Maharashtra Assembly Budget Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Assembly Budget: अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा; महायुती सरकार येत्या ५ वर्षात मुंबई, नागपूर आणि पुण्यात विणणार मेट्रोचं जाळं

Maharashtra Budget 2025: महायुती सरकारचा नव्या सरकारमधील पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार मांडला. यावेळी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नवीन मेट्रो मार्ग सुरू केली जाणार असल्याची माहिती देण्यात आलीय.

Bharat Jadhav

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा वर्ष २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला. नव्याने सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी ११ वा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अजित पवारांनी मुंबई, पुणे, नागपूर या शहरांना अधिक प्रगतीवर नेण्यासाठी मोठ्या घोषणा केल्या. या शहरांमध्ये येत्या पाच वर्षात मुंबई, नागपूर, पुण्यात नवीन मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.

मुंबई, नागपूर आणि पुणे महानगरांतील नागरिकांना पर्यावरणपूरक, शाश्वत, विनाअडथळा वाहतूक सुविधा उपलब्ध देण्यात येणार आहे. या शहरांमध्ये एकूण १४३.५७ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आलेत. या सेवेचा लाभ सुमारे १० लाख प्रवासी रोज घेत आहेत. येत्या वर्षात मुंबईमध्ये ४१.२ किलोमीटर तर पुण्यामध्ये २३.२ किलोमीटर असे एकूण ६४.४ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत.

ठाणे वर्तुळाकार मेट्रो मार्ग तसेच पुण्यातील स्वारगेट ते कात्रज विस्तार मार्गिका प्रकल्पास केंद्र शासनाने मान्यता दिलीय. पुणे मेट्रो रेल्वे टप्पा-२ अंतर्गत खडकवासला - स्वारगेट - हडपसर - खराडी आणि नळ स्टॉप - वारजे - माणिकबाग या दोन मार्गिकांचा ९ हजार ८९७ कोटी रुपये किंमतीचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठवलाय. नागपूर मेट्रोचा पहिला ४० किमीचा टप्पा पूर्ण झालाय. ठाणे मेट्रो, पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती अजित पवार अर्थसंकल्प मांडताना दिली.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. मुंबई उप-नगरातील वाहतुकीचा वेग ​वाढवण्यासाठी वर्सोवा ते भाईंदर, मुलूंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरिवली, ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह याठिकाणी भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आल्याची माहितीही अजित पवारांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Gold Rate Today : सोन्याची किंमत पुन्हा घसरली, आठवडाभरात इतके झालं स्वस्त, वाचा 24K, 22K आणि 18K ताजे दर

आजीसोबत झोपलेल्या ४ वर्षीय चिमुकलीचे अपहरण; बलात्कार करून रक्ताच्या थारोळ्यात सोडलं, भाजपचा ममता सरकारवर हल्लाबोल

Shocking News : कर्ज न फेडल्यामुळे एजंटने मर्यादा ओलांडल्या, कर्जदाराच्या पत्नीचे 'तसले' फोटो केले व्हायरल

Indurikar Maharaj Net Worth: प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांची संपत्ती किती? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT