Dindori Assembly Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकांच्या रणसंग्रामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. आजपासून महाराष्ट्र विधानसभेसाठी अर्ज भरले जाणार आहेत. महायुती तसेच महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गड नेते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी केलेल्या एका विधानाने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. शरद पवार यांचा मला दुरुन आशिर्वाद आहे, असं ते म्हणालेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ आज आपला विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. दिंडोरीतून सलग तिसऱ्यांदा नरहरी झिरवाळ विधानसभेच्या मैदानात उतरत आहेत. पक्षातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसह नरहरी झिरवळ यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याबाबत एक महत्वाचे विधान केले. राष्ट्रवादीत दोन गट पडले असले तरी शरद पवार यांचा मला दुरून आशीर्वाद राहणार.. असं ते म्हणालेत. झिरवळ यांच्या या विधानावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
दुसरीकडे दिंडोरीत महायुतीमध्ये बंडखोरी झाल्याने नरहरी झिरवळ यांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे. दिंडोरीमधून शिवसेना शिंदे गटाचे नेते धनराज महाले हे विधानसभा मतदारसंघात इच्छुक होते मात्र ही जागा राष्ट्रवादीला सुटल्याने महाले यांनी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला आहे. ते दिंडोमधून अपक्ष निवडणूक लढवणर आहेत.
दरम्यान, यावरुन बोलताना नरहरी झिरवळ यांनी महत्वाचे विधान केले आहे. धनराज महाले यांना मी अर्ज मागे घेण्याची विनंती करणार ते उमेदवारी अर्ज मागे घेतील असे नरहरी झिरवळ म्हणाले. विकासाच्या मुद्द्यावर मला दिंडोरीतील मतदार निवडून देती 100% मी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून निवडून येणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.