Devendra Fadnavis News SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Budget 2023: घराचं स्वप्न पूुर्ण होणार! 3 वर्षात 10 लाख घरे; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Assembly Budget Session: आज एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारकडून पहिलाच अर्थसंकल्प मांडण्यात आला. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी या अर्थसंकल्पात अनेक घोषणांचा पाऊस पाडला. अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प आहे. ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित हा अर्थसंकल्प आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. .

फडणवीस यांनी यावर्षी 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम जाहीर केला. मोदी आवास घरकूल योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेतून तीन वर्षात 10 लाख घरे बांधण्यात येणार आहे. त्यासाठी 12 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या योजनेतून दरवर्षी 3 लाख घरे बांधली जातील. त्यासाठी दरवर्षी 3600 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. इतर मागासवर्गीयांना या घरकूल योजनेचा लाभ मिळणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं.

इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना’

  • - प्रधानमंत्री आवास योजना: 4 लाख घरे

  • (2.5 लाख घरे अनुसूचित जाती-जमाती, 1.5 लाख इतर प्रवर्ग)

  • - रमाई आवास : 1.5 लाख घरे/1800 कोटी रुपये

  • (किमान 25 हजार घरे मातंग समाजासाठी)

  • - शबरी, पारधी, आदिम आवास : 1 लाख घरे/1200 कोटी रुपये

  • - यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत: 50,000 घरे/600 कोटी

  • (25,000 घरे विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी धनगर : 25,000 घरे)

जेष्ठ नागरिकांसाठी महत्वाच्या घोषणा...

ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक शहरात विरंगुळा केंद्र, वयोश्री योजनेचाही विस्तार

ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक महापालिका क्षेत्रात विरंगुळा केंद्र स्थापन करणार

ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य सरकारकडून विस्तार

वयोवृद्धांना वैद्यकीय उपकरणे, अन्य सुविधा उपलब्ध करून देणार (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT