विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर विविध एक्झिट पोलमध्ये महायुतीची हवा दिसत आहे. तर या पोलने महाविकास आघाडीचे टेन्शन वाढवलं आहे.
पुण्यात मतदान संपताच खडकवासला मतदारसंघाचे मविआचे उमेदवार सचिन दोडके यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली फटाके फोडत आणि सचिन दोडके यांना खांद्यावर घेत काढली दोडके यांची विजयी मिरवणूक मतदान संपताच दोडके यांच्या विजयाचे लागले फ्लेक्स कार्यकर्त्यांकडून कार्यालयाच्या बाहेर जोरदार जल्लोष पाहयाला मिळाला.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
अहमदनगर - ६१.९५टक्के,
अकोला - ५६.१६ टक्के,
अमरावती -५८.४८ टक्के,
औरंगाबाद- ६०.८३ टक्के,
बीड - ६०.६२ टक्के,
भंडारा- ६५.८८ टक्के,
बुलढाणा-६२.८४ टक्के,
चंद्रपूर- ६४.४८ टक्के,
धुळे - ५९.७५ टक्के,
गडचिरोली-६९.६३ टक्के,
गोंदिया -६५.०९ टक्के,
हिंगोली - ६१.१८ टक्के,
जळगाव - ५४.६९ टक्के,
जालना- ६४.१७ टक्के,
कोल्हापूर- ६७.९७ टक्के,
लातूर _ ६१.४३ टक्के,
मुंबई शहर- ४९.०७ टक्के,
मुंबई उपनगर-५१.७६ टक्के,
नागपूर - ५६.०६ टक्के,
नांदेड - ५५.८८ टक्के,
नंदुरबार- ६३.७२ टक्के,
नाशिक -५९.८५ टक्के,
उस्मानाबाद- ५८.५९ टक्के,
पालघर- ५९.३१ टक्के,
परभणी- ६२.७३ टक्के,
पुणे - ५४.०९ टक्के,
रायगड - ६१.०१ टक्के,
रत्नागिरी- ६०.३५ टक्के,
सांगली - ६३.२८ टक्के,
सातारा - ६४.१६ टक्के,
सिंधुदुर्ग - ६२.०६ टक्के,
सोलापूर -५७.०९ टक्के,
ठाणे - ४९.७६ टक्के,
वर्धा - ६३.५० टक्के,
वाशिम -५७.४२ टक्के,
यवतमाळ - ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आज दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सायंकाळी ०५. ०० वाजेपर्यंत अंदाजे ४९.०७ टक्के मतदान झाले आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील सायंकाळी ०५. ०० वाजेपर्यंतची विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (अंदाजे) खालीलप्रमाणे :-
मतदारसंघ मतदान (अंदाजे)
१७८-धारावी - ४६.१५ टक्के
१७९सायन-कोळीवाडा- ५०.५४ टक्के
१८०- वडाळा – ५२.६२ टक्के
१८१- माहिम – ५५.२३ टक्के
१८२-वरळी – ४७.५० टक्के
१८३-शिवडी – ५१.७० टक्के
१८४-भायखळा – ५०.४१ टक्के
१८५- मलबार हिल – ५०.०८ टक्के
१८६- मुंबादेवी - ४६.१० टक्के
१८७- कुलाबा - ४१.६४ टक्के
पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील दुपारी 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी
वडगाव शेरी 50.46 टक्के.
शिवाजीनगर 44.95 टक्के.
कोथरूड 47.42 टक्के.
खडकवासला 51.56 टक्के.
पर्वती 48.65 टक्के.
हडपसर 45.02 टक्के.
पुणे कॅन्टोन्मेंट 47.83 टक्के.
कसबा पेठ 54.91 टक्के.
राज्यात पाच वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान झालं आहे. आता मतदानसाठी शेवटचा एक तास राहिला आहे.
अभिनेता शाहरुख खान मतदानासाठी पोहोचला आहे. वांद्र्याच्या माउंट मेरी स्कूलमध्ये शाहरुख खान मतदानाचा हक्क बजावणार आहे.
भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांचे स्वीय सहाय्यक,कार्यकर्ते आणि अपक्ष उमेदवार गीता जैन यांचे समर्थक भिडले
भाईंदर पश्चिमेच्या अहिंसा चौक जवळ घडली घटना,
स्वतः घटनास्थळी नरेंद्र मेहता पोहचले आणि वातवरण शांत करण्याचा प्रयत्न केला
सध्या वातावरण शांत असून कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
नागरिकांनी जास्तीच जास्त प्रमाणात खाली उतरून मतदान करावे,बाकी लक्ष देऊ नये असे आव्हान नरेंद्र मेहता यांनी केले.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार आमदार राम शिंदे यांचे नातेवाईक असणाऱ्या खांडेकर नावाच्या व्यक्तीला सहा ते सात लाख रुपयांची रोकडसह पकडले आहे.
आष्टी मतदारसंघातील पाटोदा तालुक्यात असणाऱ्या बेदरवाडी गावात दोन गटात तुंबळ हाणणारी झाल्याचं पाहायला मिळालं.
सायन कोळीवाडा मतदारसंघांमध्ये पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक
भाजपा आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर पोलिसांसोबत भिडले
काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मतदारांवर प्रभाव टाकल्याचा भाजपचा आरोप
पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना मदत होत असल्याचा भाजपचा गंभीर आरोप
भाजप कार्यकर्त्यांना दडपल्याने पोलिसांना लाड व दरेकरांनी विचारला जाब
Shiv Sena vs Shiv Sena : कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात एकनाथ शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद
उत्तरचे उमेदवार राजेश क्षीरसागर कसबा बावडा परिसरात गेले असता कार्यकर्त्यांमध्ये झाला वाद
शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील कार्यकर्त्यास गद्दार हा शब्द वापरल्याने तणाव निर्माण झाला
जमलेल्या जमावाला आमदार सतेज पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी पांगवलं
Beed Election News : बीडचा केज विधानसभा मतदारसंघात विडा गावामध्ये मतदान केंद्राबाहेर दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झालीय.. मतदान करण्यावरून ही हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.. राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये शुल्लक कारणावरून ही हनामारी झाली. यानंतर काही काळ मतदान केंद्रावर तणाव निर्माण झाला होता..यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली.. तसेच मतदान केंद्रावरील पोलीस बंदोबस्त वाढवला आहे..
Mumbai Election Voting : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आज दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात दुपारी ०३.०० वाजेपर्यंत अंदाजे ३९.३४ टक्के मतदान झाले आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील दुपारी ०३.०० वाजेपर्यंतची विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (अंदाजे) खालीलप्रमाणे:-
मतदारसंघ मतदान (अंदाजे)
१७८-धारावी - ३५.५३ टक्के
१७९सायन-कोळीवाडा- ३७.२६ टक्के
१८०- वडाळा – ४२.५१ टक्के
१८१- माहिम – ४५.५६ टक्के
१८२-वरळी – ३९.११ टक्के
१८३-शिवडी – ४१.७६ टक्के
१८४-भायखळा – ४०.२७ टक्के
१८५- मलबार हिल – ४२.५५ टक्के
१८६- मुंबादेवी - ३६.९४ टक्के
१८७- कुलाबा - ३३.४४ टक्के
Maharashtra Election Voting : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. ती आता संपलेली आहे. मात्र अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रंगा असल्यामुळे रांगेतील शेवटच्या मतदारापासून टोकणचे वाटप करून या सर्व मतदारांचे मतदान घेतले जात आहे. तर ज्या ठिकाणी मतदार नाही त्या ठिकाणी मतदान केंद्राला कुलूप लावण्यात आले आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्ह्यात 51 टक्के मतदान झाले होते. यावेळेसही जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी 75 टक्के असेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.
1) 99, परतूर विधानसभा मतदारसंघ
47.57 टक्के
2) 100, घनसावंगी विधानसभा मतदारसंघ
51.99 टक्के
3) 101,जालना विधानसभा मतदारसंघ
46.74 टक्के
4) 102, बदनापुर विधानसभा मतदारसंघ (एससी राखीव)
51.29 टक्के
5) 103, भोकरदन विधानसभा मतदारसंघ
53.29 टक्के
क्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. ती आता संपलेली आहे. मात्र अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रंगा असल्यामुळे रांगेतील शेवटच्या मतदारापासून टोकणचे वाटप करून या सर्व मतदारांचे मतदान घेतले जात आहे. तर ज्या ठिकाणी मतदार नाही त्या ठिकाणी मतदान केंद्राला कुलूप लावण्यात आले आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्ह्यात 51 टक्के मतदान झाले होते. यावेळेसही जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी 75 टक्के असेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
दारव्हा शहरातील एडेड हायस्कूल येथे सहकुटुंब येत मतदान चा हक्क बजावला 20 वर्ष पासून सातत्याने जनतेने मला कुटुंबातील सदस्य प्रमाणे प्रेम दिले आहे तेच प्रेम या निवडणुकीत सुद्धा मिळाले मला विश्वास आहे. की मी पुन्हा जनतेची सेवा करायला निवडून येईल..
पूर्णा शहरातील दोन्ही हात नसलेल्या व युथ आयकॉन ठरलेल्या योगेश खंदारे यांनी पायाने मतदान करत मतदानाचा हक्क बजावला
काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्या शेळके यांच्या प्रचार कार्यालयातकाही लोक लिफाफे घेऊन पैसे वाटत असल्याचा भाजपाचा आरोप
हे पैसे मतदारांना वाटण्यासाठी आणले असल्याचा भाजपचा आरोप...
त्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
या ठिकाणी निवडणूक विभागाचे काही अधिकारी आणि त्यांनी काही लोकांना सोबत घेऊन गेले.
तेच काँग्रेसने मात्र आरोप फेटाळला आहे. पण भाजपने निवडणूक विभागाच्या माध्यमातून कारवाई करायची मागणी केली आहे.
