Maharashtra News Live Update: Saam TV Marathi news
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावर धावत्या कारला अचानक भीषण आग

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : महाराष्ट्र बोर्डाचा आज दहावीचा निकाल, विदर्भासह राज्यात उष्णतेची लाट, काही ठिकाणी अवकाळी पाऊस, राजकीय घडामोडी यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

car fire : समृद्धी महामार्गावर धावत्या कारला अचानक भीषण आग

समृद्धी महामार्गावर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळणी फाट्याजवळ धावत्या कारला अचानक भीषण आग लागली.

काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात खळबळ उडाली.

चालकाने प्रसंगावधान राखत वाहन थांबवून बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली.

घटनेची माहिती मिळताच मंगरुळ दस्तगीर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाने युद्धपातळीवर प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले.

Dombivli : डोंबिवलीत घरातून गांजाची विक्री, दोघांना अटक

डोंबिवली पश्चिमेतील गुप्ते रोड परिसरातील त्रिमूर्ती बिल्डिंगमधील एका घरावर विष्णुनगर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत तब्बल १ किलो गांजा जप्त केला. या कारवाईत निशिकांत पावशे आणि किसन गुप्ता या दोघांना अटक करण्यात आली आहे.

रघुनाथ येमूल यांची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता; ‘नाना गायकवाड’ प्रकरणातील सर्व आरोप रद्द

पुण्यातील उद्योजक नाना गायकवाड यांच्या घरगुती हिंसाचार प्रकरणात आरोपी करण्यात आलेले रघुनाथ राजाराम येमूल यांची मुंबई उच्च न्यायालयाने संपूर्ण निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांच्या एकलपीठाने १७ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या आदेशात महाराष्ट्र नरबळी व अघोरी प्रथा आणि काळी जादू प्रतिबंधक कायदा, २०१३ च्या कलम ३(२) अंतर्गत येमूल यांच्यावरील सर्व आरोप रद्द केले.

उकणी कोळसा खाणीत अचानक मातीचा डोंगर कोसळला

उकणी कोळसा खाणीत भीषण भूस्खलन

दोन डंपर माती खाली दबले, सुदैवाने जीवितहानी नाही

उकणी कोळसा खाण परिसरात एकच खळबळ

नसरापूर अत्याचार प्रकरणी पीडित चिमुकलीचे कुटुंब आक्रमक

रविवारी काढणार मूक मोर्चा

मोर्च्यात सर्व नागरिक, आई वडिलांनी सहभागी होण्याच केल आवाहन

बालगंधर्व रंगमंदिर ते सावरकर भवन पर्यंत मोर्चा काढण्यात येणार

नसरापूर घटनेच्या निषेधार्थ आणि नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी काढणार मोर्चा

Kalyan : मुस्लिमांना घर नाकारल्याचा आरोप, कल्याण एमआयएम शहराध्यक्षांची पोलिसांत तक्रार

मुस्लिम लोकांना घर मिळणार नाही असे एका टेलीकॉलरने सांगितल्याचा आरोप

कल्याण शहर एमआयएम अध्यक्ष अशफाक शेख यांनी पोलिसांत तक्रार

या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी

Shirur: शहादा तालुक्यातील शिरुड गावात हातभट्टीवर पोलिसांचा छापा

शहादा तालुक्यातील शिरुड येथील वाकी नदीकाठी सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर म्हसावद पोलिसांनी मोठी कारवाई केली.या धाडीत पोलिसांनी सुमारे 1 लाख 59 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत अरविंद भबुता भिल आणि रतिलाल शामसिंग पवार या दोन संशयितांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून 2 हजार 800 लिटर सडका वॉश,तयार हातभट्टी दारू, लोखंडी ड्रम, स्टील हंडे आणि इतर साहित्य हस्तगत केले. सपोनि नितीन कामे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून,दोन्ही आरोपींना नोटीस बजावण्यात आली आहे.

Latur: लातूरच्या उदगीर शहरासह तालुक्यात वादळी वारा आणि अवकाळी पावसाची जोरदार हजेरी

लातूरच्या उदगीर शहरासह तालुक्यात वादळी वारा आणि अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, सकाळपासून वातावरणात उखाडा जाणवत होता, तर जिल्ह्यातल्या रेनापुर तालुक्यात ही,तुफान अवकाळी पाऊस आणि वादळी वारा सुरू झाला आहे.,भाजीपाला तसेच फळबागांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे,

Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाची बॅटिंग

नंदुरबार -

नंदुरबार जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी अवकाळी पावसाची बॅटिंग

थंड हवेचे ठिकाण आलेले तोरणमाळ आणि देवगोई घाटात जोरदार पाऊस

तीव्र उन्हात पाऊस झाल्याने परिसरात गारवा

अवकाळी पावसामुळे सातपुड्यातील आमचूल उद्योगाला फटका बसण्याची शक्यता

Nagpur: पुढील 2 दिवस विदर्भात अवकाळी पाऊस, हवामान विभागाचा इशारा

नागपूर -

- पुढील दोन दिवस विदर्भात पुन्हा अवकाळीचा हवामान विभागाचा इशारा..

- 8 मे आणि 9 मेला ऑरेंजन अलर्ट देण्यात आला आहे..

- नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचा इशारा दिला आहेय...

- विदर्भातील नागपूर,अमरावती, यवतमाळ अकोला, चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवसात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता..

- दरम्यान विजांचा कडकडाट आणि वेगवान वारा सुटण्याचा अंदाज, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन..

- मागील दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस झाल्याने विदर्भात गारवा मात्र मे महिना 11 मे नंतर पुन्हा तापणार असा हवामान विभागाचा इशारा आहे..

Pune: पर्वती अत्याचार प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी

पुणे -

पर्वती अत्याचार प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी

पोलीस कोठडी संपल्यानंतर आज पुणे पोलिसांनी आरोपीला न्यायालयात केलं होतं हजर

कोर्टाने आरोपीला सुनावली न्यायालयीन कोठडी

तीन दिवसांपूर्वी पुण्यातील पर्वती भागात या आरोपी आजोबाने आपल्याच नातीवर अत्याचार करण्याचा केला होता प्रयत्न

पुण्यातील पर्वती पोलीस स्टेशनमध्ये आरोपी आजोबा विरोधात पुन्हा दाखल करण्यात आला होता

Latur: उदगीर शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

लातूर - उदगीर शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

लातूरच्या उदगीर शहरासह तालुक्यात वादळी वारा आणि अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे

सकाळपासून वातावरणात उखाडा जाणवत होता

तर जिल्ह्यातल्या रेनापुर तालुक्यात ही तुफान अवकाळी पाऊस आणि वादळी वारा सुरू झाला आहे

भाजीपाला तसेच फळबागांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे,

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पुन्हा मेघगर्जनेसह अवकाळी पावसाच्या सरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पुन्हा मेघगर्जनेसह अवकाळी पावसाच्या सरी

वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी तालुक्याच्या काही भागात अवकाळी पाऊस

हवामान विभागाने दुपारच्या सत्रात केला होता येलो अलर्ट जारी

त्या अनुषंगाने ताशी ४० ते ५० किलोमीटर वाऱ्याचा वेगासह पावसाच्या सरी

अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ

गेले दोन दिवस सुरू असलेल्या अवकाळी मुळे शेवटच्या टप्प्यातीतील आंबा काजू पिकावर होणार परीणाम

कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात

नाशिक -

- कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात

- सरकारने कांद्याला दीड हजार रुपये अनुदान देण्याची मागणी

- कांद्याला दीड हजार रुपये अनुदान देण्याची महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी

- कांद्याचा उत्पादन खर्च २ हजार रुपयांहून अधिक तर कांद्याला मिळतोय ४०० ते ५०० रुपये भाव

- उत्पादन खर्च देखील वसूल होत नसल्यानं शेतकरी संकटात

- केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

नाशिक TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला चार दिवस पोलीस कोठडी

- TCS प्रकरणातील आरोपी निदा खानला चार दिवस पोलिस कोठडी

- आईला सकाळ संध्याकाळ भेटण्यास परवानगी

- नाशिकरोड न्यायालयात करण्यात आले होते हजर

- निदा खानची सुनावणी झाली इन कॅमेरा

- न्यायालयात सरकारी वकील निदा खान हिचे वकील आणि तपासी यंत्रणा उपस्थित याव्यतिरिक्त न्यायदान कक्षातून सर्वांना काढले बाहेर

- सुरक्षेच्या कारणास्तव नाशिक रोड न्यायालयात पोलिसांचा मोठा बंदोबस्त

- इन कॅमेरा सुनावणी पार पडणार

- सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी मांडली बाजू

- तर निदा खानच्या बाजूने राहुल कासलीवाल हे युक्तिवाद करणार

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, कंधार तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, कंधार या तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले.मुदखेड, कंधार तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन या तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मागील दोन दिवसापासून नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे. काल देखील नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.

पुणे- पर्वती अत्याचार प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी

  • पर्वती अत्याचार प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी

  • पोलीस कोठडी संपल्यानंतर आज पुणे पोलिसांनी आरोपीला न्यायालयात केलं होतं हजर

  • कोर्टाने आरोपीला सुनावली न्यायालयीन कोठडी

  • तीन दिवसांपूर्वी पुण्यातील पर्वती भागात या आरोपी आजोबाने आपल्याच नातीवर अत्याचार करण्याचा केला होता प्रयत्न

  • पुण्यातील पर्वती पोलीस स्टेशनमध्ये आरोपी आजोबा विरोधात पुन्हा दाखल करण्यात आला होता

परभणीत जोरदार वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात

दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर परभणी जिल्ह्यात हवामानात अचानक बदल झाला असून जोरदार वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. अचानक सुटलेल्या वेगवान वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी बॅनर, होर्डिंग्ज आणि फलक, झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. वाऱ्याचा वेग इतका तीव्र होता की नागरिकांची एकच धावपळ उडाली. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी वादळी वाऱ्यामुळे सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

पुणे सातारा महामार्गावरील खेडशिवापूर टोल नाका जवळ दुचाकी आणि टँकर मध्ये भीषण अपघात

साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या दुचाकीस्वार दाम्पत्याला टँकरने चिरडलं

यामध्ये पती-पत्नीचा जागीच मृत्यू

राजेंद्र बबन मोरे आणि सविता राजेंद्र मोरे (रा. वारजे माळवाडी, पुणे) अशी दोन्ही मृतांची नावे..

पती-पत्नीचा जागीचं मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ

खेडशिवापूरच्या राजगड पोलिसांकडून अपघाताच्या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे..

नाशिक TCS धर्मांतर प्रकरणात मोठी अपडेट, निदा खानला कोर्टात हजर केलं

  • नाशिक TCS धर्मांतर प्रकरणात मोठी अपडेट

  • निदा खानला कोर्टात हजर केलं

  • निदा खानला आश्रय देणाऱ्या एमआयएम नगरसेवकाला सहआरोपी केलं

  • मतीन पटेलविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला

रांजणगाव MIDC समोर महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा

रांजणगाव औद्योगिक वसाहतीत पुणे आहिल्यानगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालीय अवजड वाहनांची गर्दी, सततची वाहनांची वर्दळ आणि संथ वाहतुकीमुळे ट्राफिकच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय

हिंगोलीच्या वारंगा परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील वारंगा परिसरात दुपारच्या सुमारास अचानक वादळी वारे आणि मुसळधार अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने मोठी तारांबळ उडाली आहे.

वादळी वऱ्याचा जोर इतका होता की नियोजित असलेल्या विवाह सोहळ्यातील मंडप जमिनीवर कोसळले होते तर अनेक भागात गारा देखील बरसल्या होत्या दरम्यान पावसाचा जोर इतका होता की रस्त्यावर पावसाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती.

सर्वत्र पाणीच पाणी जमा झाल्याने वाहन चालकांना वाहने देखील चालवणे अवघड बनले होते या अवकाळी पावसामुळे उष्णते मुळे हैराण असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे तर विवाह सोहळ्यातील पाहुणे मंडळींची मात्र मोठी पंचायत झाली होती.

इम्तियाज जलील यांच्या घरी पोलीस दाखल

  • जलील यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या घऱी पोलीस दाखल

  • संजय शिरसाटांच्या आरोपांनंतर घरी आले पोलीस

Maharashtra News Live Update: हिंगोलीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील वारंगा परिसरात दुपारच्या सुमारास अचानक वादळी वारे आणि मुसळधार अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने मोठी तारांबळ उडाली आहे. वादळी वऱ्याचा जोर इतका होता की नियोजित असलेल्या विवाह सोहळ्यातील मंडप जमिनीवर कोसळले होते तर अनेक भागात गारा देखील बरसल्या होत्या. दरम्यान पावसाचा जोर इतका होता की रस्त्यावर पावसाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. सर्वत्र पाणीच पाणी जमा झाल्याने वाहन चालकांना वाहने देखील चालवणे अवघड बनले होते. या अवकाळी पावसामुळे उष्णते मुळे हैराण असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर विवाह सोहळ्यातील पाहुणे मंडळींची मात्र मोठी पंचायत झाली होती.

परळी येथील पांगरी ओंकार कारखान्याला शेतकरी आणि कामगारांचा 'टाळे ठोको' सत्याग्रह आंदोलन 

परळी येथील पांगरी ओंकार कारखान्याला शेतकरी आणि कामगारांचा 'टाळे ठोको' सत्याग्रह आंदोलन

थकीत देयकांसाठी शेतकऱ्यांचा ओंकार कारखान्याच्या विरोधात एल्गार!

पिंपरी चिंचवडमध्ये जामिनावर सुटका झालेल्या आरोपीचा प्रेमसंबंधांच्या वादातून तरुणाचा थरारक खून 

पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरामध्ये गतीचे धक्कादायक घटना घडली आहे. हाफ मर्डर सारख्या गंभीर गुन्हातून जामीनावर आलेल्या तरुणास प्रेम संबंधाच्या वादातून खून करण्यात आला आहे.

अवकाळी पावसाने विवाह सोहळ्यावर विघ्न 

हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा वारंगा परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस बरसला आहे. अवकाळी पावसामुळे विवाह सोहळ्यातील मंडप जमिनीवर आला आहे. या घटनेत कुणालाही इजा झाली नसली तरी विवाह सोहळ्यावर मात्र पावसाचे विघ्न आले आहे विवाह सोहळ्यातील मंडप प साहित्य पावसाने पूर्णपणे भिजले आहे.

सुनेत्रा पवार वहिनी जर या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या, तर त्यांना पहिला हार मीच घालेन - सुप्रिया सुळे

सुनेत्रा पवार वहिनी जर या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या तर त्यांना पहिला हार हा मीच घालेन - सुप्रिया सुळे

नासिक निदा खान प्रकरणी इन्क्वायरी पूर्ण होऊ द्या

Accident News : दहिवेल पिंपळनेर रस्त्यावर अपघात

साक्री तालुक्यातील दहिवेल पिंपळनेर रस्त्यावर रस्त्याच्या मधोमध पेट्रोलचा टँकर पलटल्याने झाला अपघात

अपघातात टँकरच्या मधोमध लिकेज झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पेट्रोल रस्त्यावरती गेले वाया

प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

नागरिकांनी या संदर्भातील माहिती तात्काळ प्रशासनाला कळविल्यानंतर प्रशासनतर्फे योग्य नियोजन करत प्रसंगावधान दाखवत परिस्थिती हाताळल्यामुळे मोठा अनर्थ टळला

टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे टँकर झाला पलटी

आईन पेट्रोल टंचाई मध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल या अपघातामध्ये गेले वाया

खासदार सुप्रिया सुळे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निवासस्थानी दाखल

खासदार सुप्रिया सुळे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत.

डॉ. जयसिंगराव पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी त्या त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत

Pandharpur : ऐन वैशाख वणव्यात पंढरपूरचे तापमान 32 अंशावर; वृक्ष लागवडीमुळे नैसर्गिक चमत्कार

ऐन वैशाख वणव्यात उन्हाचा पारा 43 अंशावर गेलेला असतानाच,पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे मात्र चक्क 32 अंश तापमान नोंदवले गेले आहे. याचे कारण म्हणजे गावात केलेली मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड.

कुरणेवाडीत वृद्ध दाम्पत्यावर दरोडा; ४८ तासांत सात आरोपी जेरबंद

माण तालुक्यातील कुरणेवाडी येथील मिसाळ वस्तीवर राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून मारहाण करत दरोडा टाकणाऱ्या सात संशयित आरोपींना म्हसवड पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली.

चोरीस गेलेले सुमारे ६५ हजार रुपयांचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar: बिडकीन ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण

बिडकीन ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक व वैद्यकीय अधिकारी यांच्यात वाद

वैद्यकीय अधिकारी डॉ सिद्धेश्वर बडे यांना चापटबुक्यांनी मारहाण केल्याची घटना

ग्रामीण रूग्णालयात अपघात झालेल्या रुग्णाला उपचारासाठी दाखल असलेल्या नातेवाईकांच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात राडा

पोलिसांनी धाव घेत वैद्यकीय अधिकारी डॉ बडे यांना सुरक्षा देत पोलिसात केले दाखल.l

अपघातातील रुग्णांवर उपचार करत नसल्याचा नातेवाईकांचा आरोप..

पोलिसांच्या समोर डॉक्टर व नातेवाईक यांच्यात वाद झाल्याची माहिती..

Narsapur: नसरापूर घटनेनंतर अंबरनाथ-बदलापूरमध्ये संताप; आरोपीला फाशीची मागणी

पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विविध सामाजिक संघटनांनी शहरातील चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी निषेधाचे बॅनर्स लावत आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. “चिमुकलीला न्याय मिळालाच पाहिजे” तसेच “गप्प बसणं नाही, आता आवाज उठवणे गरजेचे” अशा घोषणांमधून नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, ब्राह्मण संघ, हेरंब सेवा समितीसह अनेक संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या असून महिलांवरील वाढत्या अत्याचारांविरोधात कठोर कायदे आणि तातडीने न्याय मिळण्याची मागणी करण्यात येत आहे.

Maharashtra: राज्यात एकूण ४०२ कॉपीचे प्रकार

राज्यात एकूण ४०२ कॉपीचे प्रकार

नाशिक मध्ये सर्वाधिक ८२ कॉपीचे प्रकरण उघडकीस

छत्रपती संभाजीनगर ७१ अमरावती ६७, नागपूर ४६, मुंबई ४४ कॉपीची प्रकरणे

लातूर आणि पुण्यात ४२ तर कोल्हापूर आणि कोकण विभागात ४ प्रकरणे

SSC Result: दहावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींची बाजी

मुलींची टक्केवारी ९४.९६ टक्के

मुलांची टक्केवारी: ९०.५६ टक्के

Buldhana: बुलढाण्यातील देऊळगावराजा शहरातील मध्यवर्ती भागात भीषण आग

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा शहरात आज भीषण आग लागल्याची घटना घडली. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या मेन रोडवरील सलग पाच दुकानांना अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आग इतकी भीषण होती की काही वेळातच आगीचे मोठमोठे लोळ दिसू लागले आणि मुख्य मार्गावर भीतीचे वातावरण निर्माण झाले. या आगीत किराणा दुकान, रेडिमेड कपड्यांचे दुकान, आईस्क्रीम पार्लर तसेच आणखी दोन दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच देऊळगावराजा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.

Bhandara: अवकाळी पावसानं भातपीक, मका, आंबा उत्पादकांना फटका, शेतकरी हवालदिल

भंडारा जिल्ह्यात मागील तीन दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. याचा सर्वाधिक फटका भंडारा, तुमसर आणि मोहाडीत तालुक्यात शेतकऱ्यांना बसलाय. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी भात पिकाची लागवड केली जाते आणि सध्या भातपीक कापणी योग्य झालेला आहे. अशा या वादळीवाऱ्याच्या आलेल्या पावसानं अनेकांच्या शेतातील भातपीक जमिनीवर लोळलं. तर, काहींचं भातपिक पाण्याखाली आल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालाय. तर, ऐन हंगामात आंबा बागायतदार शेतकऱ्यांनाही या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसलाय.

Tuljapur: तुळजापूरात मध्यरात्री रक्तरंजित थरार, तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

तुळजापूरात तरुणावर जीवघेणा हल्ल्याची घटना,मध्यरात्री तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

अज्ञात हल्लेखोराने पार्थ कन्हाडे या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला

डोक्यावर वार होताच बचावासाठी हात पुढे घेतल्याने युवकाच्या हाताच्या शिरा तुटल्या

गंभीर जखमी झालेल्या तरुणावर सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे

हल्लेखोर अद्याप फरार असून पोलिसांकडून तपास सुरू

चार दिवसाखालीच तुळजापूर मध्ये एका तरुणाचा झाला होता खून

तुळजापूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी

Onion Price: बाजारात उन्हाळ कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण

बाजारात उन्हाळ कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण

युद्धाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये कांद्याची मागणी घटली, कांदा निर्यात कमी झाल्याने देशांतर्गत बाजारात कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध

बदलते हवामान आणि अवकाळी पाऊस तसंच गारपिटीच्या धास्तीने साठवलेला कांदा देखील शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीला आणला

त्यामुळे बाजारात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले

रत्नागिरी- रत्नागिरी सिंधुदूर्गचे खासदार निद्रीस्थ, एकही खासदार कामाचा नाही

खासदारांचा आवाज बंद झाला, त्यामुळे कोकण रेल्वेचा प्रश्न प्रलंबीत

रत्नागिरी दादर रेल्वे सुरु करण्यासाठी गेले वर्षभर पाठपुरावा करतोय

मात्र सध्याचे खासदार त्यासाठी प्रयत्न करत नाहीत

कोकणवासियांनी निवडून दिलेले खासदार झोपलेले

सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं किवा नाही हा त्यांचा प्रश्न

२०२९ ची निवडणुक भाजप स्वबळावर लढेल आणि शिंदे गटाला बाजूला फेकून देतील

भरती प्रक्रियांमध्ये उमेदवारांना करता येणार डिजिलॉकर चा वापर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय

एम पी एस सी कडून मधील विविध भरती प्रक्रियांमध्ये उमेदवारांना त्यांच्या ऑनलाइन अर्जासोबत द्याव्या लागणाऱ्या प्रमाणपत्र, कागदपत्रांसाठी आता डिजिलॉकर प्रणाली स्वीकारण्याचा निर्णय

डिजिलॉकर प्रणालीच्या स्वीकारामुळे उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया आता होणार सुलभ

कागदपत्रांची, प्रमाणपत्रांची छाननी, तपासणी करून उमेदवारांची पात्रता निश्चित केली जाते

आता या कार्यपद्धतीला पर्यायी व्यवस्था म्हणून डिजिलॉकरचा वापर केला जाणार आहे. या

भीमराव कांबळेने या घटनेपूर्वी आणखी अल्पवयीन मुलींवर आत्याचार केला का? याचा तपास सुरु

भीमराव कांबळे अल्पवयीन मुलीच्या आत्याचार प्रकरणात कारागृहात होता, त्यानंतर तो बाहेर आल्यानंतर त्याने आणखी अशी काही कृत्य केली आहेत का? याचा सध्या तपास सुरु आहे.

भीमराव कांबळे विकृत आहे, त्याची लहान मुलीवर वाईट नजर असायची त्यामुळे त्याने यापूर्वी अस काही केलेय का याचा सध्या पोलिसांकडून शोध सुरु आहे.

अवकाळी पावसाचा रायगडला तडाखा! घरांची छपरे उडाली, वाहनांचे नुकसान, वीज पुरवठा झाला खंडित!

गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास रायगड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका महाड आणि पोलादपूर तालुक्याला बसला. महाडमधील खरवली, ढालकाठी, सोलमकोंड भागात वादळामुळे घरांची छपरे उडून नुकसान झाले. झाडे, विजेचे खांब उन्मळून पडल्याने वाहनांचे नुकसान झाले. पोलादपूर तालुक्यातील परसुळे गावातील गावातील घरांचे देखील या वादळी पावसात नुकसान झालं. विजेचे खांब पडून तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता.

- लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण

- कांद्याला प्रति किलो ५ रुपयांचा कवडीमोल भाव

- काल लासलगाव बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल मिळाला अवघा ५०० रुपयांचा भाव

- कमाल दर प्रति क्विंटल १५९९ रुपये तर सर्वसाधारण भाव ११२५ रुपये प्रति क्विंटल

- कांद्याच्या भावात घसरण झाल्यानं कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत

तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते देवानंद रोचकरी यांची जेलमध्ये रवानगी

जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेली एक वर्ष कारावासाची शिक्षा खंडपीठाने ठेवली कायम

तुळजापूर नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी डॉ.पंकज जावळे मारहाण प्रकरणात उच्च न्यायालयाचे आदेश

नगरपालिकेचे मुख्याधिकारी जावळे यांना 2007 मध्ये मृत्यू प्रमाणपत्र व ठेकेदारीच्या बिलावरून रोचकरी यांनी केली होती मारहाण

या प्रकरणात छत्रपती संभाजी नगर खंडपीठाने एक वर्ष कारावास व पंधरा हजार रुपये दंडाची सुनावली शिक्षा

अमरावती शहराला अप्पर वर्धा धरणावरून पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली,दोन दिवस शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद

पुण्यात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये ३०० टक्क्यांनी वाढ

पुणे शहरातील सायबर गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये 2023 ते 2024 दरम्यान तब्बल 300 टक्क्यांहून अधिक वाढ होत ती संख्या 1,504 वर

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका

गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास रायगड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका महाड आणि पोलादपूर तालुक्याला बसला.

जळगाव जामोदमध्ये जमीन घोटाळा उघड… दुय्यम निबंधकासह ६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल!

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरात जमीन व्यवहारातील मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. शासकीय कागदपत्रांमध्ये फेरफार करून ‘ब’ वर्गाच्या जमिनीचे ‘अ’ वर्ग धारणधिकारात रूपांतर करत फिर्यादीची तब्बल ५ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Maharashtra News Live Update: नाशिक TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला अटक, आज कोर्टात हजर करणार

छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरातल्या कौसर पार्क येथे अत्यंत गुप्त पद्धतीने ही पोलिसांनी कारवाई केली आहे. निदा खानला अटक केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालय समोर तिला आणण्यात आले, कोर्टात प्रोडूस करून निदा खानचा ताबा आणि ट्रांजिट नाशिक पोलिसांकडे करण्यात आले. यानंतर नाशिक पोलिसांनी रातोरात नाशिककडे घेऊन गेले आहे.

नाशिक अपडेट -

- TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला आज नाशिक कोर्टात हजर करण्याची शक्यता

- काल छत्रपती संभाजी नगरमधून पोलिसांनी निदा खानला केली अटक

- गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल २७ दिवसांपासून निदा खान होती फरार

- धार्मिक भावना दुखावणे, महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींना मदत करणे, विशिष्ट धर्माचे ट्रेनिंग देण्याचा निदा खानवर आरोप

- मागील २७ दिवसांपासून निदा खानचा नाशिक पोलिसांकडून सुरू होता शोध

- गरोदर असल्याचं कारण देत निदा खानने अटकपूर्व जामिनासाठी ही केला होता प्रयत्न

- मात्र निदा खान छत्रपती संभाजी नगरमधील एका कॉलनीत भाड्याने फ्लॅट घेऊन राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर काल रात्री गोपनीय पद्धतीने पोलिसांची कारवाई

- नाशिक कोर्टाने अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेऊन अटक पूर्व जामीन मिळवण्याचा निदा खानचा होता प्रयत्न

खामगाव शहरात किरकोळ वादातून दोन गटात तुफान राडा

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात निर्मल टर्निंग पॉईंट, मस्तान चौक परिसर या भागात काल रात्री किरकोळ वादातून दोन व्यक्तींमध्ये भांडण झालं त्यानंतर हा वाद इतका विकोपाला गेला की, मोठा जमाव दोन्ही बाजूने रस्त्यावर उतरला. त्यानंतर दोन्ही गटात तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले आहेत. तर काही वाहनांचही नुकसान झालं आहे. तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात मिळवली सध्या या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त असून दंगा काबू पथक तैनात करण्यात आल आहे. परिसरात रस्त्यावर दगडांचा खच पडलेला आहे. सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

उल्हासनगर कुर्ला कॅम्पमधील बी.के. पान शॉपसमोर भीषण आग

रात्री उशिरा एका जुन्या रिकाम्या कंटेनरने अचानक पेट घेतल्याने परिसरात धुराचे लोट पसरले त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या

त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांकडून पाण्याचा मारा करत आग पूर्णपणे विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले , अखेर 1 ते दीड तासाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले , सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नाही , मात्र आगीच कारण मात्र कळू शकते नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

Maharashtra News Live Update: पुणे विषारी दारू प्रकरण, दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

भाजपचा दणदणीत पराभव! 'आप'चा 900 जागांवर विजय, काँग्रेसची अवस्था काय?

Avoiding Chips and Cold Drink: चिप्स खाणं आणि कोल्ड ड्रिंक्स पीणं २१ दिवस बंद केल्यावर शरिरावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT