पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलचे ब्रेक बाइंडिंगमुळे आग लागली आहे. विरार-अंधेरी गाडीचे ब्रेक बाइंडिंग झाल्यामुळे आग लागली. ब्रेक बाइंडिंगमुळे लागलेल्या आगीमुळे धूर निघाल्याने गाडीतील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. लोकलचे गार्ड अजित कुमार यांनी प्रसंगावधान दाखवत प्रवाशांना उतरवले. विरारवरून अंधेरीकडे येताना दहिसर स्थानकात प्रकार घडला आहे.
छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी सरकार अॅक्शन मोडवर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची अखेर बदली करण्यात आली आहे. अनिल पाटील सिंधुदुर्गचे नवे जिल्हाधिकारी असणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बैलपोळा उत्साहात साजरा झाला. पावसाळ्यामधील पहिला मोठा पाऊस आणि सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचा आनंद बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतकऱ्यांमध्ये दिसून आला.
वनराज आंदेकर खून प्रकरणात पोलिसांनी आरोपींना आज न्यायालयात हजर केले होते. संजीवनी जयंत कोमकर, जयंत कोमकर, कल्याणी गणेश कोमकर,गणेश कोमकर आणि सोमनाथ गायकवाड यांना अटक केली होती. यातील संजीवनी आणि कल्याणी या वनराज यांच्या सख्ख्या बहिणी आहेत. गोळीबार केलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विविध पथके रवाना करण्यात आले आहेत.
जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आता 88 टक्क्यांवर पोहचलाय. दोन आठवड्यापूर्वी तीन टक्क्यावर असलेले धरण आता संपूर्ण भरण्याच्या मार्गावर आहे. हॅलो आज सकाळपासून जायकवाडी धरणातील नाथसागरात पाण्याच्या लाटा उसळत आहेत. पिण्याच्या पाण्यासोबतच उद्योग आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. धरणाचा पाणीसाठा आणखी वाढणार आहे त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाईल, दृष्टीने गोदा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
राज्यातील ITI मध्ये आत्मसंरक्षणाचा वर्ग घेतले जाणार आहेत. प्रत्येक शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विद्यार्थिनीसाठी आत्मसंरक्षाचे प्रशिक्षण वर्षभर देण्यात येणार आहेत. वर्षभर महिलांसाठी कराटे, जुडो, यासारख्या स्वरक्षणाच्या पायाभूत प्रशिक्षणाच्या आठवड्यातून कमीत कमी २ तासिका घेण्यात येणार, असल्याची माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलीय.
मालवणमधील घटनेचा शिवप्रेमींकडून राज्यभरात निषेध व्यक्त केला जात असून अंबरनाथमध्येही महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना जलाभिषेक करत राज्य सरकारविरोधात शाब्दिक जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
लातूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून संततदार पाऊस सुरू आहे. मागच्या 24 तासात 65 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे . तर जिल्ह्यातून वाहणाऱ्या मांजरा ,रेना, तिरू,मण्यार ,तेरणा नदींना पाण्याचा प्रवाह वाढला आहे. तर जिल्ह्यातील शेती पिकाच प्रचंड मोठ नुकसान झाले आहे.
शहरातील अनेक भागात जोरदार पावसाच्या सरी. हवामान विभागाकडून आज अकोला यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खाजगी सचिव बिभव कुमार यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. बिभव कुमार हे 18 मेपासून जवळपास 100 दिवस तुरुंगात आहेत. आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी विभव यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर विभव यांना अटक करण्यात आली होती.
आज बैलपोळा तर शेतकऱ्यांसाठी हा बैलपोळा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. बैलपोळा म्हणजे बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे,अमरावती मध्यवर्ती कारागृहात विविध प्रकारची शेती करण्यात येते. त्यामुळे या ठिकाणी बैल जोडी आहे. त्यामुळे आजच्या दिवशी अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
309 किलो मीटरचा हा मार्ग असणार आहे. JNPT पोर्टसोबत कनेक्टिव्हिटीसाठी याचा फायदा होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील कांदा, सोयाबीन या पिकांच्या दळणवळणसाठी फायदा होणार आहे.
शिवडी परिसरात १९ वर्षीय मुलीचा इमारतीच्या टेरेस वरून पडुन दुर्दैवी मृत्यू
इमारतीच्या टेरेसवर तरुणी झोपली असताना झाला अपघात
चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून झोपेत पडून मृत्यू झाल्याची माहिती
कशिष शेख ऊर्फ कशिष कसबे नावाच्या तरुणीचा मृत्यू
शिवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत केली तपासला सूरवात
कोल्हापुरच्या वाहतूक कोडींत शरद पवारांचा ताफा अडकला
पोलीस व्हँन ही बंद पडल्याने वाहतूक कोडींत आणखीन पडली भर
वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची तारांबळ
शरद पवार 3 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर
समरजित घाटगे आणि आमदार सतेज पाटील यांनी केलं शरद पवारांचं स्वागत
जळगाव जिल्ह्यात आज पावसाने हजेरी लावली या पावसाने जळगाव जिल्ह्यातील जामनेर शेंदुर्णी येथील सोन नदीला पूर त्या ठिकाणी अनेक गावांना जोडणारा रस्त्याच्या पुलावरून पाणी वाहताना आपल्याला बघायला मिळत आहे सध्यातरी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून जोवर पाणी उतरत नाही तोवर रस्त्यावरून जाण्यास मनाई करण्यात आली आहे
महाराष्ट्रामध्ये एक फार मोठा दंगली घडवण्याचा कट रचला गेला जात आहे... मालवण नंतर रत्नागिरीमध्ये काल रात्री मारुती मंदिर जवळ मावळ्यांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यात आली. या घटना फार विचार करून आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या आहेत. हिंदू समाजाने आता मागे हटायचं नाही, यांचा बंदोबस्त आता करावाच लागेल.
शिरूर तालुक्यातील जांबुत येथे बेल्हे - जेजुरी महामार्गावरील येथे ट्रक चालकाकडून एसटी बस चालकाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रक चालक हा एसटी चालकाला मारहाण करताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीये. बेलापूर स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवेवर परिणाम झालाय. पनवेलकडे आणि सीएसएमटीकडे जाणऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत सेवा ठप्प राहणार आहे.
देशात सामाजिक आणि जाती आधारित जनगणना करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली. हा सरकारचा निर्णय असेल त्यामध्ये आम्ही काही करू शकत नाही, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले.
IC814 या वेबसीरीजवरून नेटफ्लिक्स कंटेंट हेडना माहिती प्रसारण मंत्रालयाचे समन्स बजावण्यात आले आहे. नेटफ्लिक्सच्या कंटेंट हेडना उद्या हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. IC814 या कंदाहार विमान हायजॅकप्रकरणी तयार करण्यात आलेल्या वेबसिरीजमधून नेटफ्लिक्सने दहशतवाद्यांची मुस्लिम नावे जाणीवपूर्वक लपवल्याचा आरोप केला आहे.
यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील नार्लेगाव येथील पैनगंगा नदीच्या पुलावर पाणी आली आहे. त्यामुळे नागपूर बोरी- तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. नागपूर-बोरी, तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
दक्षिण भारतात पडत असलेल्या सततच्या पावसाचा फटका रेल्वे प्रवासाला
आंध्र प्रदेश आणि तेलंगणात झालेल्या जोरदार पावसामुळं 100 ट्रेन कॅन्सल
कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळं आतापर्यंत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती
आजही हवामान खात्याकडून अलर्ट दिला गेला असल्यान प्रशासन सज्ज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला असून सर्व मदत करणार असल्याची ग्वाही दिलीय
लोकल पकडताना महिला प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या गॅपमध्ये अडकली. प्रवाशांनी चैन पुलिंग केल्याने लोकल थांबली. महिलेला आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी प्रवाशांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले.
सोमनाथ कोमकर, जयंत कोमकर, सोमनाथ गायकवाड या तीन जणांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे
दोन आरोपींना विश्रामबाग पोलीस स्टेशन च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार आणि त्यांच्या पथकाने अटक केली
१३ ते १४ जणांनी वनराज वर हल्ला केला मात्र वनराज गोळीबारात नव्हे तर त्याच्यावर झालेल्या हत्याराने केलेल्या हल्ल्यात मृत्यमुखी पडला
पूर्ववैमण्यस्य आणि प्रॉपर्टी मधून झालेल्या वादातून हा प्लॅन केलेला हल्ला हो
मुंबई :- राज्यातील प्रमुख शहारापैकी एक असलेल्या पुण्यामध्ये खळबळजनक घटना घडली आहे. शहरात भर चौकात गोळ्या घालून एकाची हत्या करण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का? असा सवाल त्यांनी केला. आपल्या एक्स हँडलवरून जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
सोलापूरच्या मोहोळमध्ये राहत्या घरात पंख्याच्या छताला गळफास घेऊन महिला डॉक्टरची आत्महत्या
डॉ. रश्मी संतोष बिराजदार असं आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरचे नाव
मोहोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे आकस्मित मृत्यूची नोंद,मोहोळ पोलीस करतायत पुढील तपास
मात्र मोहोळ शहरातील नामवंत डॉक्टराने अचानक आत्महत्या केल्याने नागरिकांमध्ये व्यक्त केली जातीय हळहळ
हिंगोली जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे शेतकरी व व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे या सर्व भागाची पाहणी करून हिंगोली चे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आढावा घेतला आहे. ज्या भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले अशा नागरिकांना तातडीने स्वस्त धान्य दुकानातून तातडीने गहू तांदूळ साखर पुरवठा करण्याच्या सूचना खासदार अष्टीकर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
Rain : हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात पुराच्या पाण्यात वीस शेतकरी अडकले
देवजना गावातील शेतकरी शेतातील आखाड्यावर अडकले
जनावरांच्या गळ्याला पुराचे पाणी लागत असल्याचे व्हिडिओ मध्ये शेतकऱ्यांनी दाखवले
प्रशासनाने शेतकऱ्यांची व जनावरांची तातडीने सुटका करावी म्हणत शेतकऱ्याने व्हिडिओ केला रेकॉर्ड
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्याची सुरुवात ही करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने संपूर्ण मंदिर ताब्यात घेतले आहे.
आप आमदाराच्या घरी ED ची छापेमारी सुरू आहे. आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्या घरी टीम दाखल झालीय. आज ED कडून अटक केली जाणार असल्याची आमदाराची माहिती मिळतेय. दिल्ली वक्फ बोर्डाशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात ही छापेमारी असल्याची माहिती मिळतेय. मला अटक केली तरी माझं काम माझी टीम आणि पक्ष सुरूच ठेवणार असल्याचं खान म्हणाले आहेत.
सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल यांच्याकडे व्हाट्सअपवर राजीनामा पाठविला आहे. पक्षांतर्गत गटबजीला कंटाळून राजीनामा दिल्याची सोलापुरात चर्चा सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने शहराध्यक्षाने राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी समोर नवा अध्यक्ष नेमण्याचे आव्हान आहे.
वनराज आंदेकर यांच्या खुनाचा सीसीटीव्ही समोर आलाय. वनराज आंदेकर यांचा काल पुण्यातील नाना पेठेत खून करण्यात आला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलीय. त्यांच्यावर गोळ्या झाडून खून केल्याची घटना काल पुण्यात घडली.
लालबाग परिसरात बस अपघातामध्ये तरुणीचा मृत्यू झालाय. रविवारी रात्री लालबाग परिसरात बसची ९ जणांना धडक बसली. जखमी ९ पैकी ८ जणांवर उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. एकाचा मृत्यू मृत्यू झालाय. बेस्ट बसच्या चालकावर कारवाई होणार का ? बेस्ट प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष आहे.
पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये ९९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पुणे जिल्ह्यातील ४ धरणांत मिळून २८ टी एम सी पाणीसाठा आहे. टेमघर धरणात १०० टक्के पाणीसाठा, खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग सध्या बंद आहे. खडकवासला ९३.३१ टक्के, पानशेत ९८.९७ टक्के, वरसगाव ९९.१० टक्के, टेमघरमध्ये १०० टक्के पाणीसाठा आहे.
धाराशिव जिल्ह्यात 24 तासापासुन संततधार पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील काही ठिकाणी नदीला पूर आला आहे. तर काढणीला आलेल्या मुग उडीद या पिकांचे नुकसान झाले आहे.धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात तीन आठवडे उघडलेल्या पावसाने आज जोरदार हजेरी लावली आहे गेली. 24 तासापासुन सुरू झालेल्या संततधार पावसामुळे ऊस, सोयाबीन आधी पिकांना या पावसाचा फायदा होणार असला तरी काढणीला आलेला उडीद आणि मूग या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.