नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्यादिवशी पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून राजकारण तापलं आहे. बहुजन विकास आघाडीने भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप केला आहे. विरारमध्ये एका हॉटेलमध्ये विनोद तावडे उपस्थित होते. विनोद तावडे यांच्याकडे एका व्यवहाराची डायरी सापडली आहे. या प्रकारानंतर राहुल गांधी यांनी 'एक्स' मीडियावर पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
विरारमधील पैसे वाटल्याचा आरोपानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या प्रकरणावरून विरोधी पक्ष नेत्यांनी भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्ष नेते , खासदार राहुल गांधी यांनी 'एक्स'वर पोस्ट करत भाजपवर टीका केली आहे. 'मोदीजी, ५ कोटी कुणाच्या 'सेफ'मधून निघाले? लोकांचा पैसा लुटून कोणी टेम्पो पाठवला आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी यांच्या आरोपानंतर विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'राहुल गांधीजी, तुम्ही स्वत: नालासोपाऱ्यात या. हॉटेलचे सीसीटीव्ही तपासा. तेथील निवडणूक आयोगाची संपूर्ण कारवाई पाहा. त्यानंतर पैसा वाटपाचा आरोप सिद्ध करा. कोणत्या आधाराशिवाय वक्तव्य करणे म्हणजे पोरकटपणा, आणखी दुसरं काय? असा सवाल विनोद तावडे यांनी केला आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही विनोद तावडे यांच्यावर टीका केली आहे. 'मोदीजी, महाराष्ट्रात 'मनी पॉवर' आणि 'मसल पॉवर'च्या सहाय्याने सेफ होऊ इच्छित आहे. एकीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला होतो. तर दुसरीकडे भाजपचे वरिष्ठ नेते ५ कोटी रुपयांसोबत रंगेहाथ सापडला जातो. ही महाराष्ट्राची विचारधारा नाही. जनता तुम्हाला उद्या उत्तर देईल'.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते रमेश चन्नीथला यांनी म्हटलं की, 'विनोद तावडे यांना तात्काळ अटक करा. महाराष्ट्रात भाजपने पराभव मान्य केला आहे. त्यामुळे पैसे वाटत आहेत. विनोद तावडे पैसे वाटताना सापडले. पाच करोड रुपये वाटप करत असताना पकडले गेले आहे. तुम्ही कितीही पैसा वाटा, मात्र महाराष्ट्रातील जनता परिवर्तन करत आहे. याचा तपास झाला पाहिजे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.