(सचिन बनसोडे, अहमदनगर)
महानंदा डेअरीवरून सासरे आणि जावयामध्ये मतभेद निर्माण झालेत. डेअरीचं एनडीडीबीकडे हस्तांतरणाची प्रक्रियेवरून सासरे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि जवाई रणजित देशमुख हे एकमेकांसमोर आले आहेत. राज्य सरकारकडून महानंदा डेअरी एनडीडीबीकडे हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. या निर्णयावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. मात्र त्यांचे जावई आणि महानंदाचे माजी अध्यक्ष रणजित देशमुख यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केलंय. (Latest News)
महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) महानंदा डेअरी राष्ट्रीय दुग्ध विकास संस्थेला अर्थात एनडीडीबीला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. महानंदच्या संचालक मंडळाने राजीनामा दिल्यानंतर महानंद एनडीडीबीकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. लवकरच ही प्रक्रिया पार पडणार आहे. विरोधक या निर्णयाला कडाडून विरोध करत असून एवढा मोठा प्रकल्प आणि मोक्यावरची जागा हस्तांतरित केली जाणार असल्याने अनेक उद्योगांप्रमाणे महानंद गुजरातला तर नेला जात नाहीए ना? अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केलीय.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
एकीकडे बाळासाहेब थोरात सरकारच्या निर्णयाला विरोध करत असताना त्यांचे जावई आणि महानंदाचे माजी अध्यक्ष रणजित देशमुख यांनी मात्र सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलंय. ज्या वेळेला संघ अडचणीत येतात तेव्हा त्यांचे हस्तांतरण राष्ट्रीय संस्थेकडे केलं जातंय. विरोधकांकडून जी चर्चा होतेय, ती चुकीची असून महानंदाच्या पुनर्जीवीत करण्यासाठी करण्यात आलेला करार योग्य असल्याचं देशमुख यांनी म्हटलंय.
संचालकांवर दबाव
महानंदचे चेअरमन राजेश पराजणे यांच्यासह संचालक मंडळाने त्यांचा राजीनाम्याचे पत्र महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालकांकडे पाठवलंय. महानंदाच्या संचालकांना सहकार कायद्याच्या कलम 78 नुसार कारवाईची भीती दाखवून राजीनामे देण्यास भाग पाडण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. स्वच्छेने राजीनामे द्या, अन्यथा सहकार कायद्याच्या कलम 78 नुसार कायदेशीर कारवाईला सामोरे जा.असे दोन पर्याय संचालकांसमोर ठेवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.