Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Marathi News Live Updates : बीआरएसएसचे अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत; आज 'तुतारी' हाती घेणार

Satish Daud

Maharashtra Politics: बीआरएसएसचे अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत; आज 'तुतारी' हाती घेणार 

भारत राष्ट्र समिती (बी आर एस) चे अनेक नेते आज हाती घेणार तुतारी

बी आर एस चे अनेक नेते आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश

शरद पवारांच्या उपस्थितीत बी आर एस चे अनेक नेते राष्ट्रवादीत जाणार

आज दुपारी ३ वाजता होणार पक्ष प्रवेश..

Pune News: बालेवाडी परिसरात भाजप नगरसेवकाचे शक्ती प्रदर्शन

पुण्यातील बालेवाडी परिसरामध्ये आज चाळीस हजार कामगारांना दिवाळी सरंजाम वाटप करण्यात आलं. यावेळी मोठ्या शक्ती प्रदर्शन अमोल बालवडकर यांनी केलं.गेल्या 4 महिन्यापासून एक ही भाजपाचा मोठा नेता मंत्री माझ्या कार्यक्रमाला येत नसल्याची खंत व्यक्त करत स्टेज वर कामगार ड्राइवर याना एका खाजगी कार्यक्रमात मुख्य पाहुण्यांचा सन्मान केला.साधारण 20 हजार पेक्षा जास्त लोक हजर आहेत. अमोल बालवडकर बाणेर बालेवाडी परिसरातील भाजपचे नगरसेवक आहेत. यावेळी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. अनेक वेळा बालवडकर यांनी पक्षातील नाराजी बोलून दाखवली होती. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ती शक्ती प्रदर्शन त्यांनी केला.

Mumbai News: उड्डाण पुलाच्या कामाच्या श्रेयवादाची लढाई; भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने

मालाड पश्चिमेकडील मीठ चौकी येथील उड्डाण पुलाच्या कामाच्या श्रेयवादावरून भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. काँग्रेस आमदार असलम शेख यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काँग्रेस मोठ्या संख्येवर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित असून भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू करण्यात आली याचवेळी भाजप कार्यकर्ते देखील या ठिकाणी जमल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले दोन्ही बाजूकडून घोषणाबाजी सुरू असल्यामुळे या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांकडून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पांगवण्याचे काम आता या ठिकाणी सुरू झाले आहे.

Mohan Bhagwat:  'भारत हे हिंदू राष्ट्र..' सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान

भारत हे हिंदू राष्ट्र असल्याचे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. राजस्थान येथील बारा नगर येथे स्वयंसेवकांच्या एकत्रीकरण कार्यक्रमात शनिवारी बोलत होते. आपण सर्व भारत मातेचे पुत्र आहे त्यामुळे भारत मातेसाठी जगू आणि मरू. पण भारतात भारतासाठी जबाबदार समाज कोण आहे. तर तो हिंदू समाज आहे कारण भारत हा हिंदू देश आहे. हिंदू राष्ट्र आहे. कारण परंपरेपासून प्राचीन काळापासून हिंदू लोक राहतात. त्यावेळी पासून जे राहत होते त्यांना हिंदू नाव मिळालं असल्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले

Pune News: बालेवाडी परिसरात भाजप नगरसेवकडून शक्ती प्रदर्शन करत सरंजाम वाटप

पुण्यातील बालेवाडी परिसरामध्ये आज चाळीस हजार कामगारांना दिवाळी सरंजाम वाटप करण्यात आलं. यावेळी मोठ्या शक्ती प्रदर्शन अमोल बालवडकर यांनी केलं.गेल्या 4 महिन्यापासून एक ही भाजपाचा मोठा नेता मंत्री माझ्या कार्यक्रमाला येत नसल्याची खंत व्यक्त करत स्टेज वर कामगार ड्राइवर याना एका खाजगी कार्यक्रमात मुख्य पाहुण्यांचा सन्मान केला.साधारण 20 हजार पेक्षा जास्त लोक हजर आहेत. अमोल बालवडकर बाणेर बालेवाडी परिसरातील भाजपचे नगरसेवक आहेत. यावेळी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. अनेक वेळा बालवडकर यांनी पक्षातील नाराजी बोलून दाखवली होती. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ती शक्ती प्रदर्शन त्यांनी केला.

