Ahmednagar Politics Radhakrishna Vikhe Patil Vs Nana Patole:  Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'राज्याची चिंता सोडा, मविआ टिकेल का याची काळजी करावी', विखे पाटलांचा नाना पटोलेंना खणखणीत टोला

Ahmednagar Politics Radhakrishna Vikhe Patil Vs Nana Patole: लोकशाहीमध्ये ज्या प्रक्रिया घडणार त्या घडत असतात. त्यांच्या वक्तव्यावर उत्तर देण्याची आवश्यकता नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

Gangappa Pujari

सचिन बनसोडे| अहमदनगर

'नाना पटोलेंनी राज्याची काळजी करू नये, महाविकास आघाडी शेवटपर्यंत टिकेल का? याची काळजी करावी,' असे म्हणत भारतीय जनता पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अहमदनगर येथे ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना विखे पाटील यांनी खासदार निलेश लंकेंवरही जोरदार निशाणा साधला. छोट्या माणसाच्या विधानाकडे फार लक्ष देऊ नका, असा टोला त्यांनी लगावला.

निलेश लंके यांनी सुजय विखे संगमनेरातून निवडणूक लढले तर थोरात यांना प्रचाराची गरज पडणार नाही असे विधान केले होते. या विधानावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले. छोट्या माणसाच्या विधानाकडे फार लक्ष देऊ नका. लोकशाहीमध्ये ज्या प्रक्रिया घडणार त्या घडत असतात. त्यांच्या वक्तव्यावर उत्तर देण्याची आवश्यकता नाही, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

तसेच "नानांनी राज्याची फार काळजी करू नये. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे राज्य चालवण्यासाठी सक्षम आहेत. आमची चिंता करण्याचे महाविकास आघाडीने सोडून द्यावं," आपली आघाडी शेवटपर्यंत टिकेल की नाही याची चिंता करावी असा सल्ला त्यांनी नाना पटोले यांना दिला.

दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनीही ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. एखादा राज्यात मुख्यमंत्री बदलल्यानंतर चांगलं काम करतो हे हरियाणामध्ये सिद्ध झालेले आहे. जम्मू काश्मीरमध्ये अशा पद्धतीचे निकाल अपेक्षित होते. आमचं सरकार येणार नाही हे आम्हाला माहिती होतं मात्र तिथे सुद्धा आमच्या जागा वाढलेल्या आहेत. संजय राऊत यांनी शिवसेनेला फोडलं तर काँग्रेस कुठे राहिली. संजय राऊत हा भयानक माणूस ते कोणत्या पक्षाला ठिकाणावर ठेवणार नाही. शिवसेना फोडण्यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा संजय राऊत यांचा आहे, असा घणाघात गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

SCROLL FOR NEXT