Jayant Patil News Update SAAM TV
महाराष्ट्र

Jayant Patil: जयंत पाटील यांच्यावर होणार निलंबनाची कारवाई? विधानसभा अध्यक्षांना अपशब्द वापरल्याचा आरोप; सत्ताधारी आक्रमक

जयंत पाटलांच्या वक्तव्यामुळे सत्ताधारी आक्रमक झाले असून त्यांच्यावर एका वर्षाच्या निलंबनाची कारवाई व्हावी या मागणीसाठी दोन वेळा कामकाज तहकुब करण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jayant Patil: राज्य विधीमंडळाचे अधिवेशन सध्या नागपुरात सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. आजच्या कामकाजात जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांंना अपशब्द वापरल्यामुळे निलंबनाची कारवाई मागणी व्हावी अशी मागणी सत्ताधारी पक्षाने केली आहे.

जयंत पाटलांच्या वक्तव्यामुळे सत्ताधारी आक्रमक झाले असून त्यांच्यावर एका वर्षाच्या निलंबनाची कारवाई व्हावी या मागणीसाठी दोन वेळा कामकाज तहकुब करण्यात आले आहे.

विधिमंडळ कामकाजात विरोधी पक्षांना बोलू दिले जात नसल्याचा आरोप जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला होता. यावरुनच ते आक्रमक झाले होते. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अध्यक्ष तुम्ही असा निर्लज्जपणा करु नका असे विधान केले. त्यांच्या या विधानानंतर सत्ताधारी पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला.

जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर गिरीश महाजन यांनी आक्रमक पवित्रा घेत तुम्ही असे बोलू शकत नाही, निलंबन करा अशी मागणी केली. या मागणीवरुन भाजपा (BJP) आमदार आक्रमक झाले ज्यामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटे तहकुब करण्यात आले.

दरम्यान, जयंत पाटील यांच्या या विधानानंतर निलंबनाच्या कारवाईवर विधानसभा अध्यक्षांच्या कक्षात बैठक सुरू झाली त्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते उपस्थित आहेत. या बैठकीत विधीमंडळ सचिवांनाही बोलावले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA News : मुंबईत गाळ्यांच्या भाड्यात तब्बल १२१ कोटींची फसवणूक; म्हाडाने १० जणांविरोधात केली कारवाई

Sangli Politics: सांगलीमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम, काँग्रेसने मारली बाजी; ३ पंचायत समित्यांवर वर्चस्व

Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर अपघाताचं सत्र सुरुच, भरधाव कार महामार्गावर उलटली | VIDEO

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Monalisa Love Story : "६ महिने ६० वर्षांसारखे जगलो..."; मोनालिसाच्या नवऱ्याने सांगितली प्रेम कहाणी, वाचा काय म्हणाला

SCROLL FOR NEXT