mahayuti  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: कन्फर्म! विधानसभेआधीच महायुतीला जबरा झटका, सत्तानाट्यातील महत्वाच्या मोहऱ्यानं मांडली वेगळी चूल

Maharashtra Politics: राज्यातील राजकारणात मोठा उलथापालथ झालाय. राजकारणात तिसरी आघाडी निर्माण झाल्याने महायुती आणि महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलंय.

Bharat Jadhav

महायुती आणि महाविकास आघाडीचं टेन्शन वाढणारी हाती आलीय. राज्यातील सत्ता स्थापनेमधील महत्त्वाचा भिडू असलेल्या बच्चू कडूंनी सत्तेतून बाहेर पडत वेगळी चूल मांडलीय. संभाजी राजे छत्रपती आणि राजू शेट्टी यांनासोबत घेत बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी स्थापन केली आहे. आज तिसरी आघाडीची पुण्यात बैठक झाली. परिवर्तन महाशक्ती या नावाने बच्चू कडू यांनी राज्यात तिसरी आघाडी स्थापन केली.

परिवर्तन महाशक्ती नावाने ते विधानसभा निवडणुकीत सामोरे जाणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिलीय. या आघाडीचा पहिला मेळावा छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार आहे. ज्यांना यात यायचं असेल तर त्यांनी २६ तारखेला संभाजीनगरला सामील व्हावे, असं आवाहन बच्चू कडू यांनी यावेळी केलं. पुण्यातील बैठकीत तिसऱ्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला. त्यावेळी तुम्ही महायुतीतून बाहेर पडत आहात का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. मी महायुती बाहेर पडलो आहे हे स्टॅम्प पेपर वर लिहून देऊ का? असं उत्तर त्यांनी दिलं.

या तिसऱ्या आघाडीत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आणि संभाजी राजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा समावेश असणार आहे. या तिसऱ्या आघाडीमुळे महायुतीसोबत महाविकास आघाडीचं टेन्शन वाढणार आहे.

विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बच्चू कडू यांनीच तिसरी आघाडी बनवून महायुतीविरोधात दंड थोपटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. बच्चू कडू यांनी राज्यातील सत्ता बदलाच्या वेळी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

भिडूने बदलली बाजू

अपना भिडू बच्चू कडू अशा घोषणा अमरावतीमध्ये सर्रास ऐकायला मिळतील. बच्चू कडू यांचे समर्थक या घोषणेने त्यांचा प्रचार करतात. राजकारणात बच्चू कडूची भूमिकाही तशीच राहिली आहे. राज्यातील सत्ता नाट्यात बच्चू कडू यांची मोठी भूमिका होती.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारला होता त्यावेळी बच्चू कडू सु्द्धा त्यांच्यासोबत दिसले होते. बच्चू कडू महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या फोननंतर त्यांनी मंत्रीपद सोडत शिंदेंच्या गटात सामील झाले होते. त्यांच्यासोबत त्याचे आमदारदेखील महायुतीत सामील झाले होते.

लोकसभा निवडणुकीपासून नाराज

दरम्यान महायुतीत सामील झाल्यानंतर मंत्रीपद मिळत नसल्याने बच्चू कडू नाराज होते. त्यामुळे ते वेळोवेळी सरकारला घरचा आहेर देत. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना अमरावतीची जागा हवी होती. परंतु भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली त्यामुळे त्यांची नाराजी वाढली होती. त्यानंतर ते लवकरच महायुतीला रामराम करतील असं म्हटलं जात होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT