Maharashtra Ladki Bahin Yojana Saam TV Marathi
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फटका अनाथ मुलांना, निधी वळवल्यामुळे १२ महिन्यांपासून लाखो मुलांना लाभ नाही

Ladki Bahin Yojana, Bal Sangopan Yojana update : महाराष्ट्रातील बालसंगोपन योजनेचा निधी ‘लाडकी बहीण’ योजनेकडे वळवल्याचा आरोप होत असून, सोलापुरासह राज्यातील हजारो अनाथ मुलांना गेल्या १२ महिन्यांपासून सरकारी मदत मिळालेली नाही.

Namdeo Kumbhar

Bal Sangopan Yojana fund delay in Maharashtra : बालसंगोपन योजनेचा निधी 'लाडकी बहीण' योजनेकडे वळवल्यामुळे राज्यातील अनाथ मुलांना वर्षभरापासून सरकारी मदत मिळाली नाही. एकट्या सोलापुरातील १४ हजार अनाथ मुले वर्षभरापासून मदतीपासून वंचित असल्याचे समोर आले आहे.

राज्यातील अनाथ आणि निराश्रित चिमुकल्यांच्या हक्काचा 'बालसंगोपन योजनेचा' निधी गेल्या एक वर्षापासून रखडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासनाकडून वेळेवर अर्थसाहाय्य न मिळाल्यामुळे हजारो मुलांचे भवितव्य आता टांगणीला लागले आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यातील जवळपास १४ हजार विद्यार्थ्यांना गेल्या एक वर्षापासून या योजनेचा कोणताही लाभ मिळालेला नाही.

सोलापूर जिल्ह्यात बालसंगोपन योजनेचे १३ हजार ८४२ लाभार्थी आहेत. त्यांना शासनाकडून दरमहा २,२५० रुपये दिले जातात. तर, कोरोनात अनाथ झालेली सोलापूर जिल्ह्यातील १,२६० चिमुकली आहेत. त्यांना दरमहा चार हजार रुपये मिळतात. मात्र, या चिमुकल्यांना एक वर्ष झाले तरीदेखील शासनाचे अर्थसहाय्य मिळालेले नाही. बालसंगोपन योजनेचा निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकडे वळविल्याने राज्यातील पावणेदोन लाख लाभार्थी वर्षभरापासून मदतीविना असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

'लाडकी बहीण' योजनेकडे निधी वळवल्याची चर्चा

या संपूर्ण प्रकरणात अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, बालसंगोपन योजनेचा हा हक्काचा निधी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेकडे वळवण्यात आल्याची राजकीय व प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या निधीच्या कमतरतेमुळे कोरोना महामारीच्या काळात अनाथ झालेली निष्पाप मुलेही आता सरकारी मदतीपासून वंचित राहिली आहेत.

लाभार्थी पालकांमध्ये तीव्र संताप

आपल्या हक्काच्या पैशांसाठी आणि मुलांच्या संगोपनासाठी लाभार्थी कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक गेल्या अनेक महिन्यांपासून शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, प्रशासनाकडून केवळ पोकळ आश्वासने दिली जात असल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनाथ आणि गरजू मुलांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या उदासीन कारभारावर आता सर्वच स्तरातून टीका होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli : सांगलीत कधी काय होईल नेम नाय! चक्क मोबाइल टॉवर गेला चोरीला, चोरट्यांनी नेमकी संधी साधली कशी?

Maharashtra News Live Update: डिझेलसाठी लागणाऱ्या कॅनची मागणी वाढली, दरही 30 ते 40 टक्क्यांनी वाढले

६० टक्के ओबीसी, ३४ टक्के मराठा; थेट आकडेवारी सांगत मनोज जरांगे भाजप आमदारासामोर भडकले|VIDEO

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या कामाची बातमी! कोणत्याही क्षणी खात्यात येणार ₹२०००? महत्त्वाची अपडेट आली समोर

Weight Loss Yoga Poses: वजन कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग, जिमला न जाता घरीच करा हे 5 योगा

SCROLL FOR NEXT