Nagpur Accident: भरधाव ट्रकने चिरडले; १० गाई दगावल्या, नागपुरमधील घटना

नागपूर जिल्ह्याच्या उमरेड तालुक्यातील बेसूर शिवारात कोळशाच्या ट्रकने गायींना चिरडले. यामध्ये आठ ते दहा गाईंचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली.

भरधाव ट्रक कोळसा घेऊन समुद्रपूरच्या दिशेने जात असताना उतारावर गाडी न्यूट्रल केली असल्यामुळे ट्रकवर नियंत्रण सुटल्याची प्राथमिक माहिती..

- दहा गाईंचा अपघातात दगावल्याने गोपालकाचे लाखो रुपयांचे नुकसान

- अंदाजे 50 ते 60 हजार रुपये एका गायीची किंमत असून दहा गाईंचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. पोलीस गावकरी घटनास्थळी दाखल नागरिकांमध्ये संतापट्रक चालकांवर कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी

Raj Thackeray News : राज ठाकरेंच्या उपस्थित बैठकीला सुरुवात, उत्तर महाराष्ट्राचा घेणार आढावा

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राज ठाकरे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज ते नाशिकमध्ये मनसे कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत इच्छुक उमेदवारांसोबत ठाकरे संवाद साधणार आहेत. तसेच आगामी विधानसभेची चाचपणी केली जाणार आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या उपस्थित बैठकीला सुरुवात झाली आहे.

Bacchu Kadu News : आमदार बच्चू कडूंना मोठा धक्का; प्रहारचा आमदार शिंदे गटाने पळवला

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. प्रहारचा एकुलता एक आमदार शिवसेना शिंदे गटाने फोडला आहे. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Pimpri Chinchwad News : रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून 12 वर्षीय मुलीची आत्महत्या

रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून 12 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरात घडली. याप्रकरणी मृत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी क्षितिज लक्ष्मण पराड आणि तेजस पांडुरंग पठारे या दोन आरोपींना अटक केली आहे.

Maharashtra Politics : डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का

डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून शिंदे गटाचे युवा सेना प्रदेश सचिव दीपेश म्हात्रे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे बंधू माजी नगरसेवक जयेश म्हात्रे हजारो कार्यकर्त्यांसह काही वेळात मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत दीपेश म्हात्रे यांचा प्रवेश होणार आहे. दीपेश म्हात्रे ठाकरे गटाकडून डोंबिवलित विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता म्हात्रे यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी आहे.

Pune News :  पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता बसवण्यात येणार "सर्च लाईट"

पुण्यातील सर्व टेकड्यांवर आता "सर्च लाईट" बसवण्यात येणार आहेत. शहरातील सर्व टेकड्यांवर सायरन सुद्धा बसवले जाणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत हा सायरन महत्वाचा ठरणार आहे. बोपदेव घाटातील प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. काही दिवसांपूर्वी पुण्यातील बाणेर टेकडीवर एका तरुणाला काही चोरट्यांनी लुटले होते. पुण्यातील टेकड्यांवर होणाऱ्या चोऱ्या आणि लूट थांबवण्यासाठी आता पोलिसांकडून मोहीम सुरू होणार आहे.

Nandurbar Breaking : नवापूर तालुक्यात भीषण अपघात; शंभरहून अधिक मेंढ्या ठार

नवापूर तालुक्यातील जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मेंढ्यांना चिरडले. शंभरहून अधिक मेंढ्या ठार झाल्यात. रस्त्यावर पडला मृत पावलेल्या मेंढ्यांचा खच पडला होता. भरधाव वेगाने रस्त्यावर जात असलेल्या मेंढ्यांना चिरडल्याची घटना घडलीय. घटनेत मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेय.

Nashik News : आज मुंबईत होणाऱ्या स्वराज्य पक्षाच्या आंदोलनाला नाशिकहून कार्यकर्ते रवाना

आज मुंबईत होणाऱ्या स्वराज्य पक्षाच्या आंदोलनाला नाशिकहून कार्यकर्ते रवाना झाले आहेत. शेकडो वाहनांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झालाय. नाशिक शहर आणि जिल्ह्यातून जवळपास 100 हून अधिक वाहने कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, अशी स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Pune News : गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलपतीपदी संजीव सन्याल यांची नियुक्ती

गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलपतीपदी संजीव सन्याल यांची नियुक्ती करण्यात आलीय. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. बिबेक देबरॉय यांच्या राजीनाम्यानंतर सन्याल यांची नियुक्ती केली. सन्याल यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी आहे. सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी (एसआयएस) आणि गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स यांनी शनिवारी रात्री उशिरा याबाबतची घोषणा केली. सन्याल हे अर्थशास्त्रज्ञ असून पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य आहेत. सन्याल यांनी भारताच्या आर्थिक सर्वेक्षणाच्या सहा आवृत्त्या तयार करण्यास मदत केलीय.

Sindhudurg News : एसटी बस थांब्यावरून विद्यार्थ्यांचे रस्त्यावर बसून ठीय्या आंदोलन

कुडाळ तालुक्यातील जांभवडे हायस्कुल समोरील बस स्टॉपवर एसटी बसेस न थांबविल्यामुळे विद्यार्थ्यी, शिक्षक आणि पालकांनी रस्त्यावरच ठीय्या आंदोलन केलं. जांभवडे हायस्कुल येथील शाळेत एसटीने प्रवास करणारे जवळपास 200 विद्यार्थी आहेत. या शाळेपासून बस स्टॉप दुर असल्यामुळे या शाळेजवळच एसटी बसेस थांबाव्यात अशी विनंती शाळा व्यवस्थापन व पालकांनी एसटी प्रशासनाकडे लेखी मागणी केली होती. मात्र मागणी करूनही एसटी बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनी काल हे आंदोलन केले. दरम्यान शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी संस्था अध्यक्ष, पालक व शिक्षक अशा 13 जणांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News : पुण्यातील धायरी परिसरात अपघात, PMPML बस झाडाला धडकली

पुण्यातील धायरी परिसरात डीएसके’च्या उतारावर PMPML बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस खड्ड्यात पडून झाडाला धडकली. सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झालेली नाही. ही बस धायरी येथील डीएसके येथून हडपसर भेकराईनगरकडे निघाली होती. त्याचवेळी उतारावर बसचे ब्रेक निकामी झाला आणि बस पत्र्याच्या कंपाउंडला धडकल्यानंतर पुढे खड्ड्यात पडून झाडाला अडकली.

Bhandara News : शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्या विहिरीत पडला

भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील पळसगाव (सोनका) येथे शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्या पहाटेच्या सुमारास थेट गावातील विहिरीत पडल्याने चांगलीच खळबळ उडाली. पळसगाव ग्रामस्थांनी तातडीनं माहिती वन विभागाल कळवली. वनविभागानं तातडीनं दाखल होत बिबट्याला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे.

शिकारीचा शोधामध्ये हा बिबट्या फिरत असताना त्याला विहिरीचा अंदाज आला नाही. पाणी असलेल्या विहिरीमध्ये तो अडकला. तासभरापासून वन विभागाची टीम बिबट्याला काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असून या बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

Latur News : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड

लातूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास 2 लाख 82 हजार हेक्टर वरील पिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालं होतं., दरम्यान यावेळी मुख्यमंत्री , आणि उपमुख्यमंत्री हे लातूर दौऱ्यावर असताना स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी करून केली. यावेळी तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे महिनाभरातच शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे. तर लातूर जिल्ह्यासाठी ३८४ कोटी १४ लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला आहे.

Mumbai Fire News : चेंबूरमध्ये आग लागून एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

मुंबईतील चेंबर परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. येथील सिद्धार्थ कॉलनीत एका घराला भीषण आग लागली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाही. अग्निमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana News : उपवासाची भगर खाल्ल्याने विषबाधा; महिलांना उलटी. पोटदुखीचा त्रास, उपचारासाठी दाखल

Bachchu Kadu : बच्चूभाऊंना विधानसभेच्या तोंडावर महायुतीकडून 'कडू' घास; एकमेव आमदार पळवला!

Viral News : रामाची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीला हार्ट अटॅक; मंचावरच सोडला जीव, धक्कादायक VIDEO

Pune Crime : पुणे हादरलं! वारज्यात घरात घुसून महिलेवर लैंगिक अत्याचार, शहरात संतापाची लाट

Hypertension and High Cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास? वाचा तज्ज्ञांनी काय काय सांगितलं

SCROLL FOR NEXT