devendra fadnavis and uddhav thackeray  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'उद्धव ठाकरे आणि हिंदुत्वाचा काही संबंध उरला आहे का?' भाजपचा हल्लाबोल

Maharashtra BJP News: "उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्ववाचा आता काही संबंध उरला आहे का? ज्यादिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत जाऊन बसला त्याच दिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत..." अशी टीका करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

Maharashtra Politics News:

नुकतेच चार राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल लागले. चारपैकी तीन राज्यात सत्ता खेचून आणत भाजपने दणदणीत विजय मिळवला. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने विरोधकांसाठी ही धोक्याची घंटा आहे.

मात्र भाजपच्या या विजयावर उद्धव ठाकरे यांनी ईव्हीएमची शंका व्यक्त केली असून एवढा आत्मविश्वास आहे तर लोकसभा ही एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, असे थेट आव्हान त्यांनी दिले आहे. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याचा भाजपने चांगलाच समाचार घेतला आहे.

'एक्स'च्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर पलटवार..

कर्नाटक, तेलंगणात काँग्रेस (Congress) जिंकली की लोकशाहीचा विजय आणि राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशात भाजप (BJP) जिंकली की इव्हीएमवर शंका, उद्धव ठाकरे किती रडारड करणार? असा टोला भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला आहे.

तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे. "उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्ववाचा आता काही संबंध उरला आहे का? ज्यादिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत जाऊन बसला त्याच दिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत. राम मंदिर आमच्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे," अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राम मंदिराच्या लोकार्पणामुळे पोटात गोळा..

"राम मंदिराच्या (Ram Mandir Ayodhya) मुद्द्यांवर मंदिर वही बनाऐंगे लेकीन तारीख नहीं बताऐंगे, अशी टीका तुम्हीच केली होती. पण आता २२ जानेवारी रोजी मंदिराचं लोकार्पण होतंय. त्यामुळे तुमच्या पोटात गोळा उठला आहे..." अशी खोचक टीकाही या पोस्टच्या माध्यमातून करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT