Maharashtra Board To Be Declared HSC Result Tomorrow Know How To Check Maharashtra HSC Result 2024 Online Saam Tv
महाराष्ट्र

HSC Maharashtra Board Result: १२वीचा निकाल ऑनलाईन कसा पाहाल? VIDEO बघा

How To Check Maharashtra Board's 12th HSC Result 2024: २१ मे रोजी दुपारी १ वाजता १२ वीचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. त्यामुळे मंडळातर्फे देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही निकाल पाहू शकणार आहात.

Priya More

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) घेण्यात आलेल्या १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल (12th Result) उद्या म्हणजे २१ मे रोजी जाहीर होणार आहे. १२ वीची परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि त्यांचे पालक निकालाची वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा २१ मे म्हणजे उद्या संपणार आहे. २१ मे रोजी दुपारी १ वाजता १२ वीचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. त्यामुळे मंडळातर्फे देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही निकाल पाहू शकणार आहात. १२ वीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल कुठे आणि कसा पाहायला मिळणार हे आपण जाणून घेणार आहोत...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने़ बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा ९ विभागीय मंडळांतर्फे म्हणजेच पुणे, नागपूर, औरंगबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नाशिक आणि कोकण येथे आयोजित करण्यात आली होती.

या अधिकृत वेबसाईटवर पाहा निकाल -

  • maharesult.nic.in

  • mahahsscboard.in

  • hsc.maharesults.org.in

  • hscresult.mkcl.org

  • results.gov.in.

असा पाहा निकाल -

  • mahresult.nic.in या किंवा वरती देण्यात आलेल्या कोणत्याही अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  • मुख्यपृष्ठावर उपलब्ध महाराष्ट्र HSC निकाल 2024 लिंक तपासा.

  • लॉग इन तपशील भरा आणि सबमिट वर क्लिक करा.

  • एंटर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.

  • निकाल डाउनलोड केल्यानंतर प्रिंट काढा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur Exit Poll: सोलापूर दक्षिण मतदारसंघातून कोण होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Buldhana Vidhan Sabha : महायुतीच्या उमेदवारांकडून धमक्या; मविआकडून पोलिसात तक्रार, सुरक्षा देण्याची मागणी

Saam Exit Poll : अजित पवार की शरद पवार, चिपळूणमध्ये कौल कुणाला? एक्झिट पोल कुणाच्या बाजूने? VIDEO

Pune Cantonment Exit Poll : पुणे कॅन्टोनमेंटमध्ये रमेश बागवे आमदार होणार? पाहा Exit Poll

World Travel : स्वित्झर्लंडपेक्षा लय भारी भारतातील 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT