Narendra Modi Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : हरियाणात जिंकलो, आता महाराष्ट्रात मोठा विजय मिळवायचाय, पंतप्रधान मोदींचा विश्वास

Maharashtra Election : हरियाणात भाजप जिंकला, आता माहाराष्ट्रात यापेक्षा मोठा विजय मिळवायचाय, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Namdeo Kumbhar

PM Narendra Modi : हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवली आहेत. आता महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात मोठा विजय मिळवायचा आहे, असे वक्तव्य केलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी पद्धतीने ७६०० कोटी रुपयांच्या विकासकामाचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली. त्याशिवाय महाराष्ट्रात मोठा विजय मिळवायचा निर्धार केलाय.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

आज महाराष्ट्राला 10 मेडिकल कॉलेज मिळाले आहेत. मागील आठवड्यात ठाणे आणि मुंबईला मेट्रोसह 30 हजार कोटींची प्रोजेक्टचे उदघाटन केलं. अनेक शहरात मेट्रोचा विस्तार होत आहे. अनके योजना आणल्या आहेत. ज्या गतीने विकास होत आहे त्याच गतीने काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार झाला. अनेक कामं आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने झाली, असे मोदी म्हणाले.

हरियाणाच्या निकालातून देशाचा काय मूड आहे तो समोर आला..तिसऱ्यांदा सत्तेत येणे ऐतिहासिक आहे. अर्बन नक्षलबद्दल लोकामध्ये खोटं पसरवलं, पण त्यांनी काँग्रेस आरक्षण हिसकावून मताचे ध्रुवीकरण होत असल्याचं लक्षात आलं. काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकवले. हरियाणा भाजपच्या योजनांमुळे खूश आहे. वेगवेगळ्या पद्धतीने अडवण्याचे प्रयत्न केले. काँग्रेसच्या अर्बन नक्षल कटाचे शिकार झाले नाही. काँग्रेस समाजाला भ्रमित करण्याचे फॉर्म्युला आहे. मुस्लिम समाजालाही भीती दाखवा, हा काँग्रेसचा फर्म्युला अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

काँग्रेसवर मोदींची जोरदार टीका -

काँग्रेसच्या एकही नेत्यांनी किती जाती आहे हे सांगितलं. त्यावेळी त्यांचा तोंडाला कुलूप लावले असते. हिंदूच्या एका जातीला दुसऱ्या जातीसोबत भांडण लावा आहे, काँग्रेसची नीती आहे. काँग्रेस स्वताचे वोट बँक पक्के करण्यासाठी जातीयवाद करत आहे. काँग्रेस सर्वजण हिताय सुखाय या संपवण्याचे काम करत आहे, काँग्रेस सत्तेत येण्यासाठी काही करण्यात येत आहे, असे मोदी म्हणाले.

महाराष्ट्रात मोठा विजय मिळवायचाय ?

काँग्रेस द्वेषाची सर्वात मोठी फॅक्टरी बनत आहे. हे गांधीजींना स्वातंत्रतानंतर समजून घेतलं होतं. म्हणून महात्मा गांधींनी काँग्रेस विलीन करा असे म्हटलं होतं. काँग्रेस संपली नाही, मात्र देशाला संपवत आहे. महाराष्ट्र लोक हे ऐकणार नाही. हरियाणात भाजपचा विजय झाला. आता महाराष्ट्रात यापेक्षा मोठा विजय मिळवायचा आहे.

मेडिकल जागा वाढणार आहे. मेडीकल शिक्षेला सुलभ बनवण्याचे काम केले. यामुळे महाराष्ट्रामधील गरीब मुलांसाठी नवीन दरवाजे उघडले. महाराष्ट्रमधील युवा मराठीतून शिकून डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

SCROLL FOR NEXT