Mahad: महिला सरपंचाच्या हत्येचं गूढ उलगडलं, 30 वर्षीय तरुणाला अटक, बलात्काराचाही गुन्हा Saam Tv
महाराष्ट्र

Mahad: महिला सरपंचाच्या हत्येचं गूढ उलगडलं, 30 वर्षीय तरुणाला अटक, बलात्काराचाही गुन्हा

महाड तालुक्यातील आदिस्ते गावच्या महिला सरपंचाचा सोमवारी 27 डिसेंबर दिवशी दुपारी खुन झाला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

महाड :  महाड तालुक्यातील आदिस्ते गावच्या महिला सरपंचाचा सोमवारी 27 डिसेंबर दिवशी दुपारी खुन झाला होता. हत्या झालेल्या महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह सापडला होता. हत्या आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी अमीर शंकर जाधव (वय- 30) याला 48 तासामध्ये महाड (Mahad) पोलिसांनी जेरबंद केले आहे. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात ठेवून आरोपीने निर्दयी खून करून तिच्यावर बलात्कार करून जीवे ठार मारले आहे.

पोलिसांनी (Police) आरोपीला महाड न्यायालयात (court) हजर केले असता 4 जानेवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती जिल्हा सह पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी माहिती दिली आहे. आदिस्ते गावच्या (village) सरपंच सोमवारी आपल्या आईसोबत उभटआळी परिसरातील जंगलात (forest) दुपारच्या सुमारास लाकडे गोळा करण्यासाठी गेले होते. पीडित महिलेची आई ही काही वेळाने निघून गेल्यानंतर त्या तिथेच लाकडे गोळा करत होते.

हे देखील पहा-

त्याच सुमारास एका ठिकाणी आरोपी हा असता त्याने तिच्या एकटे पणाचा फायदा घेऊन हे कृत्य केले आहे. आरोपी आणि पीडित याचे पूर्वी भांडण झाले होते. याचा राग त्याच्या मनात होता. पीडितेला जीवे मारण्याच्या हेतून प्रथम तिच्या डोक्यात मागून लाकडी फाट्याने मारहाण केली. त्यानंतर तिला फरफटत नेऊन बांबूच्या बेटात तिच्यावर बलात्कार केला आणि शेवटी तिच्या डोक्यावर दगड मारून ठार मारून फरार झाला होता. रस्त्याने जाणाऱ्या एका युवकाला हा प्रकार कळल्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली.

या हत्येप्रकारणाने खळबळ माजली असून अधिवेशनात देखील याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे महाड पोलिसांसमोर आरोपीला पकडण्याचे मोठे आव्हान होते. या प्रकरणी महाड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर महाड तालुका पोलिसांनी ९ टिम बनवुन तपास सुरु केला. त्याचबरोबर डॉग स्कॉड, अंगुली एक्सपर्ट याची मदत महत्वपुर्ण घेऊन आरोपी अमिर शंकर जाधव उवटआळी आदिस्ते याला पोलिसांनी अटक केली आहे. महाडचे उप विभागीय पोलिस अधिकारी निलेश तांबे यांनी याबाबत पत्रकार परीषद घेऊन माहिती दिली आहे.

यावेळी पुर्वीच्या भांडणाचा राग धरून आरोपीने मारल्याची कबुली असल्याचे सांगितले तर सदर प्रकरणी दाखल गुन्ह्यात भारतीय दंड संहिता कलम 376 बलात्काराचा आरोप देखील सदर आरोपीवर दाखल करण्यात आला आहे. आरोपीला 4 डिसेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनीही ही घटनास्थळी भेट दिली असून त्याच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस अधीक्षक निलेश तांबे, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, सपोनि अवसरमल आणि कर्मचारी, डॉग स्कॉड, स्थानिक गुन्हे अन्वेषण यांच्या प्रयत्नाने आरोपीला 48 तासात पकडण्यात यश आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे वाहतूक कोंडी

उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद वाढली; काँग्रेस- ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची एकनाथ शिंदेंना साथ

Election Commission: 'मतचोरीच्या खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही',: मुख्य निवडणूक आयुक्त

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

SCROLL FOR NEXT