Uddhav Thackeray Latest News Saam TV
महाराष्ट्र

Uddhav Thackeray News: 'घोषणांचा सुकाळ अन् अंमलबजावणीचा दुष्काळ..' उद्धव ठाकरे सरकारवर बरसले; राज ठाकरेंनाही टोला

Maharashtra Politics: अवकाळी पावसाने झालेले नुकसान, ललित पाटील अन् ड्रग्ज प्रकरणावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे.

Gangappa Pujari

सुरज मासुरकर, नागपूर|ता. १८ डिसेंबर २०२३

Maharashtra Assembly Winter Session 2023:

राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे. अवकाळी पावसाने झालेले नुकसान, ललित पाटील अन् ड्रग्ज प्रकरणावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. अधिवेशनासाठी ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे नागपुरात दाखल झालेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हिवाळी अधिवेशनावरुन राज्य सरकारवर चौफेर टीका केली.

दम असेल दर चौकशी लावा...

"नागपूरमध्ये जेव्हा अधिवेशन घेतलं जाते. तेव्हा विदर्भातील प्रश्नांने सुरूवात व्हायला हवी. पण सुरवातचं SIT ने वैगरे झाली. आम्ही त्यांना पत्र लिहलं सकी इक्बाल मिर्ची च काय? प्रफुल पटेलच काय? त्यावर अजून उत्तरे मिळाले नाही. असा टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लगावला. तसेच दम असेल तर एसआयटी लावा.. तुम्ही सिद्ध करा," असे आव्हानही ठाकरेंनी यावेळी दिले.

राज ठाकरेंना टोला...

तसेच यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) धारावी प्रकल्पाविरोधात काढलेल्या मोर्चावरुन केलेल्या विधानावरही सडेतोड उत्तर दिले. "मला आता कळालं की, अदानीचे चमचे कोण आहेत. आम्ही अदानींवर मोर्चा काढला पण चमचे का वाजत आहेत. धारावीकरांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो होतो. मुंबई विकण्यासाठी जे अदानींची चमचेगिरी करत आहेत त्यांची मला कीव वाटते.." असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकारकडून फक्त घोषणाच..

"नवाब मलिकांवर जे आरोप होते, तेच आरोप प्रफुल्ल पटेलांवरही आहेत.त्यांच्याबद्दल काय भूमिका आहे.. असा आमचा प्रश्न आहे. त्यात काय चुकले?" असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. "अधिवेशनात शेतकरी प्रश्न, दुष्काळ, अवकाळी पावसाने झालेले नुकसान असे अनेक मुद्दे आहेत, ज्यावर चर्चा व्हायला हवी. मात्र सरकारकडून फक्त घोषणाच होतात. त्यावर अंमलबजावणी होत नाही.." असे ते यावेळी म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागात पावसाचे थैमान

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा २२ अन् २४ कॅरटचे आजचे दर

Namo Shetakri Yojana: शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

नांदेडमध्ये रक्तरंजित थरार ! गँगवारमध्ये तिघांचा मृत्यू, शहरात दहशत

Dandruff Home Remedy : केस धुवण्यापूर्वी करा 'हे' काम, टाळूला येणार नाही खाज अन् कोंडाही होईल गायब

SCROLL FOR NEXT