Mahalaxmi Express saam tv
महाराष्ट्र

सिग्नलशी छेडछाड अन् महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये दरोडा! नेमकं काय घडलं? पाहा Special Report

Third Robbery on Mahalaxmi Express: मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेनं निघालेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसवर दरोडा टाकण्यात आलाय. मात्र, याच एक्सप्रेसवर लूटीच्या अनेक घटना समोर आल्यात. या दरोड्याची मोडस ऑपरेंडी कशी होती?... ऐन सणासुदीत रेल्वेचा प्रवास कसा जीवघेणा ठरू लागलाय?... पाहूयात या रिपोर्टमधून...

Rohit Kadam

मुंबईहून कोल्हापूरकडे निघालेली महालक्ष्मी एक्सप्रेस साधारणपणे पहाटे अडीचच्या सुमारास लोणंद सालपे स्थानकादरम्यान थांबली आणि स्लिपर्स कोचमध्ये एकच आरडाओरडा सुरू झाला..दरोडेखोरांनी पहाटे गाढ झोपलेल्या महिलांच्या गळ्यातून लाखो रूपयांचे दागिने हिसकावून घेतले... दरोडेखोरांची मोडस ऑपरेंडी कशी होती, ते पाहूयात...

महालक्ष्मी एक्स्प्रेस लुटली

दरोडेखोरांच्या टोळीतील काही जण सिग्नल यंत्रणेजवळ थांबले. लोणंद ते सालपे स्थानकादरम्यान रेल्वे सिग्नल यंत्रणेची वायर कापून ट्रेन थांबवली

दरोडेखोरांच्या टोळीतील काही जण आधीच रेल्वेच्या बोगीत होते

गाडी १५ मिनिट थांबली.दरोडेखोरांनी 3 महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावले

पाठलाग टाळण्यासाठी रेल्वेच्या S-2, S-3 आणि S-5 डब्यांवर दगडफेक

महत्त्वाचं म्हणजे, महालक्ष्मी एक्सप्रेसवरील हा काही पहिलाच दरो़डा नाहीये या एका वर्षात महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये तीनवेळा लुटमारीच्या घटना घडल्या आहेत. .

3 महिन्यांपूर्वीच मिरज-पुणे रेल्वे मार्गावरील भिलवडी आणि ताकारी स्थानकांदरम्यान अशाच प्रकारे सिग्नल यंत्रणेत बिघाड करून प्रवाशांचे मौल्यवान दागिने लुटले होते.

25 ऑक्टोबरला ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ महालक्ष्मी एक्सप्रेसमधील महसूल निरीक्षकाचा मोबाईल हिसकावण्यात आला होता...

हा दरोडा सुनियोजित कट असल्याची शक्यता वर्तवली जातेय. सणासुदीचा काळ सुरू असल्यानं बस असो किंवा रेल्वे यातून प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणं संबंधित प्रशासनाची जबाबदारी असते. मात्र, थेट सिग्नल यंत्रणेत बिघाड करून आणि तीन तीन सुरक्षा कर्मचारी असतानाही लूट होत असेल तर रेल्वे प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे असल्याचंच म्हणावं लागेल..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अजित पवार गटात नाराजीनाट्य आहे? कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सुनील तटकरेंनी थेटच सांगितलं

Rangoli Designs For Diwali: दिवाळीला घराच्या दाराभोवती काढा 5 सोप्या रांगोळ्या, घराची शोभा वाढेल

सावकारांची फायनान्स दुकानं लोकांनी फोडली; नांदेडमध्ये क्रांतीकारी शेतकरी संघटना आक्रमक

गोकुळच्या संचालकांनो, हजर व्हा! कोल्हापूर सर्किट बेंचचा महायुतीला झटका

पार्किंगच्या नावाखाली पुणेकरांची सर्रास लूट; 3 रुपयांच्या नावाखाली 30 रुपयांची वसुली

SCROLL FOR NEXT