Privilege motion passed against Kunal Kamra and Sushma Andhare in Maharashtra Assembly  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Kunal Kamara: पावसाळी अधिवेशनात कुणाल कामरा आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या दोघांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव मंजूर झालाय.

Bharat Jadhav

पावसाळी अधिवेशनात कॉमेडियन कुणाल कामरा आणि शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव मंजूर झाला आहे. कॉमेडियन कुणाल कामराने आपल्या नया भारत या कॉमेडी शोमधून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका केली होती. शिवसेना ठाकरे गटाकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता.

सुषमा अंधारेंनीही व्हिडिओ बनवला होता. त्यामुळे या दोघांविरुद्ध हक्कभंग दाखल करण्यात आला होता, त्यास मंजुरी देण्यात आलीय. मागील विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान या दोघांविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्याची हालचाल करण्यात आली होती. दरम्यान कुणाल कामराने या स्टुडिओमध्ये विडंबनात्मक गाणं गायलं, त्या स्टुडिओची काही शिवसैनिकांनी तोडफोड केली होती. कामराविरुद्ध मुंबईतील काही पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. त्याचे पडसाद विधीमंडळात उमटले होते.

मागील विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या अखेरीच्या दिवशी कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव मांडणात आला होता. हा प्रस्ताव विधानपरिषदेचे सदस्य आमदार प्रविण दरेकर यांनी हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. आता सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांच्याविरोधातील हक्कभंग स्वीकारण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग मंजूर झालाय. त्यानुसार आता कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंना सोमवारी नोटीस काढली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे दोघांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Youth Drowned: तलाव पाहून पोहण्याचा मोह आला अन् अनर्थ घडला; २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचे ११वे अवतार; कुणी केलं विधान? वाचा

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

SCROLL FOR NEXT