Maha Vikas Aghadi Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Election : निकालाआधी मविआच्या घडामोडींना वेग, मातोश्रीवर तातडीची बैठक, Inside Story साम टीव्हीकडे

Maha Vikas Aghadi : २३ तारखेला विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे. त्याआधी मविआच्या नेत्याची महत्ताची बैठक पार पडली.

Namdeo Kumbhar

Maharashtra Election News : महाविकास आघाडीची सत्ता आली तर काय राजकीय गणित असतील किंवा सत्ता गेली तर मग काय राजकीय गणित असतील या बाबत सविस्तर आढावा मातोश्रीवरील बैठकीत घेण्यात आलाय. (MVA Planning)

विधानसभेचा निकाल 23 तारीखेला स्पष्ट होईल. त्या दिवशी निकाल हा कटू कट आल्यावर मविआच्या आमदारांना कसे संभाळाचे, त्यांना कसे सुरक्षित ठिकाणी ठेवायचे... याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जर सत्ता आलीच तर लवकरात लवकर सत्ता स्थापन करायचीच यावर चर्चा झाल्याचं समजतेय. मविआच्या नेत्यांची आधी ग्रॅंड हयात या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. यानंतर हे सर्व नेते मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर जयंत पाटील यांनी सिल्वर ओकवर शरद पवार यांची भेट घेतली.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मतदान पूर्ण होताच मुंबईमध्ये दाखल झाले. मविआचे प्रमुख नेते संजय राऊत, अनिल देसाई, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील जयंत पाटील यांच्यात हॅाटेल हयात इथे तब्बल अडीच तास बैठक चालली.

ही बैठक संपवून जंयत पाटील, संजय राऊत, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील एकाच गाडीत बसून मातोश्रीवर बैठकीला पोहचले. तिथे उद्धव ठाकरे यांच्यासोबत तब्बल तासभर चर्चा करून पुन्हा मविआचे नेते जंयत पाटील, सतेज पाटील, बाळासाहेब थोरात हे एकत्रीत बाहेर पडले.

या दोन्ही बैठकांमध्ये महाविकास आघाडीकडून बंडखोर अपक्ष उमेदवार यांना संपर्क सुरू करण्यात आल्याबद्दल चर्चा झाली. बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांच्या माध्यमातून असे बंडखोर जे विजयी होऊ शकतात अशा उमेदवार समवेत फोनवर संपर्क करण्यात आला.महाविकास आघाडी वतीने निकाल आधीच बंडखोरांबरोबरच इतर अपक्ष उमेदवार जिंकून येण्याची शक्यता आहे. यांना ही संपर्क साधला जात आहे. त्याबाबत चर्चा झाली. शिवाय निकालाचे कल समोर येत असताना आपापले आमदारांना आपल्याशी बांधून कसे ठेवायचे याबाबत चर्चा करण्यात आल्याची सुत्रांची माहिती.

मविआच्या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात, सतेज पाटील व जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर सर्वांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्यासोबत दीड तास बैठक झाली. आपल्याला बहुमत मिळणार व सरकार येणार असा मविआला विश्वास. बैठकीत मतमोजणी, सत्ता स्थापन तसेच, अपक्ष आमदारांवर चर्चा झाल्याची माहिती. सत्ता आल्यास पुढील रणनीती काय असणार यावर चर्चा झाल्याची सुत्रांची माहिती.

बाळासाहेब थोरात काय म्हणाले ?

आमचं सरकार सहज बनत आहे. यासाठी बैठकीत असा निर्णय झाला की निकालाच्या दिवशी आमचे सर्व इलेक्शन एजंट हे मतमोजणी केंद्रावरून संपूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर निकाल पत्रावर सही झाल्यानंतर तिथून निघतील. आम्हाला कोणत्याही प्रकारची जुळवा जुळव करण्याची वेळ येणार नाही. आमचं सरकार सहज बनत आहे. मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा युतीचे सरकार घालवणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. निकाल लागल्यानंतर आमचे सरकार बनल्यानंतर मुख्यमंत्री कोण यावर चर्चा होईल. सध्या महायुतीचे सरकार घालवणे हे जास्त महत्त्वाचे आहे. आमदार फुटण्याची आम्हाला भीती नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी बैठकीनंतर सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

Maharashtra Exit Poll: तिरोडामध्ये रविकांत बोपचे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Winter Foods: हिवाळ्यात भारतातील या ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत आहात का? 'हे' पदार्थ नक्की खाऊन बघा..

SCROLL FOR NEXT