यांचा खरा चेहरा समोर आला. चा सर्व खर्च संगमनेरहून.हे पैसे संगमनेरचेच. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पैसे वाटपाच्या व्हायरल व्हिडिओवर सुजय विखे यांची प्रतिक्रिया.सुजय विखे यांचा नाव न घेता बाळासाहेब थोरात यांच्यावर आरोप.त्यांनी कितीही पैसे वाटले तरी विखे पाटलांचे एक लाखाचे मताधिक्य फिक्स. शिर्डीत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून उमेदवार प्रभावती घोगरे यांच्यासाठी पैसे वाटप सुरू असल्याचा व्हिडिओ व्हायरल.व्हायरल व्हिडिओवर सुजय विखे यांची प्रतिक्रिया.
सोनू सुदने आज मतदानाचा अधिकार बजावला आहे.
महत्वपूर्ण दिवस आहे महाराष्ट्र साठी त्यांचं कर्तव्य बनत मतदान करायचं
देशाच्या योगदानासाठी मतदान करणे महत्त्वाचा आहे
आज मतदान करा मग पाच वर्ष तक्रार करण्याची गरज पडत नाही, असं सोनू सुदने सांगितलं आहे.
अभिनेते मोहन आगाशे यांनी केलं मतदान
किती लोक विचारपूर्वक मतदान करतात. विचार करून मतदान करणं किंवा विचार न करता मतदान करणे याचा किती लोकशाहीशी संबंध आहे असं मला वाटत नाही. आम्ही एवढे कष्टाने मतदान करतो याची जाणीव राहिली पाहिजे
कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट चांगला ! उत्तर मधून मविआ पुरस्कृत उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार
राज्यात महाविकासाघाडीला पोषक वातावरण ! 100 टक्के मविआचं सरकार येणार
मालोजीराजे छत्रपती यांचा दावा
मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा
राज्यातील महागाईसह दुषित वातावरणाला जनता त्रस्त
मधुरिमाराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे यांनी वरुण सरदेसाई यांची भेट घेतली आहे. वरुण सरदेसाई हे वाद्रे पूर्व येथून निवडणूक लढवत आहे.
मतदारसंघनिहाय टक्केवारी
1)पिंपरी- 21.34
2)चिंचवड- 29.34
3)भोसरी- 30.41
4)वडगाव शेरी- 26.68
5)शिवाजी नगर- 23.46
6)कोथरूड- 27.60
7) खडकवासला- 29.05
8) पर्वती- 27.19
9) हडपसर- 24.15
10) कँटनमेंट- 25.40
11) कसबा- 31.67
12) मावळ- 34.17
येवला
छगन भुजबळ यांना मतदान केंद्रात जाण्यापासून स्थानिक विरोधकांनी रोखले
येवल्यातील खरवंडी मतदान केंद्रावरील घटना
मी उमेदवार असल्याने मला मतदान केंद्रात जाण्याचा अधिकार असल्याचे भुजबळांचे प्रत्युत्तर
स्थानिक आणि मंत्री भुजबळांमध्ये बाचाबाची
धुळ्यात 106 वर्षीय आजीने बजावला मतदानाचा हक्क
देवपूर येथील महाजन हायस्कूल येथे केले मतदान
धुळ्यात 106 वर्षीय आजीने मतदानाचा हक्क बजावला
दुर्गाबाई वाघ असे या वृद्ध आजीचे नाव आहे.
आरमोरी- 51.05
गडचिरोली - 49.17
अहेरी - 52.84
जिल्ह्यात एकूण 50.89 टक्के मतदान
सुरक्षेच्या दृष्टीने दुपारी 3 वाजेपर्यंतच आहे मतदानाची वेळ
नांदगावमध्ये भुजबळ आणि बोरसे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा राडा झाला आहे. पैसे वाटल्याच्या आरोपावरुन दोन्ही गटांचे समर्थक भिडले आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे:
अहमदनगर - ३२.९० टक्के,
अकोला - २९.८७ टक्के,
अमरावती - ३१.३२ टक्के,
औरंगाबाद- ३३.८९ टक्के,
बीड - ३२.५८ टक्के,
भंडारा- ३५.०६ टक्के,
बुलढाणा- ३२.९१ टक्के,
चंद्रपूर- ३५.५४ टक्के,
धुळे - ३४.०५ टक्के,
गडचिरोली-५०.८९ टक्के,
गोंदिया - ४०.४६ टक्के,
हिंगोली -३५.९७ टक्के,
जळगाव - २७.८८ टक्के,
जालना- ३६.४२ टक्के,
कोल्हापूर- ३८.५६ टक्के,
लातूर _ ३३.२७ टक्के,
मुंबई शहर- २७.७३ टक्के,
मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के,
नागपूर - ३१.६५ टक्के,
नांदेड - २८.१५ टक्के,
नंदुरबार- ३७.४० टक्के,
नाशिक - ३२.३० टक्के,
उस्मानाबाद- ३१.७५ टक्के,
पालघर-३३.४० टक्के,
परभणी-३३.१२टक्के,
पुणे - २९.०३ टक्के,
रायगड - ३४.८४ टक्के,
रत्नागिरी-३८.५२ टक्के,
सांगली - ३३.५० टक्के,
सातारा -३४.७८ टक्के,
सिंधुदुर्ग - ३८.३४ टक्के,
सोलापूर - २९.४४,
ठाणे -२८.३५ टक्के,
वर्धा - ३४.५५ टक्के,
वाशिम - २९.३१ टक्के,
यवतमाळ -३४.१० टक्के मतदान झाले आहे.
- सोलापूर शहर मध्य - 28.61%
- करमाळा विधानसभा -27.34%
- माढा विधानसभा - 26.31%
- बार्शी विधानसभा - 32.71 %
- मोहोळ विधानसभा - 30.51%
- सोलापूर शहर उत्तर विधानसभा - 29.50%
- अक्कलकोट विधानसभा - 33.88%
- सोलापूर शहर दक्षिण - 29.53%
- पंढरपूर विधानसभा - 24.26%
- सांगोला विधानसभा - 31.58%
- माळशिरस विधानसभा - 30.50%
सरासरी : 29.44 % मतदान
1) 99, परतूर विधानसभा मतदारसंघ
32.56 टक्के
2) 100, घनसावंगी विधानसभा मतदारसंघ
36.35 टक्के
3) 101,जालना विधानसभा मतदारसंघ
34 टक्के
4) 102, बदनापुर विधानसभा मतदारसंघ (एससी राखीव)
40.02 टक्के
5) 103, भोकरदन विधानसभा मतदारसंघ
38.92 टक्के
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला हाणामारी केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कल्याण पूर्व मतदारसंघात तृतीयपंथीयांचा मतदानावर बहिष्कार
कल्याण पूर्व मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचारी पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा तृतीयपंथीयांचा आरोप
कल्यान पूर्वेतील राजीव गांधी विद्यालय मतदान केंद्रावर घडला प्रकार
वाशी येथील एका इमारतीला लागली आग.
Jn 3 टाईप इमारतीच्या तळ मजल्यावरील एका फ्लॅटला लागली आग.
तळ मजल्यावर आग लागल्याने इमारतीमधील सर्व रहिवासीयांना अग्निशमन दलाने काढले बाहेर.
आगीमध्ये एक वृद्ध व्यक्ती फ्लॅटमध्ये अडकला होता मात्र अग्निशमन दलाने वृद्ध व्यक्तीला काढले बाहेर.
अग्निशमन दलाने आगीवर मिळवले नियंत्रण.
नागरिकांच्या सतर्कतेने आणि अग्निशमन दलाच्या कार्यतत्परतेमुळे वाचले एका वृद्धाचे प्राण.
बारामतीच्या मतदान केंद्रावर अजित पवार दाखल झाली आहे. शर्मिला पवार यांनी केलेल्या आरोपानंतर आता अजित पवार बारामतीच्या मतदान केंद्राबाहेर गेले आहे. ज्या ठिकाणी युगेंद्र पवार आणि अजित पवार गटात राडा झाला होता. तिथे ते पोहचले आहेत.
राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे अध्यक्ष मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
अभिनेत्री हेमा मालिनीने मतदानाचा अधिकार बजावला आहे. तिने मुलगी ईशा देओलसह मतदान केले आहे.
कल्याण पश्चिम विधानसभेतील आधारवाडी परिसरात पोलिंग बूथ लावण्या वरून शिंदे -ठाकरे गटात वाद
कल्याण पश्चिम पुण्योदय पार्क येथे शिवसेना ठाकरे गटाकडून लावण्यात आलेले बूथची शिंदे गटाकडून तोडफोड
ठाकरे गटाचे शाखाप्रमुख यांना देखील मारहाण, ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखचा आरोप..
तर शिंदे गटाचे माजी नगरसेवक जयवंत भोईर यांनी आरोप फेटाळले....
कल्याण मधील खडकपाडा पोलिस स्थानकात एनसी दाखल, पोलिसकडून तपास सुरु
बीडच्या परळी मतदारसंघातील नाथरा गावी धनंजय मुंडे पंकजा मुंडे प्रीतम मुंडे यांच्या सहकुटुंब यांनी बजावला मतदानाचा हक्क
आजचा दिवस हा आपल्याला हव्या त्या सुधारणा करण्याची मागणी तसेच तक्रारी दाखल करण्याचा दिवस आहे त्यामुळे जास्तीत जास्त बाहेर पडून सगळ्यांनी मतदान करावं अशी प्रतिक्रिया अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिने दिली आहे. पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावल्यानंतर बोटावरची शाई दाखवत मतदानाच्या बाबतची उत्सुकता आणि कर्तव्य याबाबत प्रियदर्शनीने प्रतिक्रिया दिली आहे.
मिरा रोड सेंट हेरियस हाय स्कूल मध्ये बजावला मतदानाचा हक्क
नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे मुझफर हुसेन यांनी केले आवाहन
जनतेमध्ये निराशाची भावना आहे,मागील दहा वर्षात भ्रष्ठाचार,निराशाच मिळाली त्यामुळे जनतेने काँग्रेस एक संधी द्यावी असे आव्हान हुसैन यांनी केले.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला...राळेगणसिद्धी येथे त्यांनी मतदान केले...यावेळी पैसे घेऊन मतदान केल्याने लोकशाही धोक्यात येते असं अण्णा म्हणाले...सोबतच मतदारांनी चारित्र्यसंपन्न उमेदवारालाच मतदान केलं पाहिजे...महाराष्ट्रात बदल घडवायचा असेल तर उमेदवार चारित्र्यशील असला पाहिजे असं अण्णा म्हणाले.
अभिनेत्री मृण्मयी आणि गौतमी देशपांडेने मतदानाचा अधिकार बजावला आहे. त्यांनी कसबा मतदारसंघात मतदान केले आहे. कुमठेकर रोडवरील ट्रेनिंग कॉलेज मतदान केंद्रावर मतदान केलं आहे.
बारामतीत विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडत आहे.शहरातील महात्मा गांधी बालक मंदिर बूथमध्ये अजित पवार गटाकडून युगेंद्र पवारांच्या कार्यकर्त्यांना दमबाजी केली जात असल्याचा आरोप युगेंद्र पवारांच्या आई शर्मिला पवार यांनी केला आहे.
नितेश आणि निलेश दोन्ही मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील.
विनोद तावडेंसारख्या एका पक्षाच्या नेत्याला अशाप्रकारे वागणूक देणे मला पसंत नाही.
ज्यांना मी घडवलं, ज्यांनी माझ्या घरी खाल्लेलं तेच इथे विरोधक आहेत.द्वेषापोटी त्यांचा विरोध आहे.राजकीय विरोध नाही.इथल्या लोकांना माहिती आहे आमच्याशिवाय विकास इथे कोणी करू शकत नाही.त्यामुळे लोकांना मी हवा आहे.
दोन्ही मुले जर मंत्री बनले तर माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही.ईश्वराच्या कृपेने तस घडलं तर चांगलंच आहे.
मला कधी रवी राणा यांनी शहरात बुलेटवर फिरवल नाही, मात्र आम्ही नेहमी मतदानासाठी बुलेटवर येतो
राज्यात भाजपाच सरकार येईल व देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला
तर माझा विजय निश्चित आहे व राज्यात महायुतीचे सरकार येईल अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली
ज्यातील महत्त्वाच मतदारसंघ म्हणून चर्चेत आलेलं वर्ध्याच्या आर्वी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुमीत वानखेडे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवला.सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावून या महाविजयाला व देशाच्या प्रगतीला मदत करण्याचे सुमीत वानखडे यांनी यावेळी मतदारांना आव्हाहन केले.यावेळी सुमित वानखेडे हे आपल्या कुटुंबासह मतदान केले..राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव म्हणून यांनी काम केल्यानंतर विद्यमान आमदार दादाराव केचे यांची उमेदवारी डावलून उमेदवारी सुमित वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आल्याने आर्वी मतदारसंघ चर्चेत आला होता.
खामगाव मतदार संघातील गेरू माटरगाव व श्रीधर नगर येथील दोन मतदान केंद्रावरील मतदान यंत्राच्या बॅटरी खराब झाल्याने मतदान थांबले.
गेल्या अर्ध्या तासापासून दोन्ही मतदान केंद्रावरील मतदान यंत्राच्या बॅटरी खराब झाल्याने मतदान थांबलेले आहे.
अद्यापही दुसरे मतदान यंत्र या ठिकाणी पोहोचलेले नाही
धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघासाठी एकुण 1523 मतदान केंद्रावर आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.सकाळी 11 वाजेपर्यंत 17.7 टक्के मतदान झाले आहे.जिल्ह्यातील चार मतदार संघामध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत उमरगा येथे सर्वांधीक 17.36 टक्के तर उस्मानाबाद 15.92 टक्के,तुळजापूर 18.13 टक्के,परंडा 15.86 टक्के मतदान झाले आहे.
- इगतपुरी मतदारसंघातील तळेगाव येथे गोंधळ
- मतदान केलेल्या उमेदवाराला मतदान न जाता दुसऱ्या उमेदवाराला जात असल्याचा जात असल्याचा आरोप
- नागरिकांच्या तक्रारीमुळे काही काळ मतदान थांबवले
- निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस प्रशासन मतदान केंद्रावर दाखल
- नागरिकांच्या तक्रारीनंतर इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील तळेगाव येथे घडलेली घटना चर्चेत, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू...
1)पिंपरी- 11.46
2)चिंचवड- 16.97
3)भोसरी- 16.83
4)वडगाव शेरी- 15.48
5)शिवाजी नगर- 13.21
6)कोथरूड- 16.05
7) खडकवासला- 17.05
8) पर्वती- 15.91
9) हडपसर- 11.46
10) कँटनमेंट- 14.12
11) कसबा- 18.33
12) मावळ- 17.92
जे काम ते गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहेत कुठेतरी असतील झालेले सरकार आता स्थिर झालेलं पहायला मिळेल तसंच एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हाव अशी इच्छा मराठी अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी व्यक्त केली आहे. पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात असलेल्या मतदान केंद्रावर आज प्रवीण तरडे यांनी त्यांच्या पत्नी स्नेहल तरडे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला.
आज सकाळपासून महाराष्ट्रात एकूण १८.१४ टक्के मतदान झाले आहे. गडचिरोलीत सर्वाधिक म्हणजेच ३० टक्के मतदान झाले आहे. मुंबई शहरात १५.७८ टक्के मतदान झाले आहे. मुंबई उपनगरात १७.९९ टक्के मतदान झाले आहे. मुंबईत सगळ्यात जास्त भांडुप पश्चिम मध्ये मतदान झालं आहे. भांडुप पश्चिम मध्ये २३.४३% मतदान.
लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील टेंभुर्णी गावात ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय.. गावातील मागच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या स्मशानभूमीच्या प्रश्नासाठी गावकऱ्यांनी हा निर्णय घेतलाची माहिती मिळत आहे.. अनेकदा आंदोलन करू नही आणि निवेदन देऊनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.. तर 923 इतकी या गावात मतदार संख्या आहे...
विनोद तावडे यांनी केलेल्या वक्तव्यावर हितेंद्र ठाकूर यांचे उत्तर
विवांत हॉटेल ठाकुर यांचे असल्यामुळे त्यांनी गोंधळ घालायचे नियोजन केले होते असं वक्तव्य तावडे यांनी केले होते...
त्यावर हितेंद्र ठाकूर यांनी उत्तर देत ते हॉटेल तावडेंनीच माझ्या नावावर करावे असे म्हटले
काल जे भिजलेल्या कोंबडी सारखे होटेल मध्ये बसून होते त्यांना मुंबईला गेल्यावर कंठ फुटला असे ते म्हणाले
खोटं बोलायचं आणि ते रेटून बोलायचं ही त्यांची सवय आहे - आमदार हितेंद्र ठाकूर
अनुपम खेर यांनीदेखील आज मतदानाचा अधिकार बजावला आहे. त्यांनी सर्व नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज आपल्या मतदानाचा हक्क बजावला, घनसावंगी मतदारसंघात गोरी गंधारी गावात मनोज जरांगे यांनी मतदान केल. यावेळी प्रत्येकाने मतदान करून आपल्या हक्काचा माणूस बसवला पाहिजे , यावेळी मतदानाचा उठाव करावा लागेल असेही मनोज जरांगे यांनी म्हंटले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात मतदान करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका, पुणे-बेंगलोर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय.
मतदानापूर्वी मतदारांवर ही वेळ आल्यानं मतदार चांगलाच संताप व्यक्त केलाय.खेड शिवापूर टोल नाक्याच्या अलीकडे तब्बल पाच ते सात किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत.
एरवी कात्रजच्या नवले पुलावरून खेड शिवापूर टोल नाक्यावर पोहचण्यासाठी अवघे 15 ते 20 मिनिटं लागायचे, आज मात्र दोन तास उलटून गेले तरी मतदार खेड शिवापूरच्या टोल नाक्यापर्यंत ही पोहचू शकलेले नाहीत.
मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी मतदारांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागतोय.
एकनाथ शिंदे हे स्वतः महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांनी सहकुटुंब आज मतदानाचा अधिकार बजावला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी निघण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचा पत्नी सौ. लता शिंदे आणि सून सौ. वृषाली शिंदे यांनी ओवाळून शुभेच्छा दिल्या. ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदे हे स्वतः उमेदवार आहेत त्यामुळे तिथेही त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्धव ठाकरे आपल्या संपूर्ण कुटुंबासह मतदानासाठी दाखल झाले आहेत.रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे आणि आदित्य ठाकरे मतदान करणार आहेत.
कोल्हापुरात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. न्यू पॅलेस परिसरात असणाऱ्या महानगरपालिकेच्या शाळेत येऊन मतदान केला आहे. यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकारी असा विश्वास त्यांनी शाहू महाराजांनी व्यक्त केला..
उल्हासनगर विधानसभा : ३.७२ टक्के
अंबरनाथ विधानसभा : ५.९९ टक्के
मुरबाड विधानसभा : ६.५१ टक्के
धुळ्यात विद्यावर्धिनी महाविद्यालयातील मतदान यंत्रात बिघाड
मतदार यंत्रामध्ये बिघाड झाल्याने मतदारांचा झाला खोळंबा
मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा
प्रशासनाची ही बाब लक्षात येताच योग्य कारवाई करत मतदान प्रक्रिया सुरळीत करण्याचा प्रयत्न
कल्याण ग्रामीण अडवली ढोकळी गावात मनसेचे राजू पाटील यांनी केली मतदान केंद्राची पाहणी
निवडणूक एक दिवसाची असते आम्ही समजूतदारपणे वागतोय ,याला कुणी दुर्बलता समजू नये
अद्याप तरी सगळं शांततेत सुरू आहे ,ज्याक्षणी जिथे अडचण वाटेल त्या क्षणी तिथे धिंगाना घालेल
आज महत्वाचा दिवस आहे.. नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे
लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदारांना काही अडचणी आल्या होत्या मात्र त्या बाबत आम्ही निवडणूक आयोगाशी चर्चा केली. यावेळी तशी काही तक्रार अद्याप आली नाही
संदीप देशपांडे यांच्याशी माझ फोनवर बोलणं झालं आहे.
आम्हाला विश्वास आहे. आमच्या बहिणी आज मताच्या माध्यमातून विश्वास व्यक्त करतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
सर्व मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावा आणि लोकशाहीचे कर्तव्य पार पाडावा मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हीच आवाहन मतदानासाठी बाहेर पडावा असं आवाहन प्राजक्ता गायकवाड यांनी केला आहे.
अजितदादा पवार यांचे पुत्र जय पवार यांनी मतदानाचाच्या धामधुमीत धावपळ सुरू असताना समोरून आलेल्या काका श्रीनिवास पवार यांना नमस्कार केला, गळाभेट घेतली. या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय संघर्ष सुरू असताना जय पवार यांनी दाखवलेली विनम्रता, त्यांच्यावरील दिसून आलेले संस्कार उपस्थितांची मने जिंकुन गेले. अजितदादा व सुनेत्रा वहिनी यांनी मोठ्यांचा आदरच करायचा ही दिलेली शिकवण किती घट्ट आहे, हेही या निमित्ताने दिसून आले. त्यातून दादांचा लेक लाखात एक आहे, अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमठत आहे.
महायुतीचे बीड विधानसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ.योगेश क्षिरसागर यांनी कुटुंबासह आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. बीडच्या नवगण राजुरी येथे त्यांनी जाऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे..दरम्यान नागरिकांनी जास्तीच जास्त मतदान करावं, अस आवाहन देखील क्षीरसागर यांनी व्यक्त केलं आहे..
विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे.. दहिसर येथील शैलेंद्र हायस्कूल शाळेत जाऊन त्यांनी मतदान केले आहे..
मतदान हा उत्सव आपलं कर्तव्य देखील आहे आपला अधिकार आहे,
आज कुटुंबासोबत मतदान केल आहे,
महाराष्ट्रातील सर्व बंधू-भगिनी महाराष्ट्रातील जनतेला आव्हान आहे सर्वांनी मतदान करा,
लोकशाहीत सरकारकडून आपण अपेक्षा ठेवतो, त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे.
आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे.
लोकसभेत याद्यांमध्ये घोळ होता. तो काही प्रमाणात दूर झालेला आहे
वोटिंग सिस्टीम लोकसभेत स्लो होती त्याच्यात इम्प्रूमेंट झालं.
लोकसभेसारखं ऊन आज नाहीये त्यामुळे निश्चित टक्का वाढेल.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात महिलांची संख्या 5 ते 6% ने पुरुषांपेक्षा कमी आहे. महिला मतदान करून ही टक्केवारी भरून काढतील.
जनतेचा प्रेम मिळतं तेव्हा चेहऱ्यावर हास्य असतं प्रेम मिळताना दिसून येत आहे म्हणून त्यामुळे चेहऱ्यावर हास्य आहे.
अनिल देशमुख यांवरील हल्ला किती फेक आहे कालच मी बोललो आहे. अनालिसिस सांगितल्यानंतर सलीम जावेदती स्टोरी होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवडणुक प्रतिनिधी युवा नेते जय पवार यांनी आज बारामती शहर व परिसरातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या.. यादरम्यान सिद्धेश्वर गल्ली येथे त्यांचे चुलते तथा युगेंद्र पवार यांचे वडिल श्रीनिवास पवार यांची भेट झाली.. यावेळी जय पवार यांनी श्रीनिवास पवार यांचा आशिर्वाद घेत सुसंस्कृतपणाचं दर्शन घडवलं.. तसेच त्यांना अलिंगनही दिलं..
संजय जगताप यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पुरंदर चे आमदार संजय जगताप यांच्यासमोर शिवसेनेचे विजय शिवतारे यांचे आव्हान आहे आज सकाळी संजय जगताप यांनी मतदान केंद्रावर जात मतदान केले.
प्रचाराला बंदी असताना देखील मतदान केंद्र परिसरात झळकत आहेत उमेदवाराच्या प्रचाराचे बॅनर्स
प्रचार बंदी काळात बॅनर काढणे अपेक्षित असताना देखील उमेदवाराकडून प्रचार सुरूच
सोलापूर दक्षिण मतदार संघांचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांच्याकडून आचारसंहितेचा भंग
सोलापूर दक्षिणच्या विकासासाठी योग्य उमेदवार अशा पद्धतीचा उल्लेख ही बॅनरवर करण्यात आला आहे.
दरम्यान निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून हे बॅनर्स हटवण्यात आले असून संबंधित व्यक्तीवर कायदेशीर करावी करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
विक्रमगड विधानसभेत भाजप कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप करतांनाचे विडीओ व्हायरल झाले आहे . सध्या या विडीओ ची जव्हार व मोखाडा तालुक्यात चर्चा होताना दिसत आहे.
दिग्रस विधानसाभ मतदारसंघाचे महावकास आघाडी व काॅग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरेंनी दारव्हा तालुक्यातील हरू या मुळ गावी बजावला मतदानाचा हक्क.वीस वर्षानंतर प्रथमच उमेदवार म्हणुन माणिकराव ठाकरेंनी केले मतदान,सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि संविधान मजबुत करावं यासाठी सगळ्यांनी राष्ट्रीय कर्तव्य म्हणुन मतदान करावं असे आव्हान काॅग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी केलं.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ साठी सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली असून ९ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ६.६१ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील जिल्हा निहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. अहमदनगर - ५.९१ टक्के,अकोला - ६.० टक्के,अमरावती -६.६ टक्के, औरंगाबाद-७.५ टक्के, बीड -६.८८ टक्के, भंडारा- ६.२१ टक्के, बुलढाणा- ६.१६ टक्के, चंद्रपूर-८.५ टक्के,धुळे -६.७९ टक्के, गडचिरोली-१२.३३ टक्के, गोंदिया -७.९४ टक्के, हिंगोली -६.४५ टक्के, जळगाव - ५.८५ टक्के, जालना- ७.५१ टक्के, कोल्हापूर-७.३८ टक्के,लातूर ५.९१ टक्के, मुंबई शहर-६.२५ टक्के, मुंबई उपनगर-७.८८ टक्के,नागपूर -६.८६ टक्के,नांदेड -५.४२ टक्के, नंदुरबार-७.७६ टक्के,नाशिक - ६.८९ टक्के, उस्मानाबाद- ४.८५ टक्के, पालघर-७.३० टक्के, परभणी-६.५९ टक्के,पुणे - ५.५३ टक्के,रायगड - ७.५५ टक्के, रत्नागिरी-९.३० टक्के,सांगली - ६.१४ टक्के,सातारा - ५.१४ टक्के, सिंधुदुर्ग - ८.६१ टक्के,सोलापूर - ५.७,ठाणे ६.६६ टक्के,वर्धा - ५.९३ टक्के,वाशिम - ५.३३ टक्के,यवतमाळ - ७.१७ टक्के मतदान झाले आहे.
सकाळी थंडी असल्याने मतदानावर परिणाम
सकाळी 9 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी समोर
दुपारी मोठ्या प्रमाणावर मतदार बाहेर निघणार
अमरावती जिल्हात 6.75टक्के मतदान
अकोला जिल्हात 6.8टक्के मतदान
यवतमाळ जिल्ह्यात 7.17टक्के मतदान
बुलढाणा जिल्ह्यात 6.16टक्के मतदान
वाशीम जिल्ह्यात 5.33टक्के मतदान
- बार्शी मध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी मतदानाचा हक्क बजावला
- राजेंद्र राऊत यांनी विकास करणाऱ्याला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
- बार्शी विधानसभेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र राऊत विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार दिलीप सोपल यांच्यात लढत होत आहे.
जुन्नर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार अतुल बेनके यांनी सहकुटुंब नारायणगाव येथे आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी बेनके यांनी जनता माझ्याच पाठीशी असून मलाच पुन्हा संधी दिली असा विश्वास बेनके यांनी व्यक्त केलाय.
महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे यांनी सह पत्नी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान सर्वांनी करावे असे आवाहन केले. मिरज विधान सभा निवडणुकीची आज मतदान प्रक्रिया सुरू झाली सकाळ पासून मतदान केंद्रावर आपला मताचा हक्क बजावण्यासाठी महिला व पुरुषांच्या रांगा लागल्या, मिरज शहरात आयडियल इंग्लिश स्कूल येथे मतदारांच्या रांगा पाहायला मिळाल्या.. माजी पालक मंत्री आणि या निवडणुकीतील भाजप महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे त्यांच्या सुविध्य पत्नी सौ सुमनताई खाडे यांनी रांगेत उभारून मतदान हक्क बजावला.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरात आज भाजप काँग्रेस समोरासमोर आले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. जिल्हा परिषद कन्याशाळा येथे आझाद वार्ड, नेहरू वार्डचे बुथ आहेत. मतदारांना मदत करण्याकरीता येथे काँग्रेस व भाजप कार्यकर्ते लिस्ट घेऊन आहेत. सकाळी ९ च्या सुमारास आमदार बंटी भांगडिया, माजी आमदार मितेश भांगडिया हे याठिकाणी कार्यकर्त्यासह आले. तर जिल्हा परिषदचे माजी सदस्य गजानन बुटके हेही आपल्या काँग्रेस स्टॉलजवळ पोचले. त्यांच्यासोबत बॉऊन्सर होते. आमदार भांगडिया यांनी आक्षेप घेत बॉऊन्सरना जाण्यास सांगीतले. यामुळे केंद्राबाहेर बाचाबाची सुरू झाली. यानंतर घोषणा सुद्धा देण्यात आल्या. यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून तणाव शांत केला. हे सर्व मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात घडले.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. स्वतः रांगेत उभे राहून तावडे यांनी विलेपार्ले पूर्वेकडील साठे महाविद्यालयात आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदान करण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशीही संवाद साधत त्यांचे आशीर्वाद देखील घेतले.
राजेश टोपे यांच्यासह यांच्या पत्नी मनीषा टोपे यांनी पाथरवाला गावातील जिल्हा परिषदेच्या मतदान केंद्रावरती मतदानाचा हक्क बजावला.
पाथरवाला या त्यांच्या गावी टोपे परिवाराने एकत्रित येत मतदानाचा कर्तव्य पार पाडलं.
राजेश टोपे हे घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील सहाव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत.
म्हसरूळ येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब गीते परिवाराने केले मतदान
उमेदवार गणेश गीते त्यांच्या पत्नी दिपाली गीते मुलगी शृंखला गीते यांनी बजावला मतदानाचा हक्क
23 तारखेला जनता परिवर्तन करणार असल्याची प्रतिक्रिया गणेश गीते यांनी दिली
तर कुटुंबाला झालेला त्रास हा जनता 23 तारखेला मतदानातून दाखवून देईल दिपाली गीते यांची प्रतिक्रिया
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मतदान करण्यासाठी रवाना झाले आहेत. ते आता मतदान करणार आहे.
बारामतीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार युगेंद्र पवार यांनी आशाताई पवारांची भेट घेतली आहे. त्यांनी आशाताई पवारांच्या पाया पडत आशिर्वाद घेतले आहेत.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पोलिसांना विचारला जाब
कुलाबा मतदारसंघात वृद्ध मतदारांना त्रास होत असल्याने विचारला जाब
निवडणूक अधिकाऱ्यांना फोन करून नार्वेकरांच्या सूचना
मतदारांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होऊ देण्याची सूचना
व्हीलचेअर अभावी वृद्ध मतदार मतदानाविना परतत असल्याचे चित्
दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची नार्वेकरांची मागणी
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे.
9 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी
अकोले - 5.3 टक्के
संगमनेर - 7 टक्के
शिर्डी - 8.19 टक्के
कोपरगाव - 6.56 टक्के
श्रीरामपूर - 5.12 टक्के
नेवासा - 7.73 टक्के
राहुरी - 5 टक्के
शिवसेना नेते रामदास कदम , शिवसेना उमेदवार योगेश कदम यांनी कुटूंबासह बजावला मतदानाचा हक्क
जामगे गावात बजावला मतदानाचा हक्क
शिवसेना उमेदवार योगेश कदम यांनी केला विजयाचा दावा
विजय आपलाच विरोधकांचा दावा फोल ठरेल
सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे, आपला अधिकार आहे ....
योग्य माणूस निवडण्याची हीच संधी असते.
सर्व जनतेने मतदान केलं पाहिजे...
मराठा समाजाने शंभर टक्के मतदान करायचं
आपले लेकराच्या बाजूने जो भरेल त्याच्या बाजूने 100% मतदान करावे. ....
मतदान करताना आपल्या लेकाला आणि लेकीला विचारून मतदान करावं, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी आज मतदान केल्यानंतर थेट पुण्यातील सुप्रसिद्ध असलेल्या दुर्गा कॅफेमध्ये हजेरी लावली आणि कॉफीचा घोट घेत ब्रेकफास्ट सुद्धा केला. यावेळी प्रचारादरम्यान घडलेल्या गोष्टी, गेल्या पाच वर्षातील अनुभव तसेच विनोद तावडे यांच्यावर झालेले आरोप यावर चंद्रकांत पाटील यांनी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत.
उमेदवार मयुरा काळेंनी सुद्धा पती खासदार अमर काळे सोबत बजावला मतदानाचा हक्क आर्वी येथील भाईपूर वाठोडा पुनर्वसन येथे बजावला मतदानाचा हक्क अँकर - वर्ध्याचे खासदार अमर काळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे,यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी तथा महाविकास आघाडीच्या उमेदवार मयुरा काळे सुद्धा उपस्थित होत्या ,त्यांनीही यावेळी मतदानाचा हक्क बजावला व सर्व नागरिकांनी मतदान करून देशाच्या प्रगतीला हातभार लावावा असे आवाहन केले.
राजन साळवी यांनी सहकुटूंब बजावला मतदानाचा हक्क
सत्ता आणि पैसा या निवडणूकीत विजयी चौकार मारणार
सामंत कुटूंब वारंवार निष्ठा बदलतात - राजन साळवी
दोन्ही सामंत बंधू निष्ठा बदलून अन्य पक्षात जातील
विक्रमी मताधिक्यांनी माझा विजय होईल - राजन साळवी
ही निवडणूक वेगळी झाली या निवडणुकीत व्यापारीकरण झालं - अनुजा साळवी
या निवडणुकीत चौकार मारून मंत्रीपद घेऊन येणार
मुक्ताई नगर मतदार संघाच्या महा विकास आघाडीच्या उमेदवार रोहिणी खडसे यांनी त्यांच्या कोथळी या गावातील जी प कन्या शाळेत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे आपल्याला मिळणारा प्रतिसाद पाहता आपला विजय नक्की होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
पालघरमध्ये सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत किती टक्के मतदान झाले याची आकडेवारी
पालघर विधानसभा _ 5.94%
बोईसर विधानसभा _ 6.97%
डहाणू विधानसभा _ 8.5%
विक्रमगड विधानसभा _ 6.4%
वसई विधानसभा_ 8.32%
नालासोपारा विधानसभा _ 7.48%
वांद्रे पूर्व येथे फक्त ५ टक्के मतदान झाले आहे. आतापर्यंत वांद्रे मतदारसंघातच सर्वाधिक कमी मतदान झाले आहे.
सांगलीमध्ये सकाळी ९ वाजेपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.मिरज - 6.32
सांगली - 7.6
इस्लामपूर - 8.13
शिराळा - 6.19
पलूस - कडेगाव - 4.77
खानापूर - 4.71
तासगाव कवठेमहांकाळ - 6.37
जत - 4.94
नंदुरबारमधील सकाळी 9 वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी
01- अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ- 6.52 टक्के
02- शहादा विधानसभा मतदारसंघ- 10.18 टक्के
03- नंदुरबार विधानसभा मतदारसंघ- 6.00 टक्के
04- नवापूर विधानसभा मतदारसंघ- 8.30 टक्के
जिल्ह्यात एकूण 7.76 टक्के मतदान
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नऊ मतदारसंघात पहिल्या दोन तासात सरासरी 9.7% मतदान
इंदापूर विधानसभेचे उमेदवार हर्षवर्धन पाटील भाग्यश्री पाटील अंकिता ठाकरे पाटील यांच्या कुटुंबाने बावडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला..
संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत ६.६१ टक्के मतदान झालेले आहे. सर्वाधिक मतदान भांडुप आणि मुलुंड येथे झाले आहे. तर सर्वाधिक कमी मतदान वांद्रे येथे झाले आहे.
मुलुंड विधानसभेत पहिल्या दोन तासांत १०.७१ टक्के मतदान झाले आहे.
वांद्रे पूर्व याठिकाणी सर्वात कमी म्हणजे ५.०४ टक्के मतदान झाले आहे.
मावळ विधानसभा मतदारसंघात
सकाळी 9 वाजेपर्यंत झालेले मतदान
पुरुष :- 15,111
स्त्री :- 8315
इतर :- 00
एकूण :- 23426
टक्केवारी :- 6.07%
सर्वसामान्य जनतेने निवडणूक हाती घेतली आहे त्यामुळे माझा विजय निश्चित आहे
लोक गुंडगिरी आणि दडपशाही या मतदारसंघातील मोडीत काढतील हे निश्चित आहे
विरारमध्ये घडलेल्या प्रकारावर देखील रोहित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे... विरार मधील प्रकाराची निपक्षपातीपणे चौकशी करावी अशी मागणी देखील रोहित पाटील यांनी केली आहे
आर्वी विधानसभा - 5.39%
- देवळी विधानसभा -4.84%
- हिंगणघाट विधानसभा - 7.11%
- वर्धा विधानसभा - 6.24 %
रितेश देशमुखने पत्नी जिनिलियासोबत मतदानाचा हक्क बजावला आहे. लातूर येथे जाऊन त्यांनी मतदान केले आहे
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे या मतदानाचा हक्क बजावायला मतदान केंद्रावर झाले दाखल
दक्षिण सोलापूर मधील जागृती विद्यामंदिर या शाळेमध्ये बजावत आहेत मतदानाचा हक्क
सुशील कुमार शिंदे यांच्यासोबत पत्नी उज्वला शिंदे याही बजावणार आहेत मतदानाचा हक्क
महाविकास आघाडीचे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी हेही त्यांच्यासोबत आले आहेत मतदानाचा अधिकार बजावायला
पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघात मतदान पार पडत असुन या मतदार संघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होत असली तरी महाविकास आघाडी विरुद्ध शुन्य असा विजयाचा विश्वास अमोल कोल्हेंनी व्यक्त करत शरद पवारांची साथ सोडणा-यांना मतदार जागा दाखवेल असा विश्वास अमोल कोल्हेंनी व्यक्त केलाय
रोहित पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी कुटुंबासोबत जाऊन मतदान केले आहे.
विरार पच्छिमेच्या जिल्हा परिषदेच्या नेहरू विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला
विरार परिसरात काल मोठा राडा झाला होता,भाजप कडून पैसे वाटप करण्यात आले होते
आमचा विजय निच्छित आहे,लोकांचे प्रेम आशीर्वाद आमच्या सोबत आहे.
विरोधी पक्षाने कितीही अमिष दाखवले तरीही जनता बहुजन विकास आघाडी सोबत
हितेंद्र ठाकूर,क्षितिज ठाकूर यांनी मतदानाचा हक्क बजावला..
खासदार निलेश लंके यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पारनेर सह राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडी तथा काँग्रेसचे उमेदवार इंजि.किरण तडवी यांनी मतदानाच्या हक्क बजावलेला आहे. मतदान प्रक्रिया म्हणजे लोकशाहीच्या उत्सव असून, लोकशाही अधिकाधिक बलशाही करण्यासाठी जनतेने स्वयंस्फूर्तीने मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी तथा काँग्रेसचे उमेदवार इंजि.किरण तडवी यांनी शहरातील मिशन हायस्कूलच्या मतदान केंद्रावर जाऊन परिवारासह मतदानाचा हक्क बजावला
हे संयुक्त महाराष्ट्रातला काळातील निवडणूक झाली ते महाराष्ट्र आपला टिकवण्यासाठी मुंबई महाराष्ट्र टिकवण्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा हक्क आहे. या महाराष्ट्राचा व्यापाऱ्यांच्या माध्यमातून विकृतीकरण सुरू आहे. हे निवडणूक महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे आहे .महाराष्ट्र मध्ये अतिक्रमण आक्रमण झाला आहे व्यापाऱ्यांचे मंडळ पैशाचा पाऊस या निवडणुकीत पडत आहे . मराठी माणसाने सावध राहावं आणि मतदान करावा . कालचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. आम्ही दौऱ्यावर जाताना आमच्या बॅग ला तपासणी काल पैसे वाटू नये गुन्हा दाखल झाला नाही. पैसे पकडले चित्र समोर समोर आणला मराठी माणसाने सावध राहावं आणि मतदान करावं- संजय राऊत
रोहित पाटील यांचे त्यांच्या कुटुंबियांनी औक्षण केले आहे. त्यानंतर ते सहकुटुंब मतदानासाठी रवाना झाले आहे.
बार्शी विधानसभेतील एका उमेदवाराला मतदान करतानाचा विडिओ वायरल
मतदान कक्षामध्ये मोबाईल बंदी असतानाही व्हिडिओ काढून व्हिडिओ व्हायरल..
मतदान केंद्रात मोबाईलला बंदी असताना देखील विडिओ वायरल
प्रशासनाकडून यांसदर्भात कारवाई केली जाणार असून संबंधित व्यक्तीचा शोध घेतला असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
कोल्हापुरातल्या श्री शाहू मार्केट यार्ड इथे असणाऱ्या मतदान केंद्रावर खासदार धनंजय महाडिक यांच्या कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी धनंजय महाडिक यांनी महायुतीने आणलेल्या योजनांचा फायदा हा मोठ्या प्रमाणावर नागरिकांना झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच काँग्रेस नेते सतेज पाटलांवर टीका करत ते मनोरुगून असल्याचं पुन्हा एकदा त्यांनी म्हटले तर भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त करताना त्यांनी सर्वस्वी वरिष्ठ निर्णय घेतील असे म्हटले आहे.
छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे.
सुधांशू त्रिवेदी यांनी केलेले आरोप खोटे खोटे खोटे
मी त्यांच्या विरोधात मानहनीची तक्रार दाखल केली आहे
त्यांनी ५ प्रश्न विचारले आहेत मी त्याची सगळी उत्तरं ते जिथं म्हणतील तिथे देणार
सायबर तक्रार मी कालच दाखल केली आहे
ते अजित दादा आहेत, अजित पवार यांनी आज चौकशीची मागणी केली आहे, मी ती काल केली आहे
अजित पवार काय माझंही मत आहे की चौकशी झाली पाहिजे आणि सखोल झाली पाहिजे
सगळ्यांनी शांततेत मतदान करावं हे आवाहन बारामती करांना करत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
० कोलाडजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा
० मुंबई कडून कोकणात येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी
० कोकणात मतदानासाठी निघालेल्या चाकरमान्यांची प्रवासात कोंडी
० मुंबई ते माणगाव प्रवासासाठी लागताहेत 9 तास
पत्नीस्मिता देशमुख आणि मुलगा रोहन देशमुख सह सुभाष देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क
सोलापुरातील लिटिल फ्लावर स्कूल या मतदान केंद्रावर येऊन सुभाष देशमुख यांनी केले मतदान
यावेळी सुभाष देशमुख यांनी नागरिकांना मतदान करण्याचे केले आवाहन
विरोधकांकडे टीका करण्यासाठी कोणतेही मुद्दे नव्हते त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर टीका त्यांनी केली
मी मात्र दहा वर्षात केलेल्या विकास कामांच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली
अशी प्रतिक्रिया माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली
दरम्यान देशमुख यांनी राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार येणार असल्याचं व्यक्त केला विश्वास
एकही मतदाराने मतदान केले नाही,सिल्लोड येथील रामनगर येथील गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.रामनगर हे पुनर्वाचित गावठाण असून गावठाण 26 वर्ष झाले या गावाला स्मशानभूमी नाही दफनभूमी नाही रेकॉर्डला सगळे सुख सुविधा उपलब्ध आहे नागरिकांची मागणी आहे नगररचनेप्रमाणे प्लॉट स्मशानभूमी दफनभूमी गावाच्या ताब्यात देण्यात यावी.
- वर्धेचे भाजपा उमेदवार पंकज भोयर यांनी सहपरिवार मतदान केंद्रावर येत बजावला मतदानाचा हक्क
- आमदार पंकज भोयर आपल्या आई, वडील, पत्नीसह मतदान केंद्रावर
- पंकज भोयर यांनी वर्धेच्या मतदान केंद्र क्रमांक 202 वर बजावला हक्क
- आज आमच्या परिवारासाठी आनंदाचा दिवस आहे, परिवाराच्या तीन पिढ्या एकत्रित येऊन मतदान केल, नागरिकांनी लोकशाहीच्या उत्सवात मतदान करावा
आपला महाराष्ट्र धर्म हा संपूर्ण भारताला एक दिशा देतो आणि त्याच धर्माचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे.
म्हणूनच आपण सर्वांनी या अत्यंत निर्णायक व महत्वाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावावा आणि महाराष्ट्राला योग्य दिशा देण्याचे काम करावे.
कोथरूड मधून माझ्यापेक्षा जास्त मताधिक्य चंद्रकांत पाटील यांना मिळेल
चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ७४ हजारांचा लीड याच्यापुढे आम्ही जाऊ
विनोद तावडे कशाला येऊन पैसे वाटतील? ते आमचे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यावर आमचे सर्व नेते बोलले आहेत
महायुतीचा मुख्यमंत्री होईल आणि कोणाला मुख्यमंत्री करायचे हे युती ठरवेल
पश्चिम महाराष्ट्रात महायुतीच्या ४५ पेक्षा जास्त जागा निवडून येतील
राज्याचे मंत्री तथा परळी मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे हे मतदानापूर्वी प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक झाले आहेत..यावेळी त्यांनी वैद्यानाथाचा दुग्धभिषेक करत,आरती करत, मनोभावे दर्शन घेतल आहे..
शरद पवार मतदानासाठी रवाना झाले आहेत. ते गोविंद बागेतून माळेगावकडे निघाले आहे.
- वर्ध्याचे माजी खासदार रामदास तडस यांनी बजावला मतदानाचा हक्क
- वर्ध्यातील देवळी येथील यशवंत शाळेमध्ये सपत्नीक केले मतदान
- लोकशाहीच्या उत्सवात सामील होऊन सर्वांना मतदान करण्याचे खासदार रामदास तडस यांनी केले आवाहन..
तुमसर विधानसभेच्या तुमसर शहरांमधील मतदान केंद्र क्रमांक 186 मधील बांगडकर विद्यालयात असलेल्या मतदान ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाला. हीच परिस्थिती पुढसर तालुक्यातील मांडळ येथेही निर्माण झाली. त्यामुळे तब्बल एक तास मतदान प्रक्रिया रखडली. सकाळी मतदान केंद्रावर पोहोचलेल्या मतदारांना ईव्हीएम मशीनचा फटका बसल्याने त्यांना रांगेत तात्काळ उभं राहावं लागलं. तासभरानंतर केंद्र दुरुस्ती केल्याने मतदान प्रक्रिया आता सुरू झालेली आहे.
० महाड शहरातील चवदार तळे येथील घटना ० मतदानाच्या सुरुवातीलाच 20 मिनिट मतदारांचा खोळंबा ० मतदान मशिनमधील तांत्रिक बिघाड दुर झाल्यानंतर मतदार सुरुमहाडमध्ये मतदान मशिन बंद पडले
लातूरमध्ये धीरज देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
राहुल देशपांडे यांनी आज पुण्यात केलं मतदान
राहुल देशपांडे यांच्या सोबत त्यांची पत्नी नेहा देशपांडे यांनी सुद्धा केलं मतदान
बोटाची शाई दाखवत सेल्फी सुद्धा घेतला
माहिम मतदारसंघातील उमेदवार अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांनी एकाच वेळी बाप्पाचे दर्शन घेतले आहे. त्यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले आहे.
अकोल्यातल्या अकोला पूर्व मतदार संघातील पोद्दार इंटरनॅशनल पब्लिक स्कूल येथील मतदान केंद्रावरील बूथ क्रमांक 221 वर बंद पडलेली ईव्हीएम मशीन झाली दुरुस्त. तब्बल 44 मिनिटांनी झाली पुन्हा मतदानाला सुरुवात. मात्र तोपर्यंत अनेक मतदार या ताटकळत होते उभे. तर अनेक मतदार मतदान न करताच परतले..
जालना जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेला सुरुवात झालीय. मराठा आरक्षणाच केंद्र असलेल्या अंतरवाली सराठीत देखील मतदान प्रक्रियेला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झालीय .
अंतरवाली सराटीतील ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होताना पाहायला मिळत आहे.अंतरवली सराटी हे गाव घनसांवगी विधानसभा मतदारसंघांमध्ये येत. आणि या मतदारसंघांमध्ये शरद पवार गटाचे राजेश टोपे शिवसेनेचे हिकमत उढाण आणि भाजपचे बंडखोर सतीश घाडगे या तिघांमध्ये लढत होत असून अंतरवली सराटी सह घनसांवगी विधानसभा मतदारसंघातील नागरिक कोणाच्या पारड्यात मताच दान टाकतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे.
सलग सात वेळा आमदार झालेले दिलीप वळसे पाटील आठव्यांदा आंबेगावच्या निवडणुकीला सामोरे जातायेत. पत्नी आणि लेकिन औक्षण केल्यावर ते मतदानासाठी निघालेत. मात्र यावेळी थेट शरद पवारांनी गद्दारीचा शिक्का मारत थेट आमच्यात कौटुंबिक संबंध नव्हेत, असं सूचित केलं. पण शरद पवारांनी सभा घेतल्यानंतर ही विजय माझाचं होईल असा विश्वास वळसेंनी व्यक्त केलाय.
कल्याण पूर्व मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
द्रपूरच्या खासदार प्रतिभा धनोरकर यांनी वरोरा येथे मुलगा आणि उमेदवार भाऊ प्रवीण काकडे यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी उमेदवार प्रवीण काकडे हेही सपत्नीक मतदानासाठी आले. पक्षाकडे हट्ट करून सख्ख्या भावासाठी त्यांनी उमेदवारी मागून घेतली. यामुळे वरोरा मतदारसंघात धनोरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी काल व्हायरल झालेल्या व्हीडिओवर प्रतिक्रिया दिली. माझे वक्तव्य समाजासाठी नव्हते, तर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी होते. समाजाच्या लोकांनी समाजकारण करावे, राजकारण नाही, असेही त्या म्हणाल्या.
अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तळेगाव दाभाडे येथील नथूभाऊ भेगडे महाविद्यालयात राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रात मतदारांची गर्दी असल्याने मतदारांना भेटत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण कुटुंबासह बापू भेगडे यांनी मतदानाचा हक्क बजावला. ही निवडणूक वेगळी असली तरी मीच निवडून येणार असे त्यांनी मत व्यक्त केलंय. हा महाराष्ट्राच्या लोकशाहीचा उत्सव आहे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. संविधानाने आपल्याला मतदानाचा हक्क दिला आहे तो बजावलाच पाहिजे असं मत अपक्ष उमेदवार बापू भेगडे यांनी व्यक्त केलय..
बॉलिवूड अभिनेता अली फझलने मतदान केले आहे.
आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ विजयकुमार गावित यांनी नटावद या गावी जिल्हा परिषद शाळेत मतदान ....
मतदान करण्यापूर्वी कुलदैवत देव मोगरा मातेच दर्शन घेतल्यानंतर मतदान....
लोक महायुती सरकारवर सोबत असल्याने लोक निवडून देतील असा विश्वास देखील व्यक्त केला.
नायगाव येथे मुळगावी रवींद्र चव्हाण बजावला मतदानाचा हक्क
काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव आहेत रवींद्र चव्हाण.
काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्याने विधानसभा निवडणुकीबरोबरच नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक होऊ घातली आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस कडून दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आले आहे रवींद्र चव्हाण यांनी आज सकाळी नायगाव येथे मतदानाचा हक्क बजावला.
भरत गोगावले यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.मनदान करून बाहेर आल्यानंतर महायुतीचे उमेदवार भरत गोगावले यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास. मतदार संघात चांगल वातावरण आहे. चौकार ठालेला आहे. निकाल 23 तारखेला कळेल पण आम्ही आज रात्रीच निकल देऊ अस देखील गोगावले म्हाणाले.
संविधानानं अधिकार दिला आहे तो बजावला पाहिजे
महाराष्ट्रासाठी आज मतदान केलं पाहिजे
कालचा दिवस तुम्हाला माहिती आहे कशानं गाजला
नाशिक, मुंबई, विरार प्रत्येक ठिकाणी पैशांचं वाटप होतंय
आमचा पुर्निविकासाला विरोध नाही
पण ज्या पद्धतीनं धारावीतल्या लोकांना बाहेर फेकून देशोधडीला लावलं जात आहे
त्याला विरोध आहे
काल आता पैसे वाटप केल्यानंतर भाजपा आता खोटे आरोप करत आहे
त्यात काही तथ्य आहे असं वाटत नाही, असं त्यांनी सांगितलं आहे.
सचिन तेंडुलकर पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकर यांच्यासह वांद्रातील मुंबई पब्लिक स्कूल वर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दाखल
बाळासाहेब थोरात यांनी कुटुंबियांसोबत मतदानाचा अधिकार बजावला आहे. मुलगी जयश्री थोरात आणि पत्नीसोबत मतदान केले आहे.
पैठण तालुक्यातील दादेगाव बुद्रुक येथील 226 केंद्रतील मशीन बंद पडले
प्रशासनाकडून मशीन बदलण्याचे काम सुरू
नागरिकांना मतदानासाठी काही वेळ थांबावे लागणार
छत्रपती संभाजीनगरमधे मतदान करतानाचे व्हिडिओ होत आहे व्हायरल
मतदान केंद्रात मोबाईल वरून कार्यकर्ते करत आहे चित्रीकरण..
मतदान केंद्रांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह...
नवाब मलिक मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल झाले आहेत.ते थोड्याच वेळात मतदान करणार आहेत.
संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर विधानसभेचे भाजपचे उमेदवार प्रशांत बंब यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
राज्यात महायुती चे सरकार होणार. आम्ही नक्की जिंकू आम्हाला विश्वास आहे, अशा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.विनोद तावडे यांच्यावर झालेला आरोप खोटा आहे. त्यांच्या विरोधात सापळा रचला गेला. एखाद्याच्या माणसाला आयुष्यातून उठवताय का?, असं त्यांनी म्हटलं आहे.
सर्वानी घराबाहेर येऊन मतदान करा
यावेळी मतदान संख्या वाढेल नागरिकासाठी मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत
कुलाबा मध्ये मतदान कमी झाले होते यावेळी मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा आहे
युगेंद्र पवार यांनी कुटुंबियांसोबत जाऊन मतदान केले आहे. त्यांचे वडिल, बहिण आणि आई यांच्यासोबत त्यांनी मतदान केले आहे,
सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा अधिकार बजावला आह. बारामतीमध्ये त्यांनी मतदान केले आहे.
पाली इथल्या जिल्हा परिषद शाळेत केलं मतदान
किरण सामंत आणि पत्नी वर्षा सामंत एकत्र मतदान केंद्रावर
दोन्ही बंधूंचा विजय निश्चित - किरण सामंत
चंद्रकांत पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क
कोथरूड येथील महात्मा सोसायटी येथील मतदान केंद्रावर बजावला हक्क
रत्नागिरी जिल्ह्यात 1747 मतदान केंद्र
रत्नागिरी जिल्ह्यात पाच मतदार संघात 38 उमेदवार रिंगणात
13 लाख 39 हजार 697 मतदार
रत्नागिरी जिल्ह्यात १९९५ नंतर पहिल्यांदा अपक्ष मोठ्या प्रमाणावर रिंगणात
रत्नागिरी जिल्ह्यात चार ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत तर एका ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत
रत्नागिरी जिल्ह्यातून उदय सामंत आणि किरण सामंत या दोन बंधूंची प्रतिष्ठा पणाला
तर रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम निवडणूक रिंगणात
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फायर ब्रँड भास्कर जाधव यांची सुद्धा प्रतिष्ठा पणाला
माहिमचे उमेदवार अमित ठाकरे हे मतदानासाठी रवाना झाले आहेत.
अण्णासाहेब पाटील शाळेतील ईव्हीएम पाऊण तासापासून बंद
टेक्निकल कारणामुळे ईव्हीएम बंद झाल्याची अधिकाऱ्यांची माहिती
अजित पवार व सुनेत्रा पवार यांनी ज्या मतदान केंद्रावर मतदान केलं त्याच मतदान केंद्रात युगेंद्र पवार मतदान करणार
प्रथमच एकमेकांसमोर उभा असलेले दोन प्रतिस्पर्धी उमेदवार एकाच मतदान केंद्रावर व एकाच बॅलेट पेपरवर मतदान
सुप्रिया सुळे या मतदानासाठी मतदान केंद्राकडे रवाना झाल्या आहेत. थोड्याच वेळात त्या मतदान करणार आहेत.
युगेंद्र पवार कुटुंबासह मतदानासाठी काटेवाडीकडे रवाना
सोबत वडील श्रीनिवास पवार, आई शर्मिला पवार देखील आहेत
श्रीनिवास पवार स्वतः गाडी चालवत निघाले
शिवडी मतदार संघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अजय चौधरी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
नाशिकच्या नामांकित हॉटेल मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या व्यक्तीकडे सापडले कोट्यवधी रुपये
मंत्रालयातील कार्यरत सिंचन विभागातल्या महिला अधिकारी अहिरराव तिथं उपस्थित होत्या
शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री अहिरराव यांच्या भगिनी अलका अहिरराव तिथं उपस्थित होत्या
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बजावला मतदानाचा अधिकार बजावला आहे.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बी.आर हायस्कूलमधल्या बूथ क्रमांक 169 मधील मतदान यंत्र बंद. सकाळी मतदान सुरू झाल्यापासूनच मतदान यंत्रात बिघाड. या मतदान केंद्रावरील मतदान अद्याप सुरू झालं नाही. मतदान केंद्रावर मतदार ताटकळलेत. दरम्यान, अकोल्यात विधानसभा मतदारसंघासाठी सकाळी सात वाजता पासून सुरुवात झालीए. मात्र अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील बी.आर हायस्कूलमधल्या बूथ क्रमांक 169 मधील मतदान यंत्र बंद आहेय. त्यामुळ मतदान केंद्रावर मतदान ताटकळलेत उभे आहेय.
शिवडी-लालबाग विधान सभा मतदारसंघातील आर एम भट शाळेतील मतदान केंद्र EVM क्रमांक ४१ नंबरची मशिन बंद झालीय तर प्रबोधनकार ठाकरे उद्यान येथील मतदान केंद्रावर विद्युत पुरवठा अपूरा असल्यामुळे EVM मशीन सुरू नाही झाल्या आहेत.
छत्रपती संभाजी नगरमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे मतदारांचा खोळंबा होताना दिसत आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडतेय... बारामती मतदारसंघात एकूण 386 मतदान केंद्रावर ही निवडणूक प्रक्रिया पार पडतीय..बारामती मधील माळेगाव बुद्रुक या ठिकाणी शरद पवार, प्रतिभा पवार, सदानंद सुळे, रेवती सुळे आणि विजय सुळे हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत... सध्या गोविंद बाग या निवासस्थानावरून शरद पवार थोड्याच वेळात ते मतदान केंद्राकडे जाणार आहेत
कसबा मतदार संघाचे महाविकास आघाडी उमेदवार आमदार रवींद्र धंगेकरानी रविवार पेठेतील ९ नंबर शाळेत मतदानाचा हक्क बजावला.
कसबा मतदारसंघात करणार मतदान
कसबा पेठेतील गुजराती प्रायमरी शाळेत करणार मतदान
पारनेरच्या उमेदवार राणी लंके यांचे कुटुंबियांकडून औक्षण करण्यात येत आहे. त्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
आज सकाळपासूनच मतदानासाठी मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळत आहे. शेकापचे नेते जयंत पाटील यांनी कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला आहे.
बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी चांगली लढत पाहायला मिळणार आहे. युगेंद्र पवार यांचे राहत्या घरी आईकडून औक्षण करण्यात येत आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील मतदानासाठी हजेरी लावली आहे. अभिनेता राजकुमार राव हा मतदानासाठी मतदानकेंद्राबाहेर दाखल झाला आहे.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे.
शिवसेना महायुतीचे उमेदवार तथा शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या पत्नी नफिसा बेगम तसेच कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला .मतदान हे लोकशाहीचे पवित्र कर्तव्य आहे. आपला हक्क बजावून कर्तव्य पार पाडा. निर्भीडपणे मतदान करा आणि इतरांनाही मतदान करण्यासाठी सांगा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
पुण्यात ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी मतदान केंद्रावर येत आहेत
- सकाळी सुरुवातीलाच मतदान करण्याकडे ज्येष्ठ नागरिकांचा कल
- पुण्यात ज्येष्ठ नागरिकांचा मतदानाला प्रतिसाद
महायुतीचे चिंचवडचे उमेदवार शंकर जगताप यांनी मतदान केले आहे. त्यांनी चिंचवड येथे मतदान केले आहे.
आज मी सर्व मतदारांना विनंती करतो की आपण सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावा अशी मी सर्व मतदानांना विनंती करतो आणि लोकशाही बळकट करण्यासाठी आपण आपला मतदानाचा हक्क बाजावला पाहिजे ही विनंती.
असा प्रकार व्हायला नको पण ज्यावेळेस समोरच्या उमेदवाराच्या लक्षात येतं की आत्ता आपली परिस्थिती डाऊन झालेली आहे त्यावेळेस असे बॅड हल्ले केले जातात.
अंबादास दानवे यांनी विलास बापू यांच्या विषयी जे वक्तव्य केला आहे मला वाटतं हे वक्तव्य कोणी असू द्या उद्या कोणावरही प्रसंग असतो पण मला वाटतं बापू दावखान्यात आहे आणि बापू दवाखान्यात असताना बापू बद्दल भाषणात जे काही वक्तव्य केलं बापूला दरोडेखोरांनी मारलं बापू वेगवेगळे चर्चा केली मला वाटतं हे अंबादास दानवेला शोभत नाही,
म्हणून मला सांगत हे जे काही वक्तव्य केलं आहे विरोधी पक्ष नेत्यांनी थोडं जबाबदारीने बोललं पाहिजे बापू त्या दिवशी चार वाजेपर्यंत प्रचारात होते आणि वक्तव्य केलं बापूंना दरोखोरानी मारलं गुंड्याने मारलं तर बापूला कोणीही मारलं नाही,
अंबादास दानवे ला हे शोभत नाही, विरोधी पक्ष नेत्यांनी थोडं जबाबदारीने बोललं पाहिजे.
सामंत यांच्या पाली गावातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 इथे बजावला मतदानाचा हक्क
मतदारांसोबत रांगेत उभे राहत सामंत यांनी बजावला मतदानाचा हक्क
महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी बजावला मतदानाचा हक्क
त्यांच्या मूळ गावी जाऊन हातनोशी येथे जाऊन बजावला मतदानाचा हक्क
गेल्या ३ टर्म पासून संग्राम थोपटे भोर चे आमदार
पुण्यातील खडकवासला मतदारसंघात भाजप चे भीमराव तापकीर चौथ्यांदा विजयी होणार का?
तापकीर यांच्या समोर शरद पवारांच्या राष्ट्रवादी चे सचिन दोडके आणि मनसे चे मयुरेश वांजळे यांचे आव्हान
गेल्या ३ टर्म पासून खडकवासला मतदारसंघात भाजप चे वर्चस्व
तीन महिन्यांपूर्वी बुक केलेली शिमला मनालीची ट्रीप कॅन्सल करून दांपत्य मतदानासाठी दाखल
आर्थिक नुकसान सहन करून बजावला मतदानाचा हक्क
इतर मतदारांनाही मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन
बापू पठारे वडगाव शेरी मधून महा विकास आघाडी चे उमेदवार
बापू पठारे यांच्या समोर विद्यमान सुनील टिंगरे यांचे आव्हान
कल्याणीनगर येथील घडलेल्या अपघातामुळे वडगाव शेरी मतदारसंघाची राज्यात चर्चा
आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे.मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकरांनी बजावला मतदानाचा अधिकार
लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघात मतदानाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात 2 हजार 760 मतदान केंद्र उभारण्यात आली असून 24 लाख 88 हजार 788 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडावी यासाठी 15 हजार 169 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा सु व्यवस्था राखण्याच्या दृष्टीने प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलाय. शिवाय अतिरिक्त कुमक तैनात ठेवण्यात आली आहे. जिल्हा भरात 4 हजार 300 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सज्ज आहेत. 1 हजार 684 मतदान केंद्रांवरील मतदानाचे वेबकास्टिंग केलं जाणार आहे.
मोहन भागवत यांनी नागपूर येथे मतदानाचा अधिकार बजावला आहे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असं त्यांनी सांगितलं.
छत्रपती संभाजीनगर येथे हर्सुल टी पॉइंटच्या पथकाने 11 लाख रूपये जप्त केले आहेत. एका गाडीत ११ लाखांची रक्कम जप्त केली आहे. याबाबत चौकशी सुरु आहे.
मनमाड - येवला रोडवर अंकाई फाट्यावरील बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे. सकाळी 6 वाजता अपघात झाला असून ट्रकचालक आणि बसचालकाची प्रकृती गंभीर आहे.त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
शायना एनसी या शिवसेनेच्या मुंबादेवीच्या उमेदवार मतदानापूर्वी शायना एनसींकडून मुंबादेवी चरणी प्रार्थना केली आहे.
आपल्या विधानसभेचे उमेदवार श्री. अमितजी ठाकरे मतदानाचा दिवशी बुधवार, दि. २०-११-२०२४ रोजीचा श्री गणेश गजाननाचा आशीर्वादने करणार आहेत, सकाळी ८:०० वाजता श्री गणेश उद्यान, ८:१५ वाजता श्री सिद्धिविनायक मंदिर, ८:३० वाजता प्रबोधनकार ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून मतदान करायला बालमोहन शाळेत जाणार आहेत.
अजित पवार यांनी बारामती येथे मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. याचसोबत त्यांनी सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. आईने आधीच मतदान केलं आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
बारामतीमध्ये अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मतदानासाठी मतदान केंद्रावर दाखल झाल्या आहेत. थोड्याच वेळात ते मतदान करणार आहेत.
स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटपाचा डाव उधळून लावला .हातातील पैसे टाकून पैसे वाटप करणाऱ्यांनी पळ काढला. निवडणूक अधिकारी पोलीस घटनास्थळी दाखल, पोलिसांनी काही रक्कम जप्त केली. अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांच्याद्वारे पैसे वाटप करण्यात येतं असल्याचा स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांचा आरोप आहे. मध्यरात्री विजय चौगुले आणि अंकुश कदम कार्यकर्त्यांसह आमने सामने आल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वातावरण चिघळण्यापासून थांबले.
गुजरात पासिंगच्या १०० च्या वर ट्रॅव्हल्स विरार शिरसाड फाट्यावर बाविआच्या कार्यकर्त्यांनी आडवल्या आहेत
वसई विरार सह मुंबई परिसरातील मतदाराना वेगवेगळे अमिष दाखवून त्यांना मतदानासाठी घेवून जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे
विरार शिरसाड फाटा येथे मध्यरात्री पोलीस ही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले असून ट्रॅव्हल्स ची तपासणी करुन सोडण्यात आल्या आहेत.
या गाड्यांना पासिंग जरी असले तर त्यांना माणसे नेण्याचा पासिंग नाही असा आरोप बहुजनच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
पुणे पोलिस दलातील ६०० पोलीस अधिकारी, सहा हजार ८०० पोलीस कर्मचारी गृहरक्षक दलाचे एक हजार ७५० जवान बंदोबस्तास तैनात
पोलिस कर्मचाऱ्यांसह संवेदनशील मतदान केंद्रात एसआरपीएफ आणि सीआरपीएफ तैनात
संवेदनशील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर
आतापर्यंत एक हजार ७०० जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई
मॉर्निंग वॉकसाठी आलेले ज्येष्ठ नागरिक मतदान केंद्रावर दाखल
पुण्यातील कोथरूड मधील महेश विद्यालयाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिक मतदान करण्यासाठी दाखल
सकाळी ६ वाजताच फिरायला आलेले ज्येष्ठ नागरिक मतदान केंद्रावर हजर
पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात जवळपास पावणे ४ लाख मतदार
सकाळी ७ वाजता मतदान केंद्र करण्यात येणार खुलं
राज्यात भौगोलिकदृष्ट्या दुसऱ्या क्रमांकाचे असलेल्या पुणे जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक मतदार
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ८८ लाख ४९ हजार ५९० मतदार
पुणे जिल्ह्यात ८ हजार ४६२ मतदान केंद्राची उभारणी
जिल्ह्यात सर्वाधिक मतदार चिंचवड मतदारसंघात असून, ही संख्या ६ लाख ६३ हजार ६२२
अधिक वयोमान असलेल्या मतदारांना मतदान केंद्रांवर मतदान करण्याची इच्छा असेल, अशांसाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था, गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रांची निर्मिती, महिला व ज्येष्ठांसाठी जनजागृती
कसबा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धगेकर मतदानाचा हक्का बजावण्यासाठी निघाले
आमदार रविंद्र धगेकर आणि पत्नी मतदानासाठी निघाले
सकाळी ७ वाजता करणार रविवार पेठेतील मतदान केंद्रांवर मतदान करणार
विधानसभा निवडणूक प्रकिया काही वेळात सुरु होणार आहे.
यासाठी मतदान केद्रवर जय्यत तयारी करण्यात आली आहे
भायखळा तारबाग याठिकाणी पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर मतदान करणार आहेत
मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
मतदान केंद्रांत मोबाईल बाळगण्यास मनाई
मतदान केंद्रात छायाचित्रणास बंदी
ज्वलनशील वस्तू आणि शस्त्र बाळगण्यास मनाई
प्रशासनाचे आदेश
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.