Dattatray Bharane under fire just a day after becoming Maharashtra’s Agriculture Minister 
महाराष्ट्र

Dattatray Bharane: 24 तासाच्या आतच दत्तात्रय भरणे वादात; वादग्रस्त कृषिमंत्र्यांची परंपरा नेमकी काय?

Agriculture Ministers and Their History of Controversy: महाराष्ट्राचे नवनियुक्त कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे पदभार स्वीकारल्यानंतर २४ तासांतच वादात सापडले आहेत. राज्याच्या कृषी मंत्र्याच्या वादांचा हा प्रकार सुरूच आहे. काय आहे वादग्रस्त परंपरा ते पाहू.

Bharat Mohalkar

कृषिमंत्री पद मिळल्याच्या 24 तासाच्या आतच दत्तात्रय भरणे वादात सापडलेत. मात्र भरणेंनी नेमकं काय वक्तव्य केलंय? आणि महाराष्ट्राच्या वादग्रस्त कृषिमंत्र्यांची परंपरा नेमकी काय आहे? पाहूयात.. हे वक्तव्य आहे महाराष्ट्राचे नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचं. या वाक्याचा नेमका अर्थ काय? हा व्हिडीओ पुन्हा एकदा नीट पाहा.

कृषीमंत्रिपदी नियुक्ती होत नाही, तोच नवे कृषिमंत्री वादात सापडलेत. दत्तात्रय भरणेंच्या याच वक्तव्यावरुन संजय राऊतांनी महायुतीला धारेवर धरलंय. तर कृषीमंत्री अवघ्या 24 तासात अडचणीत आल्याने अजित पवारांना सारवासारव करण्यासाठी धावाधाव करावी लागलीय. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या कृषीमंत्री पदाला वादाची परंपरा लाभलीय. एकापाठोपाठ एक कृषीमंत्री कुठल्या ना कुठल्या वादात सापडल्याचं चित्र आहे. मात्र ही वादाची मालिका नेमकी कशी आहे? पाहूयात.

2019-2022

दादा भुसे - कृषी खात्यातील नियमबाह्य बदल्यांचा आरोप

2022-2023

अब्दुल सत्तार - सुप्रिया सुळेंविषयी वादग्रस्त वक्तव्य

2023-2024

धनंजय मुंडे - कृषी खात्यात 169 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

2024-2025

माणिकराव कोकाटे - वादग्रस्त वक्तव्य आणि रमी खेळल्याप्रकरणी वादात

नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालणार का? की कृषी मंत्र्यांच्या वादाची परंपरा खंडीत करण्याऐवजी कायम ठेवणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

SCROLL FOR NEXT