baramati by poll election Saam TV Marathi
महाराष्ट्र

Baramati Election : महाराष्ट्रात विधानसभेच्या २ जागांसाठी निवडणुका जाहीर, मतदान कधी? निकालाची तारीख स्पष्ट

Baramati assembly by election date : महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी पोट निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

Namdeo Kumbhar

Baramati and Rahuri assembly by election date announcement Maharashtra : पश्चिम बंगाल, तामिळनाडूसह ५ राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. यावेळी महाराष्ट्रातील पुण्यातील बारामती आणि अहिल्यानगरमधील राहुरी या मतदारसंघाच्या पोट निवडणुका जाहीर करण्यात आल्या. बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे, तर ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.

महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक -

  • अधिसूचना कधी निघणार ? - ३० मार्च २०२६

  • अर्ज दाखल कऱण्याची अंतिम तारीख - ६ एप्रिल २०२६

  • अर्जाची छाननी कधी होणार? ७ एप्रिल २०२६

  • अर्ज माघारी घेण्याची तारीख - ९ एप्रिल २०२६

  • मतदानाची तारीख - २३ एप्रिल २०२६

  • मतमोजणीची तारीख - ४ मे २०२६

पुण्यातील बारामतीचे आमदार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात २८ जानेवारी रोजी अकाली निधन झालं होतं. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीचे भाजप आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचं ऑक्टोबर २०२५ मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले होते. राहुरी आणि बारामती या दोन्ही विधानसभेच्या रिक्त जागांवर आज निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. बारामती आणि राहुरी या दोन्ही ठिकणाच्या निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Baramati and Rahuri assembly by election date announcement Maharashtra

बारामती अन् राहुरीत उमेदवार कोण असतील ?

दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात पोट निवडणूक होत आहे. तर भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने राहुरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक होत आहे. बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. तर राहुरीत शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या दोन्ही ठिकाणाच्या निवडणुका बिनविरोधात होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

बिनविरोध होणार पोट निवडणुका ?

बारामती (Baramati) आणि राहुरी (Rahuri) या दोन्ही ठिकाणी होणाऱ्या विधानसभेच्या पोट निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगरमध्ये बोलताना बिनविरोध निवडणुका व्हाव्यात, असे आवाहन विरोधकांना करण्यात आले. ते म्हणाले की, राहुरी आणि बारामतीची पोट निवडणूक बिनविरोध व्हायला हवी. पण आमच्यावर निवडणूक लादली तर आम्ही लढायला तयार आहोत, असे मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांना बोलताना म्हणाले होते. महाराष्ट्रातील मागील काही पोट निवडणुकीचा इतिहास पाहिला तर बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघाच्या निवडणुका बिनविरोधतच होतील, असा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Penguin Life: पेंग्विन काय खातात आणि किती वर्षे जगतात? ही माहिती ९९ टक्के लोकांना माहितच नसेल

Maharashtra Live News Update: भीमाशंकर मंदिरात खासदार निशिकांत दुबे यांचे दर्शन; तहसिलदार यांना चौकशीच्या सुचना

Yavatmal : हातपाय बांधून कारमध्ये कोंबलं, मुलं पळवणारी टोळी समजून गावकऱ्यांनी तरुणांना तुडवलं; दोघे गंभीर जखमी

फार्महाऊसवर सुरू होती ड्रग पार्टी; माजी आमदार निघाला कोकिन टेस्ट पॉझिटिव्ह, राजकीय वर्तुळात खळबळ

Assembly Election: ८.५ लाख सुरक्षा कर्मचारी, ४०हजार मतमोजणी अधिकारी...; कशा पार पडतील ५ राज्यांमधील निवडणुका?

SCROLL FOR NEXT