटण्यास विलंब झाल्याने या पदाधिकाऱ्यांनी दालनात ठिय्या मांडून आयुक्त साहेब बाहेर या, महापालिका प्रशासनाचा निषेध, अशा घोषणा सुरु केल्या. आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची बैठक संपल्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.

Pune News : ससून रुग्णालयात ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण

Pune Latest Nes : पुण्यातील ससून रुग्णालयात ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरण

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या मित्रांचे रक्ताचे नमुने बदलले गेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

आदित्य सूद आणि आशिष मित्तल अशी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

गुन्हा घडल्यानंतर गुन्ह्यातील पुरावा नष्ट करणे, शासकीय दस्तऐवजात फेरफार करणे, गुन्ह्यातील अल्पवयीन मुलाला न्यायालयीन प्रक्रियेमध्ये बेकायदेशीरपणे सोडविण्यासाठी लाचेच्या स्वरूपात आर्थिक व्यवहार करणे, असे प्रकार झाले

Weather Update: पावसाचा जोर आजपासून कमी होण्याचा अंदाज

Pune Weather Update: सहा दिवसांपासून सुरू असलेला पावसाचा जोर आजपासून कमी होण्याचा अंदाज आहे.

किनारपट्टी, घाटमाथ्यावर मात्र हलक्या सरींची शक्यताकिनारपट्टी, घाटमाथ्यावर मात्र हलक्या सरींची शक्यता

किनारपट्टीवर गुजरातपासून केरळपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रीय असला तरीही किनारपट्टीवर पुढील चार, पाच दिवस पावसाचा जोर कमी राहील

पुण्यात आज सकाळपासून पावसाची विश्रांती

Crime News : पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना  पोलीस कोठडी

Pune Crime News : पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना ४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

निहालसिंग मन्नूसिंग टाक, राहुलसिंग उर्फ राहुल्या रवींद्रसिंग भोंड अशी अटक केलेल्या आरोपींचे नाव

भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर केला होता हल्ला

सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर आरोपींनी कोयता मारून केला होता हल्ला

सोलापूर मधून पळून जात असताना सोलापूर ग्रामीण पोलिस आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या आरोपींना घेतले होते ताब्यात

MPSC News : 20 ऑक्टोबर २०२२ चा तो शासन निर्णय रद्द 

Pune News : २०२२ पूर्वी एमपीएससी मार्फत जी पदे भरली जात होती. त्याच्या जाहिराती वेगवेगळ्या निघत असत. परंतु २०२२ ला सर्व ३३ विभाग एकत्र करून जाहिरात आयोग प्रसिद्ध करू लागले. तेव्हा पासून आयोग एकत्र ३३ संवर्गाच्या परीक्षा एकत्र घेत होतो. तो शासन निर्णय आत्ता रद्द केला आहे. त्यामुळे नवीन संवर्ग यात समाविष्ठ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आत्ता होणाऱ्या एमपीएससी च्या परीक्षा मध्ये कृषी विभागाच्या जागा समाविष्ठ होऊ शकतात.

Nanded News : खासदार वसंत चव्हाण यांच्या वर 11 वाजता होणार अंत्यसंस्कार.

Vasant chavan : नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांच्यावर 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.काल वसंत चव्हाण याचं हैद्राबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान दुःखद निधन झालं.चव्हाण यांच्या मूळगावी नायगाव येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यविधी साठी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन,खासदार अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत,खासदार कल्याण काळे यांच्यासह राजकिय पक्ष,सामाजिक संघटना तसेच विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित राहणार आहेत

Crime News : पोलीस असल्याची बतावणी करत वृध्दाला लुटले, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद 

नाशिकच्या येवला शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या गंगा दरवाजा परिसरात राहणारे वयोवृध्द केदार भावसार हे लाईट बिल भरण्यासाठी गेले असता दोघा अज्ञात चोरट्यांनी आम्ही पोलिस आहे तुम्ही हातात सोन घालून जाऊ नका सर्व सोन तुमच्या रुमालात बांधून घरी घेऊन जा असे सांगत त्यांच्या बोटातील ३ तोळ्यच्या दोन अंगठ्या रुमालात बांधत त्यांना खिशात घालण्यास सांगितले भावसार घरी गेल्यावर त्यांनी रुमाल उघडून पाहिले असता त्यात काहीच नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.चोरट्यांनी हात चलाखी करत त्यांना लूटल्याची सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून येवला शहर पोलिस त्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहे.

Dahi Handi : ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपचे जोरदार शक्तीप्रदर्शन

Mumbai News : शिवडीत भाजपकडून मराठमोळ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.

आमदार अजय चौधरी यांच्या मतदार संघात भाजपची मराठमोळी दहीहंडी करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार राहणार उपस्थित

सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक, शिव ठाकरे, प्रथमेश परब, यांच्यासह अनेक मराठी कलाकारांची हजेरी

गोपाळ शिवराम दळवी यांच्याकडून दहीहंडीचे आयोजन

Crime News : विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या टोळक्याला हटकल्याने शिक्षकाला मारहाण...

वाशिमच्या रिसोड तालुक्यातील रिठद येथील बसस्थानकावर विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या टोळक्याला शिक्षकानं हटकलं असताना या शिक्षकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीये.

रिठद येथील श्री शिवाजी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुली एस टी बसनं शाळेत ये जा करतात. त्यांना बस स्थानकावर सोडण्यासाठी गेलेल्या मारुती भिसडे या शिक्षकानं तिथे असलेल्या चिडीमारी करणाऱ्या मुलांच्या टोळक्याला हटकले असता त्या मुलांनी शिक्षक मारुती भिसडे यांना मारहाण केलीये, याप्रकरणी वाशिमच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून ठाणेदार श्रीदेवी पाटील या प्रकाराची पुढील तपास करत आहेत.

Dahi Handhi 2024 : तेजस्विनी महिला गोविंदा पथक दादरमध्ये दाखल

Mumbai Dadar News : दादरच्या आयडीएल बुक डेपोच्या गल्लीत दहीहंडी फोडण्यासाठी महिला गोविंदांची गर्दी जमण्यास सुरुवात केली आहे. अंधेरीच्या तेजस्विनी महिला गोविंदा पथक सध्या दादरमध्ये दाखल झालं आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या सातत्याने घटना घडत असताना महिला सक्षमीकरणाचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे.

Pandharpur News : पंढरपुरात भीमेला पूर ; आठ कुटुंबाचे स्थलांतर

उजनी आणि वीर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे भीमा नदीला पूर आला आहे. पंढरपुरातील व्यास नारायण आणि अंबाबाई पटांगणातील झोपडपट्टीत पाणी शिरले आहे. येथील आठ कुटुंबाचे सुरक्षीत स्थळी स्थलांतर केले आहे. उजनी धरणातून भीमा नदीत 80 हजार तर वीर धरणातून नीरा नदीत 43 हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. भीमा नदीला पूर आला आहे. पंढरपुरात भीमा नदी सुमारे एक लाख क्युसेक इतक्या विसर्गाने पुढे वाहात आहे. नदी पात्रातील सर्व मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे; अनेक गावाचा संपर्क तुटला 

नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावाचा संपर्क तुटलाय. अक्कलकुवा तालुक्यातील नवलपुर ते माळ रस्त्यादम्यान दरड कोसळली. नवलपुर ते माळ रस्त्यालगत आलेल्या गावादरम्यान अनेक गावांचा संपर्क तुटला. प्रशासनाने तात्काळ दरड हटवण्याची ग्रामस्थांनीची मागणी केलीय.

Latur Crime News : लग्नाचे आमिष दाखवून 20 वर्षीय मुलीवर अत्याचार

Crime News : राज्यात एकापाठोपाठ एक अशा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांचं सत्र सुरूच आहे. अत्याचार आणि बलात्कारांच्या घटना ताज्या असतानाच, लातूरच्या औसा तालुक्यात वीस वर्षीय मुलीला लग्नाचं दाखवून एका 23 वर्षीय आरोपीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाचे आमिष दाखवून मुली सोबत जवळीक साधली आणि यात पीडित मुलगी 7 महिन्याची गर्भवती असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान याप्रकरणी आता औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अत्याचार प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Nashik News : नाशिकमध्ये विहिरीत आढळले दोन मुलीचे मृतदेह

Nashik Latest News :  नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. कळवण तालुक्यात विहिरीत दोन मुलींचे मृतदेह आढळले आहेत. एकाच वेळी दोन मुलींचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. माधुरी मोरे (20 वर्ष) व गीतांजली एखंडे (13 वर्ष) असे दोन मुलींची नावे आहेत. पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या की हातपात याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

Maharashtra Politics : मी साहेबांना सोडलेलं नाही; अजित पवारांना बारामतीकर प्रतिसाद देणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Pune Bus Accident : बदलापूरहून २५ पर्यटकांना घेऊन मिनी बस तोरणा किल्ल्याकडे निघाली होती, १०० फूट खोल दरीत कोसळली

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

SCROLL FOR NEXT