Maharashtra Live News Updates Saam tv
महाराष्ट्र

Marathi News Live Updates : मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Satish Daud

Mumbai Ahmedabad Highway: मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

देशाचे पंतप्रधान ठाणे येथे आज येणार असल्याने वाहतूक कोंडी

पालघर कडून ठाणे घोडबंदर कडे जाणाऱ्या अवजड वाहनांना बंदी

दोन्ही लेन वर वाहतूक कोंडी,वाहतूक पोलिसांकडून कोंडी काढण्याचा प्रयत्न सुरु

Parbhani News: बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, परभणीतील घटना

बारावीच्या 19 वर्षीय विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना परभणीच्या ब्राह्मणगाव येथील राजे संभाजी गुरुकुल हॉस्टेल मध्ये रात्री उशीरा घडली ,रामू बळीराम गायकवाड असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे, दोन दिवसांपासून अंग खाजवत असल्याने त्याने वडिलांकडून पैसे मागितले होते,वडिलांनी उपचारासाठी पैसे पाठवले होते मात्र त्याच्यावर वेळेवर उपचार झाले नसल्याची माहिती समोर आली आहे,पोलिसांना विद्यार्थ्यांकडे "सबका /सभी का बदला लुंगा फिर लौटुंगा".अस मजकूर लिहलेली चिठ्ठी सापडली असल्याने एकच खडबळ माजली आहे.

Chhatrapati Sambhaji Maharaj: शरद पवार हे ज्येष्ठ नेते; त्यांना टिंगल करण्याचा अधिकार: छत्रपती संभाजीराजे

राज्यातील तिसऱ्या आघाडी बाबत बोलताना शरद पवारांनी टिंगल उडवली. तिसरी आघाडीच ऐकून मी घाबरलो आहो मला झोप लागत नाही,अस म्हणत शरद पवार यांनी खिल्ली उडवली. त्यावर आता छत्रपती संभाजीराजे यांनी महात्मा गांधींचं प्रसिद्ध वाक्य सांगत शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले,शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. शरद पवार यांना टिंगल करण्याचा अधिकार आहे. इतर कोणी असत तर मी खपवून घेतलं नसतं. महात्मा गांधी कायम म्हणायचे आधी दुर्लक्ष करतील मग टिंगल करतील आणि मग ते लढतील नंतर तुम्ही जिंकाल… हे महात्म गांधींचं प्रसिद्ध वाक्य सांगत संभाजीराजेंनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं.

Jayant Patil News: महाविकास आघाडीत मोठा भाऊ छोटा भाऊ असं काही नसेल: जयंत पाटील

महाविकास आघाडीत मोठा भाऊ आणि छोटा भाऊ असं काही नसेल. जसं जुळी भावंड असतात तसे आम्ही तिळी भावंड आहोत असं आम्ही मानतो. महाराष्ट्रात सरकार आणण हा आमचा सगळ्यांचा समान धागा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी न भांडता आम्ही समान जागा पटप कसं होईल यावर आमचे लक्ष आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सावंतवाडीत व्यक्त केल आहे.

Yavatmal News: PM मोदींच्या सभेला पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न 

वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी म्हणुन ओळख असलेल्या पोहरादेवी इथे पंतप्रधान,मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हजेरीत नंगारा विरासत म्युझियम लोकार्पण सोहळा संपन्न होत आहेत.

गर्दी जमविण्यासाठी इतरही समाजातील महिलांना रोजाने नेल्या जात असल्याचा प्रकार समोर आलाय

यवतमाळ तालुक्यातील अर्जुना येथील कांता बाबाराव उमाटे या महिलेने स्वतः सांगितले की,दोनशे रूपये रोजाने आम्ही पोहरादेवी येथील कार्यक्रमाला जात आहेत.

यवतमाळ आणि वाशिम या दोन जिल्ह्यातून तब्बल एक हजार आठशे एसटी बसेस पोहरादेवी येथील कार्यक्रमात लोकांना आणण्यासाठी सोडण्यात आल्या असून इतरही जिल्ह्यातून एसटी बसेस बोलविण्यात आल्या आहेत.

महिला रोजाने आणुन काय साध्य करायचं असा सवाल देखील या निमित्ताने विचारल्या जात आहेत.

NIA ATS Raid: देशभरात एनआयए, एटीएसची २२ ठिकाणी छापेमारी

महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, आसाम आणि दिल्लीत एकाच वेळी 22 ठिकाणी छापेमारी

दहशतवादी कट प्रकरणी ही कारवाई केली जात असल्याची माहिती

काही लोकांना NIA ने ताब्यात घेतल्याची माहिती

या लोकांचे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा NIA ला संशय

महाराष्ट्रातील मालेगाव, जालना आणि संभाजीनगर येथे NIA च्या छाप्यांमध्ये एटीएसचे पथकही सोबत असल्याची माहिती

NIA ने मालेगाव येथील होमिओपॅथी क्लिनिकमधून ४ जणांना ताब्यात घेतल

दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग असल्याच्या कारणावरून त्यांची चौकशी सुरू

Mumbai News: ठाकरे गटाकडून मुंबईत रोजगार मेळाव्याचे आयोजन 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज मुंबईत महा रोजगार मेळावा पार पडत आहे मेडिकल इंजिनिअरिंग बँकिंग अशा विविध क्षेत्रातील हजारो रोजगार या ठिकाणी विविध कंपन्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे मुंबईतील हजारो बेरोजगार तरुण या ठिकाणी या महा नोकरी मेळाव्याला उपस्थित झाले आहेत आमदार अनिल परब यांच्या माध्यमातून या महा नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे

Rahul Gandhi Kolhapur Visit: राहुल गांधींचा कोल्हापूर दौरा! भाजप कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न 

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. विमानामध्ये बिघाड झाल्याने त्यांचा शुक्रवारचा दौरा रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आज सकाळी आठ वाजता ते कोल्हापुरात दाखल झालेत. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला.

Sangli News: उदगिरी पठारावर फुलोत्सव तर पर्यटकांची तोबा गर्दी

सांगलीच्या चांदोली परिसरात असणाऱ्या उदगीरी पठार सध्या वेगवेगळ्या दुर्मिळ जातीच्या फुलांनी फुलले आहे. निसर्गाचा हा नजराणा पाहण्यासाठी अनेक पर्यटक या पठारावर आता गर्दी करू लागले आहेत. तर चांदोली परिसरातील शाहूवाडी तालुक्यात येणारे हे उदगिरी पठार मिनी कास पठार म्हणून नावारूपास येत आहे. मंजिरी, स्मिथिया, धनगरी फेटा, सीतेची आसवे कुरडू, बुश कार्वी, उदी चिरायत, टोपली कारवी, यासह अनेक दुर्मिळ जातीची फुले सध्या या पठारावर फुलली आहेत.

सप्टेंबर ते ऑक्टोबर या दोन महिन्याच्या कालावधीतच ही फुले फुललेली असतात. अनुकूल वातावरण असेल तरच ही फुले फुलतात. यंदा पठारावरील या फुलांना चांगलाच बहर आला आहे. पर्यटकांपासून वंचित असणारे हे पठार अलीकडे प्रसार माध्यम तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पर्यटकांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे पर्यटकांना माहीत होईल तसं पर्यटक या पठाराकडे आकर्षित होत आहेत.

Chandrapur News : रेल्वेच्या MPT मशीन एकमेकांना धडकल्या; चार कर्मचारी जखमी

चंद्रपूर : रेल्वे रुळाची देखभाल करणाऱ्या दोन MPT मशीन एकमेकांवर आदळल्याने चार रेल्वे कर्मचारी जखमी झाले. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मूल रेल्वे स्थानकावर घडली. मूल रेल्वे स्थानकावर एक मशीन आधीच उभी असताना मागून आलेल्या मशीनने धडक दिली. यावेळी जोराचा आवाज झाला. स्थानकावरील लोक थोड्या वेळासाठी भयभीत झाले. यात एका मशीनचा दर्शनी भाग क्षतिग्रस्त झाला असून, जे चार कामगार जखमी झाले, त्यांना मूल येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

BJP vs NCP : महायुतीतल्या नेत्यांमध्ये पुन्हा जुंपली; भरसभेत एकमेकांना कोपरखळ्या

महायुतीतल्या नेत्यांमध्ये पुन्हा एकदा जुंपली असू भरसभेत एकमेकांना कोपरखळ्या मारण्यात आल्या आहे. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील यांना चिमटा काढला आहे..

आमदार बाबासाहेब पाटील आमच्यासोबत असून देखील आम्हाला ते आमच्या सोबत आहेत अस, आम्हाला वाटत नाही, असं गणेश हाके म्हणाले. तर युती करायची का नाही, हे माझ्या हातात नाही. पण तुमच्यासोबत नांदायचं की नाही हे माझ्या मनावर आहे. म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील विकासाचा निधी दिला आहे, असं आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले.

Sharad Pawar : शरद पवार स्वतः इच्छुकांच्या घेणार मुलाखती

विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार तयारीला लागले असून उमेदवार निवडीसाठी ते स्वतः इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. आज शरद पवार मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती असून त्यानंतर सलग तीन दिवस पवार पुण्यात तळ ठोकून असणार आहे. १० तारखेपर्यंत उमेदवारांची पक्षांतर्गत चर्चा होणार आहे.

Pandharpur News : पंढरपूरजवळ धावत्या शिवशाही बसला आग, प्रवाशांची धावपळ

पंढरपूर जवळ एसटी महामंडळाच्या शिवशाही बस‌ पेटल्याची घटना आज शनिवारी (ता ५) सकाळी घडली. चालकाने प्रसंगावधान दाखवून सर्व प्रवाशांना बस बाहेर काढले. पंढरपूर आगाराची ही बस पुण्याला निघाली‌ होती. बस वाडीकुरोली गावा जवळ आली असता बसने अचानक पेट घेतला. आगीमध्ये बस जळून खाक झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Ajit Pawar vs Sharad Pawar : अजित पवारांचा पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा

चार दिवस सासूचे तसे चार दिवस सुनेची ही असतात की नाही? का त्या सुनेने म्हातारी होईपर्यंत फक्त बघतचं राहायचं. असा प्रश्न उपस्थित करत, अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. मावळ विधानसभेत विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात अजित पवारांनी शरद पवारांपासून दूर होण्याचं कारण सांगितलं. काळानुरूप बदल स्वीकारले जातात. वडील सत्तरी पार केल्यावर आपल्या डोळ्यात देखत मुलावर जबाबदारी सोपवतो, मात्र काहीजण ऐकतच नाहीत. एवढा हट्टीपणा कशाला, असं म्हणत अजित दादांनी शरद पवारांना उद्देशून वक्तव्य केलं.

Raj Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून २ दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून २ दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचे सहकुटुंब घेणार दर्शन घेणार आहेत. उद्या राज ठाकरे घेणार उत्तर महाराष्ट्रातील मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील मनसे पदाधिकाऱ्यांना स्वतः राज ठाकरे राजमंत्र देणार आहे. संभाव्य इच्छुकांची भेट आणि पक्ष संघटनात्मक बांधणीच्या दृष्टिकोनातून करणार पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज पदाधिकाऱ्यांना काय राज मंत्र देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Amravati News : अमरावतीत तणावपूर्ण शांतता, नागपुरी गेट परिसरात जमाबंदी लागू

गाझियाबाद येथे स्वामी यती नरसिंहानंद यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शुक्रवारी रात्री मोठा जमाव नागपूर गेट पोलीस स्टेशनवर आला. काही वेळात हा जमाव हिंसक झाला व अचानक नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर व हजर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर दगडफेक सुरू केली. यात मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या वाहनाचे व पोलीस स्टेशनचे देखील नुकसान झाले आहे. दोन ते अडीच हजार लोकांचा जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना रात्री अखेर हवेत गोळीबार अश्रुधुरांच्या नळकांड्यावर लाठीचार्ज करावा लागला.

रात्री एक वाजता नंतर परिस्थिती नियंत्रणात आली. जमावाकडून करण्यात आलेला दगडफेकीमध्ये 29 पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झालेले आहेत. या परिसरात सध्या जमाबंदीचे आदेश देण्यात आले असून शांतता राखण्याच्या आवाहन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 5 Grand Finale: चुकिला माफी नाही! ग्रँड फिनालेमध्ये आर्या जाधवला नो एन्ट्री? चर्चांना उधाण

Parbhani News: 'सबका बदला लुंगा फिर लौटुंगा', चिठ्ठी लिहली अन् १२ वीतील मुलाने मृत्यूला कवटाळलं; परभणीत खळबळ

VIDEO: राहुल गांधींच्या हस्ते कोल्हापूरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण

साउथ अभिनेत्याची मेहुणी गाजवणार Bigg Boss 18चं पर्व; केली धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हयचंय? फॉलो करा 'हा' गुरु मंत्र

SCROLL FOR NEXT