Maharashtra Rain Update Latest News:  Saamtv
महाराष्ट्र

Chiplun Flood News: 'सरकारी अनास्था, नागरिकांची सहनशीलता...' दरवर्षी का बुडतं चिपळूण? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Rain Update Latest News: दरवर्षी पूर आला की सरकारी बाबू अहवालाचे कागदी घोडे नाचवतात. मात्र पुढच्या वर्षी परिस्थिती जैसे थेच राहते. त्यामुळे सरकारी अनास्था आणि चिपळूणकरांची सहनशीलता, हे कुठवर सुरू राहणार? हाच खरा प्रश्न आहे.

मयुरेश कडव

चिपळूण| ता. १६ जुलै २०२४

कोकणाला पावसानं तडाखा दिला आणि दरवर्षीप्रमाणे सर्वाधिक फटका बसला तो चिपळूणला. पावसाचं पाणी चिपळूण, खेड शहरात घुसलं आणि नागरिकाचं अतोनात नुकसान झालं. यातून सरकारच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. चिपळूण शहर दरवर्षी पाण्यात जातंय अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा काय करतीय असा सवाल उपस्थित होणं स्वाभाविक आहे.

पावसानं कोकणाला झोडपून काढलंय. मात्र याचा सर्वाधिक फटका बसलाय तो चिपळूणला. शहरातून जाणाऱ्या महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्यानं महामार्गाला अक्षरश: नदीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर दीड फुटांपर्यंतपाणी साचलं होतं. तर बाजारपेठेत पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांची धावपळ उडाली.

पावसाच्या पाण्यामुळे कुणाच्या घरातील सामानाची नासधूस झाली तर कुणाचा अख्खा संसार वाहून गेला. तसं पाहिलं तर चिपळूणकरांसाठी हे दृश्य नवं नाही. दोन वर्षांपूर्वी चिपळूणकरांनी अगदी असाच पावसाचा हाहाकार अनुभवला होता. त्यामुळे पावसाळा म्हटलं की चिपळूणकरांच्या मनात धडकीच भरते. यातूनही काही सवाल उपस्थित झाले आहेत.

कोकणात दरवर्षी भरभरून पाऊस पडतो. मात्र गेल्या काही वर्षात चिपळूण, खेड, संगमेश्वर तालुक्यातील काही गावांना सातत्यानं पाण्याचा वेढा पडतोय. त्यातही चिपळूणकरांची अवस्था फारच बिकट बनत चाललीय. त्याला बऱ्याच अंशी मुंबई महामार्गाचं काम कारणीभूत ठरलंय. याशिवाय जगबुडी नदीचं पाणी वशिष्टी नदी आल्यास त्याचा फटका चिपळूणला बसतो.

दरवर्षी पूर आला की सरकारी बाबू अहवालाचे कागदी घोडे नाचवतात, कारणमीमांसा करून उपाययोजना सुचवल्या जातात. मात्र पुढच्या वर्षी परिस्थिती जैसे थेच राहते. त्यामुळे सरकारी अनास्था आणि चिपळूणकरांची सहनशीलता, हे कुठवर सुरू राहणार? हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT