Gotya Gite Video  Saam Tv
महाराष्ट्र

Mahadev Munde Case: गोट्या गितेवर राजकीय वरदहस्त? अजित पवारांच्या नेत्यासोबत जेवतानाचा VIDEO समोर

Gotya Gite Video: महादेव मुंडे हत्याकांड प्रकरणातील आरोपी गोट्या गीतेचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माजी आमदारासोबत जेवताना दिसत आहे.

Priya More

Summary -

  • महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी गोट्या गीतेचा माजी आमदारासोबत जेवतानाचा व्हिडीओ व्हायरल.

  • गोट्या गीतेवर ४३ गुन्हे असून तो अद्याप पोलिसांच्या तावडीत नाही.

  • राजकीय वरदहस्तामुळे पोलिस कारवाई होत नसल्याचा आरोप.

  • गोट्या गीतेला तात्काळ अटक करण्याची नागरिकांची मागणी.

योगेश काशिद, बीड

बीडमधील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गोट्या गीतेचा आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. गोट्या गीतेचा माजी आमदारासोबत जेवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राजकीय नेत्यांसोबत रील बनवायची आणि सोशल मीडियावर ते व्हिडीओ व्हायरल करून आपली दहशत कायम ठेवायची हा गोट्या गीतेचा धंदा आहे. गोट्या गीतेचा आता जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये दिसणारी व्यक्ती माजी आमदार बाळासाहेब आजबे हे आहेत. ते आष्टीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आहेत.

महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी गोट्या गीतेचा आष्टी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार बाळासाहेब अजबे यांच्यासोबत जेवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. महादेव मुंडे हत्याकांड प्रकरणात गोट्या गीते मुख्य आरोपी आहे. तो अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही. तो फरार असून पोलिसांना गुंगारा देत आहे. याच गोट्या गीतेला राजकीय वरदहस्त असल्याच्या चर्चा होत आहेत.

गोट्या गीते हा अट्टल गुन्हेगार आहे. राजकीय लोकांसोबत रील काढायच्या आणि सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत कायम ठेवायची हा गोट्या गीतेचा धंदा आहे. गोट्या गीतेचा काही याआधी तीन व्हिडीओ समोर आले होते. एका व्हिडीओमध्ये तो एका व्यक्तीच्या दारासमोर नवैद्या दाखवत होता. तो ज्या व्यक्तीच्या दारात नवैद्य दाखवतो त्या व्यक्तीला दुसऱ्या दिवशी मारून टाकतो अशी दहशत त्याची बीडमध्ये आहे. तर त्याचा दुसऱ्या व्हिडीओ रुळावर बसून मी आत्महत्या करेल असे म्हणत असल्याचा होता. तर तिसऱ्या व्हिडीओमध्ये तो हातामध्ये पिस्तुल घेऊन रील बनवताना दिसला. गोट्याविरोधात बीड जिल्ह्यात तब्बल ४३ गुन्हे दाखल आहेत. महादेव मुंडे प्रकरणातील तो मुख्य आरोपी असून तो अजूनही मोकाट आहे. गोट्याला पोलिस कधी अटक करणार असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

दरम्यान, महादेव मुंडे हत्याकांड प्रकरणातील आरोपी गोट्या गीते पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ४३ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असताना देखील गोट्या गीते पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाही. त्याच्या अटकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. गोट्या गीतेला राजकीय आश्रय असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. वाल्मीक कराडचा तो उजवा हात असल्याचे बोलले जात आहे. वाल्मीक कराड तुरूंगात असताना गोट्या गीते मात्र मोकाट आहे. त्याला अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रिक्षाचालकांची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल झाल्यानंतर खळबळ

Shocking : मुंबईचा तरुण लातुरात आला, लाईव्ह येऊन सगळं सांगितलं; नंतर अचानक आयुष्य संपवलं

Sunday Horoscope : संडे ४ राशींसाठी ठरणार धोक्याचा? जाणून घ्यायचं असेल तर वाचा राशीभविष्य

Hair Wash Tips: पावसाळ्यात किती वेळा केस धुवावे?

Koradi Temple Gate:नागपुरातील मंदिराचा गेट कोसळला,अनेकजण दबल्याची माहिती

SCROLL FOR NEXT