Mahad : महापुरानंतर तीन महिन्यांनी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पाहणीची आठवण! 
महाराष्ट्र

Mahad : महापुरानंतर तीन महिन्यांनी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पाहणीची आठवण!

कोकण रेल्वेने दासगाव येथे बांधलेला पूल आणि केलेला मातीचा भराव यामुळे 22 जुलैला आलेल्या महापुराचा महाडला फटका बसला होता. आज तीन महिन्यानंतर कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पाहणी करण्याची आठवण झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : कोकण रेल्वेने दासगाव येथे बांधलेला पूल आणि केलेला मातीचा भराव यामुळे 22 जुलैला आलेल्या महापुराचा महाडला फटका बसला होता. आज तीन महिन्यानंतर कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पाहणी करण्याची आठवण झाली. कोकण रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि संचालक संजय गुप्ता यांनी आज महाड मधील कोकण रेल्वेच्या संदर्भात झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दादली ते बाणकोट परिसरात विविध ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली.

हे देखील पहा :

पाहणीनंतर परिस्थितीबाबत आपल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.22 जुलै झालेल्या अतिवृष्टीने आणि सावित्री नदीला आलेल्या महाप्रलयकारी पुराने महाड तालुक्याला उध्वस्त केले. महाडला बसलेला महापुराचा फटका हा कोकण रेल्वेचा दासगाव जवळील पूल व शेजारचा भराव कारणीभूत असल्याचा आरोप 24 जुलै रोजी महाड पूर निवारण समिती बैठकीत उपस्थित महाडकरांनी केला होता.

या बैठकीमध्ये खासदार सुनील तटकरे व आमदार भरत गोगावले यांनी कोकण रेल्वेचे महाव्यवस्थापक संजय गुप्ता यांच्याबरोबर त्यावेळी चर्चा करून प्रत्यक्ष भेट देण्याची सूचना केली होती. यानुसार कोकण रेल्वेच्या उच्चपदस्थ तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यासोबत आज महाव्यवस्थापक संजय गुप्ता यांनी कोकण रेल्वेच्या महाड परिसरात भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. गुप्ता याच्या या पाहणीनंतर काय उपाययोजना केल्या जाणार याबाबत अहवाल पाठविला जाण्याची शक्यता आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेनेचे पक्ष निरीक्षक राजन साळवी यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

Padma Awards 2026 Announcement: पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातून कुणाचा होणार सन्मान? कुणा-कुणाला मिळाला पुरस्कार, वाचा

Shivaji Maharaj Indian Navy history: छत्रपती शिवाजी महाराजांना आरमाराचे जनक का म्हटलं जातं?

Border 2 फेम दिलजीत दोसांझचं स्किन-हेअर रूटीन; पुरुषांनी नक्की करा फॉलो

Shocking: २ बायकांमध्ये नवऱ्याचं विभाजन, एकीसोबत ३ तर दुसरीसोबत ३ दिवस राहणार; रविवारी तरुणाला मिळणार सुट्टी

SCROLL FOR NEXT