Breaking News Live Updates Saam TV
महाराष्ट्र

Breaking News Live Updates : वैजापूरचे उपजिल्हाधिकारी डॉ. अरुण जराड यांना जमावाची मारहाण

प्रविण वाकचौरे

वैजापूरचे उपजिल्हाधिकारी डॉक्टर अरुण जराड यांना जमावाची मारहाण

वैजापूर शहरात मांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी उपजिल्हाधिकारी अरुण जराड हे गेले होते . ज्या ठिकाणी मांजा उपलब्ध नव्हता, त्या ठिकाणी असलेल्या काही तरुणांना मारहाण केल्याचा आरोप वैजापूर शहरातील नागरिकांनी केला. त्यानंतर शहरातील नागरिकांचा मोठा जमाव पोलीस ठाण्यामध्ये जमला. उपजिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. त्याच वेळेस उपजिल्हाधिकारी तिथे दाखल झाल्यानंतर त्यांना मारहाण आणि धक्काबुक्की झाल्याचे सांगितलं जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता याचिकांच्या सुनावणीचा मुहूर्त ठरला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अपात्रता याचिकांच्या सुनावणीचा मुहूर्त ठरला आहे. उद्या म्हणजे मंगळवारपासून या सुनावणीला सुरुवात होणार आहे. मंगळवारी चार वाजता ही सुनावणी होणार आहे. ३१ जानेवारीपर्यंत निकाल देणे बंधनकारक आहे. लवकरात लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

धक्कादायक! नायलॉन मांजामुळे चार वर्षीय चिमुरडीचा पाय कापला

नायलॉन मांजावर बंदी असताना त्याचा खुलेआम वापर होत असल्याचे समोर आले आहे. नाशिकच्या येवल्यात तीन दिवसाचा पतंग महोत्सव साजरा होत आहे. याचदरम्यान संध्याकाळच्या सुमारास शहा कॉलनी परिसरात पायी जात असताना आयेशा अन्सारी या चार वर्षीय मुलीच्या पायात नायलॉन मांजा अडकून तिच्या पायाला खोलवर जखम झाल्याची घटना घडली आहे. या मुलीला तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच या मुलीच्या पायाला पाच टाके लावण्यात आले आहे.

हात घालायला गेला तर, हात भाजल्याशिवाय राहणार नाही; मराठा आरक्षणावरून राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. 20 तारखेला जरांगे पाटील हे मराठ् घेवू न मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. त्याच पार्श्वभूमिवर राजू शेट्टी यांनी जरांगे पाटलांसोबत चर्चा केली. यावेळी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला राजू शेट्टी यांनी जाहीर पाठिंबा दिली.

'ज्या शेतकऱ्यांच्या विषयी आम्ही लढतो, त्याच मराठा शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जरांगे लढत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने आता अंत पाहू नाही , विषयाची परीक्षा घेऊ नाही. हात घालायला गेला तर हात भाजल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी सरकारला दिला.

राहुल गांधी यांनी लग्न करावं, त्यांना साथीदाराची गरज ; रामदास आठवलेंचा सल्ला

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांना लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. 'राहुल गांधी सध्या एकटे असून त्यांना साथीदाराची गरज आहे. दलित समाजात अनेक उच्चशिक्षित मुली आहेत. त्यांनी दलित समाजातील मुलीशी लग्न करावे, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे.

ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर यांच्यावर अटकेची टांगती तलवार

- ललित पाटील ड्रग्स तस्कर प्रकरणी ससून रुग्णालयाचे डीन संजीव ठाकूर यांच्यावर अटकेची टांगती तलवार

- पुणे पोलिसांकडून संजीव ठाकूर यांची दोन वेळा केली चौकशी

- ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून संजीव ठाकूर यांची दोन वेळा करण्यात आली चौकशी

- ड्रग्स तस्कर ललित पाटील यांचा ससून रुग्णालयात मुक्काम वाढवण्यासाठी संजीव ठाकूर यांनी ललित पाटीलला मदत केल्याचा आरोप

अंगणवाडी सेविका कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रयत्न करु; मंत्री सामंत यांचं आश्वासन

मंत्री उदय सामंत यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. 'मला त्यांनी याचिका का केली माहित नाही, पण मला अंगनवाडी कर्मचाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की, आम्ही त्यांचं मानधन वाढून देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे ते म्हणाले.

विद्यापीठ सिनेट निवडणुकीविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

सिनेट निवडणुकीविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक, कार्यक्रमावर हायकोर्टाचं शिक्कामोर्तब

नव्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर झाली अंतिम सुनावणी

तपशीलवार आदेश अपलोड झाल्यानंतर आम्ही त्याला माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर आव्हान देणार, याचिकाकर्ते सागर देवरे यांनी माहिती

झेपत नसेल तर राजीनामा द्या, अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनावरुन सदावर्तेंची अदिती तटकरेंवर टीका

अंगणवाडी सेविकांचं आंदोलन हे सरकारचे अपयश

महिला बालकल्याण मंत्री यांनी प्रकरणी संवेदनशील राहिले पाहिजे

झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्या

गुणरत्न सदावर्ते यांची आदिती तटकरे यांच्यावर टीका

धाराशिव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा

धाराशिव : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा

शेतकरी कर्जमुक्तीसह कांद्याची निर्यात बंदी उठवावी, यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी आक्रमक

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित शेतकऱ्यांना राजु शेट्टी करणार संबोधित

मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी सहभागी.

प्रसिद्ध रेडिओ जॅाकी संग्राम खोपडे लोकसभेच्या रिंगणात

प्रसिद्ध रेडिओ जॅाकी संग्राम खोपडे लोकसभेच्या रिंगणात

पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी संग्राम इच्छुक

पुणे लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज

आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांचे पुत्र आहेत संग्राम

2014 च्या लोकसभा निवडणुकीत ते बारामती मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे उमेदवार होते

गुणरत्न सदावर्ते यांची अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाविरोधात हायकोर्टात याचिका

गुणरत्न सदावर्ते यांची हायकोर्टात जनहित याचिका

अंगणवाडीचे जे आंदोलन सुरू आहे त्यांच्याविरोधात याचिका

गेल्या महिन्याभरात आंदोलन सुरू असल्यामुळे 74 हजार बालके कुपोषित झाल्याची माहिती कोर्टात दिली

लसीकरण आणि गर्भवती महिला यांचे आंदोलनामुळे हाल झाल्याचं जनहित याचिकेत म्हटले आहे

तसेच याप्रकरणी जे बालक कुपोषित झाले, त्यांची चौकशी करण्याची मागणी सुद्धा केली आहे.

पुणे-बंगळुरू महामार्गावर साताऱ्यातील आनेवाडी टोलनाक्यावर ठाकरे गटाचा रस्ता रोको

पुणे बंगळुरू महामार्गावर साताऱ्यातील आनेवाडी टोलनाक्यावर ठाकरे गटाचा रस्ता रोको

आनेवाडी आणि तासवडे टोलनाक्यावर साताऱ्यातील नागरिकांना टोल माफी मिळावी अशी मागणी

आंदोलनामुळे महामार्गावर वाहनाच्या रांगा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भगिनी राजेश्वरीबेन शाह यांचे आज सकाळी मुंबई येथे निधन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भगिनी राजेश्वरीबेन शाह यांचे आज सकाळी मुंबई येथे निधन झाले. एअर ऍम्ब्युलन्सद्वारे त्यांचे पार्थिव अहमदाबादला हलवण्यात आले असून तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

अमरावतीत शेतकऱ्याची आत्महत्या, आर्थिक विवंचनेतून संपवली जीवनयात्रा

अमरावतीत शेतकऱ्याची आत्महत्या

बुधागड येथील दादाराव तानोळकर असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव

अवकाळी पाऊस, सततची नापिकी, पिकांवर होणारा रोगांचा प्रादुर्भाव यातून तोटा सहन करावा लागत होता

नवी मुंबईतील उरणमध्ये भीषण आग, चिर्ले गावाजवळ कंटेनर यार्डमध्ये उडाला आगडोंब

नवी मुंबईतील उरणमध्ये भीषण आग

चिर्ले गावाजवळ असणाऱ्या कंटेनर यार्डमध्ये लागली आग

वैष्णव कंटेनर यार्डला लागली भीषण आग

अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

आग विझविण्याचे प्रयत्न सुरु

Uran Fire

नागपूर : मांजामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी उड्डाणपूल दुचाकींसाठी बंद

नागपुरात पतंग उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र या उत्साहावर जीवघेण्या नायलॉन मांजाने विर्जन पडतंय. त्यामुळेच नागपूर पोलिसांनी खबरदारीच्या अनुषंगाने शहरातील उड्डाणपुलावर जाण्यास मज्जाव केलाय. मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता वाहतूक पोलिसांना वाकोल्या दाखवत जाताना दिसून येत आहे. यातच बर्डीकडे जाणाऱ्या मार्गावरील पूल वाहून गेल्याने रस्ता बंद असल्यानं दुचाकी चालवणारे नागपूरकर लांब फेरा वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाशी खेळ करताना दिसून येत आहे.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची या आठवड्यात बैठक होणार

मनोज जरांगे पाटील यांचा 20 तारखेला मुंबईत होणाऱ्या मेळाव्यासाठी राज्य सरकारची या आठवड्यात बैठक होणार

मुंबईतील नियोजन, वाहतूक, क्राउड मॅनेजमेंट, कायदा सुव्यवस्था संदर्भात शासनाचे अधिकारी माहिती घेऊन अहवाल तयार करणार

या आठवड्यात होणाऱ्या कॅबिनेटमध्ये संबंधित माहितीचा अहवाल राज्य सरकारसमोर ठेवला जाणार

जरांगे पाटील यांच्या आंदोलनापूर्वी शासनाकडून तातडीच्या बैठकीचे आयोजन

बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय मुलाचा मृत्यू, अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावातील घटना

बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावातील घटना

घराजवळील शेतात मुलावर बिबट्याचा हल्ला

अथर्व प्रवीण लहामगे या 9 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

अनेक दिवसापासून बिबट्याचा परिसरात मुक्तसंचार

वन विभागाचा हलगर्जीपणा मुलाच्या जीवावर बेतला

वेळीच बिबट्याला जेरबंद केले असते तर टळली असती घटना...

काँग्रेसचे दोन विद्यमान कार्याध्यक्ष आणि दोन माजी राज्यमंत्र्यांचा लवकरच भाजपात प्रवेश होणार- आशिष देशमुख

आशिष देशमुखांचा दावा भाजप नेते

काँग्रेसचे दोन विद्यमान कार्याध्यक्ष आणि दोन माजी राज्यमंत्र्यांचा लवकरच भाजपात प्रवेश होणार

मिलिंद देवरांनंतर काँग्रेसचे अनेक नेते भाजपच्या संपर्कात

मिलिंद देवरा यांच्यासारखे अनेक नेते नाना पटोले यांना कंटाळले आहेत

मागील वेळी एक खासदार काँग्रेसकडे होता, यंदा भोपळा असणार आहे

मुंबईतील काळाचौकी परिसरात भीषण आग, सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती

मुंबईतील काळाचौकी परिसरात भीषण आग

सिलेंडरचे स्फोट झाल्याचीही माहिती समोर येत आहे

साईबाबा म्युन्सिपल स्कूल, काळाचौकीला आग लागल्याची नियंत्रण कक्षाकडून माहिती

आगीचं कारण अद्याप अस्पष्ट

घटनास्थळी १० अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना

दुबईहून न्हावाशेवा बंदरात आलेल्या कंटेनरमधून १० कोटी ८० लाख रुपयांच्या सिगारेटचा साठा जप्त

दुबईहून न्हावाशेवा बंदरात आणलेल्या कंटेनरमधून १० कोटी ८० लाख रुपयांच्या परदेशी सिगारेटचा साठा जप्त करण्यात महसूल गुप्तवार्ता संचलनालयाला (डीआरआय) यश आले आहे.

चायनीज व्हिस्कोस कार्पेट म्हणून घोषित केलेल्या मालामध्ये विदेशी सिगारेटचा कंटेनर होता.

यामध्ये जवळपास ६७ लाख २० हजार सिगारेट जप्त करण्यता आल्या आहेत. त्यांची किंमत १० कोटी ८० लाख रुपये आहे.

दुबईच्या जेबेल अली बंदरावरून सिगारेटचा साठा न्हावा शेवा बंदरात पाठवण्यात आला होता.

यामध्ये कोरियामध्ये तयार केलेल्या सिगारेटचा समावेश आहे.

कुणबी आरक्षणाबाबत आज किंवा उद्या आणखी एक अध्यादेश सरकार काढणार- बच्चू कडू

कुणबी आरक्षणाबाबत आज किंवा उद्या आणखी एक अध्यादेश सरकार काढणार

यापूर्वीच्या कुणबी दाखल्याबाबतच्या अध्यादेशात जे मुद्दे नव्हते त्या इतर मुद्द्यांचाही समावेश केला जाणार, बच्चू कडू यांची माहिती

दिल्लीतील दाट धुक्याचा पुण्यातील विमान सेवेवर परिणाम

दिल्लीत मोठ्या प्रमाणात धुके असल्यामुळे त्याचा थेट परिणाम विमान सेवेवर होत आहे. या धुक्यामुळे पुणे ते दिल्ली विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन पुणे विमानतळ प्रशासनाने केले आहे.

खराब हवामानामुळे पुण्यातून दिल्लीसह उत्तर भागातील प्रयागराज, राजकोट, अहमदाबाद या सहा विमानांची उड्डाणे काल सकाळी रद्द करण्यात आली. तर दुपारनंतर आणखी चार विमानांसह दक्षिणेकडील चेन्नईला जाणारे एक विमान उड्डाण रद्द करण्यात आले.

त्यामुळे एकूण १० विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.वारंवार विमान उड्डाणे रद्द होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

नवी मुंबईतील तळोजा येथे तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

नवी मुंबईतील तळोजा येथे तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न.

तळोजा फेज 1 ला तळोजा फेज 2 शी जोडणाऱ्या उड्डाण पुलावरून मारली उडी.

प्रेम प्रकरणातून तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती.

तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती चिंताजनक.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रायगड दौऱ्यावर

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज रायगड दौऱ्यावर येत आहेत. सकाळी जेष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर अलिबाग येथे जमीन परिषद घेऊन शेतकरी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे ३५६ धावांची 'विराट' आघाडी; रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT