chief minister eknath shinde  ANI
महाराष्ट्र

Maharashtra-Davos: दावोसमध्ये महाराष्ट्राचे ३ लाख कोटींचे करार; होणार २ लाख रोजगारांची निर्मिती

Bharat Jadhav

Maharashtra and Davos MoU Two Crore Employment :

स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये सुरु असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसांत महाराष्ट्राने ३ लाख १० हजार ८५० कोटीचे सामंजस्य करार केले. उद्या ४२ हजार ८२५ कोटींचे करार होत आहेत. अशा रितीने ३ लाख ५३ हजार ६७५ लाख कोटींचे विक्रमी सामंजस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच १ लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योगांनी स्वारस्य दाखवले असल्याने राज्यावर जागतिक उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले आहेत. या करारांमुळे राज्यात २ लाख इतक्या मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होणार आहे.(Latest News)

हे सामंजस्य करार केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जलदगतीने करण्याचा आमचा भर आहे. गेल्या वर्षी दावोस येथे झालेल्या करारांपेक्षा यंदा अधिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार होत आहेत. उद्योगपूरक, कुशल मनुष्यबळ आणि झटपट निर्णय घेणारे लोकाभिमुख राज्य अशी महाराष्ट्राची प्रतिमा जगभरात असल्याचे याठिकाणी जाणवल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दावोस परिषदेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १६ तारखेस ६ उद्योगांसह १ लाख २ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे (investment) करार करण्यात आले. त्यातून २६ हजार रोजगार (Employment) निर्मिती होणार आहे. १७ जानेवारीस ८ उद्योगांशी २ लाख ८ हजार ८५० कोटींचे गुंतवणूक करार करण्यात आले. त्यातून १ लाख ५१ हजार ९०० रोजगार निर्मिती होईल. उद्या म्हणजेच १८ तारखेला ६ उद्योगांशी ४२ हजार ८२५ कोटींचे करार होत असून त्यातून १३ हजार रोजगार निर्माण होतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दावोस येथील महाराष्ट्र दालनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध उद्योग समुहांचे प्रमुख भेटले. त्यामध्ये अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांनी आज मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची महाराष्ट्र दालनात भेट घेतली. यावेळी त्यांच्यात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा क्षेत्र, गुंतवणुकीच्या संधी आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

उद्योगांची माहिती व रोजगार पुढीलप्रमाणे :

१६ जानेवारी – आयनॉक्स एअर प्रोडक्ट २५ हजार कोटी ( ५ हजार रोजगार ), बी सी जिंदाल ४१ हजार कोटी ( ५ हजार रोजगार), जेएसडब्ल्यू स्टील २५ हजार कोटी ( १५ हजार रोजगार), एबी इन बेव्ह ६०० कोटी ( १५० रोजगार), गोदरेज एग्रोव्हेट १००० कोटी ( ६५० रोजगार) अमेरिका स्थित डेटा कंपनी १० हजार कोटी ( २०० रोजगार).

१७ जानेवारी – अदानी ग्रुप ५० हजार कोटी ( ५०० रोजगार), स्विस इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ११५८ कोटी ( ५०० रोजगार), इंडियन ज्वेलरी पार्क ५० हजार कोटी ( १ लाख रोजगार), वेब वर्क्स ५ह्जार कोटी ( १०० रोजगार), लॉजिस्टिकमधील इंडोस्पेस,इएसआर, केएसएच, प्रगती, यांची मिळून ३५०० कोटी ( १५ हजार रोजगार), नसर्गिक संसाधानातील कॉन्गलोमिरेट कंपनी २० हजार कोटी ( ४ हजार रोजगार) महाप्रीत ने हरित उर्जा प्रकल्पांसाठी ५६ हजार कोटींचे करार केले. ते पुढीलप्रमाणे आहेत. अमेरिकास्थित प्रेडीक्शन्स समवेत ४ हजार कोटी, युरोपमधील हिरो फ्युचर एनर्जी मध्ये ८ हजार कोटी, जर्मनीच्या ग्रीन एनर्जी ३००० मध्ये ४० हजार कोटी, व्हीएचएम ओमान समवेत ४ हजार कोटी

१८ जानेवारीस पुढील सामंजस्य करार होतील- सुरजागड इस्पात १० हजार कोटी ( ५ हजार रोजगार), कालिका स्टील ९०० कोटी ( ८०० रोजगार), मिलियन स्टील २५० कोटी ( ३०० रोजगार), ह्युंदाई मोटर्स ७ हजार कोटी ( ४ हजार रोजगार ), कतारची एएलयु टेक समवेत २०७५ कोटी ( ४०० रोजगार), सीटीआरएल एस ( ctr s) ८६०० कोटी ( २५०० रोजगार)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेला मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार!

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

PM Modi Speech: 'काँग्रेसने एससी, एसटी ओबीसींना जाणूनबुजून मागे ठेवलं', PM मोदींचा मोठा आरोप; मविआवरही जोरदार टीकास्त्र| पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT