Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

आता तुमच्या भुवया उंचावणारी बातमी....विधानसभेच्या २८८ जागांपैकी तब्बल ४०-४२ आमदार पतप्रांतीय ठरवणार आहेत....होय तुम्ही ऐकलं ते खरंय...कारण मुंबईपासून नागपूरपर्यंत पतप्रांतीयांची संख्या कमालीची वाढलीय. विशेष म्हणजे मराठीचा टक्का या शहरांमध्ये घसरत चालल्याचं समोर आलंय. यामुळे काय राजकीय समीकरणं बदलली आहेत. आणि त्याचा भविष्यात काय परिणाम होणार यावरचा हा विशेष रिपोर्ट......

Snehil Shivaji

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता परप्रांतीय ठरवणार असं म्हटलं तर अजिबात चुकीचं ठरणार नाही. कारण यंदा २८८ पैकी 40 ते 42 मतदारसंघात पतप्रांतीय मतदारांचा बोलबाला असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे महाराष्ट्राच्या सत्तेची दोरी ही परप्रांतीय मतदारांच्या हाती जाणार आहे....राजातल्या कोणत्या शहरात किती परप्रांतीयांची लोकसंख्या आहे ते पाहूयात....

शहर परप्रांतीय लोकसंख्या

मुंबई 55-60 %

ठाणे 40-45 %

नवी मुंबई 40-45 %

पुणे 25-30%

नाशिक 20-25%

नागपूर 15-20%

छत्रपती संभाजीनगर 10-15%

मुंबईत गेल्या दहा वर्षात पतप्रांतीय मतदारांची संख्या वाढली असून सर्व सामान्य मराठी माणूस मात्र आपल्या हक्काच्या मुंबईतून हद्दपार होत असल्याचं जळजळीत वास्तव समोर येतंय. कारण गेल्या 10 वर्षात तब्बल 2.64 टक्के इतका मराठी मतदारांचा टक्का घसरल्याचं एका सर्व्हेक्षणातून समोर आलंय.

मुंबईत आताच्या विधानसभा निवडणूकांसाठी झालेल्या जागावाटपात महायुतीनं 13 तर मविआनं 12 अमराठी उमेदवार देऊन अमराठी मतांना आपल्या बाजूनं खेचण्याचा पुरेपुर प्रयत्न केलाय. राज्यात परप्रांतीय मतदारांची वाढत चाललेली संख्या ही शिवसेना आणि मनसेसाठी नक्कीच चिंतेंची बाब आहे. त्यामुळे आपुल्या मराठी मुलूखाची सत्ता ही परप्रांतियांच्या हातात जात आहे हे मराठी माणसांच्या काळजात धस्स करणार वास्तव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Assembly Election: निकालाआधीच महाविकास आघाडीमध्ये पडद्यामागं काही तरी घडतंय?

Jalgaon News : साप पकडणे बेतले जीवावर; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू

Maharashtra Exit Polls : तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT